ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर Safari मध्ये टॅब उघडणे आणि बंद करणे

उघडलेल्या बहुविध वेबपृष्ठांमध्ये नॅव्हिगेट करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी टॅब वापरा.

नोट : जर तुम्ही ‘कॉम्पॅक्ट टॅब बार’ लेआउट वापरत असाल, तर मेन्यू आणि इतर आयटम ह्या गाइडमध्ये वर्णन केलेल्या गोष्टींपेक्षा वेगळे दिसू शकतात. Safari चे लेआउट बदला पहा.

नवीन टॅबमध्ये लिंक उघडणे

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. लिंकला टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘बॅकग्राउंडमध्ये उघडा’ वर टॅप करा.

टॅबची हिस्ट्री बघणे

ह्या टॅबमध्ये तुम्ही आधी भेट दिलेली वेबपृष्ठे पाहू शकता.

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. ‘मागे’ बटण किंवा ‘फॉरवर्ड करा’ बटण वर टच आणि होल्ड करा.

टॅब बंद करणे

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. टॅब बटण वर टॅप करा, नंतर टॅब बंद करण्यासाठी टॅबच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात ‘बंद करा’ बटण वर टॅप करा.

टिप : ह्या टॅब गटातील सर्व टॅब्ज एकाच वेळी बंद करण्यासाठी, पूर्ण बटण वर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘सर्व [असलेले] टॅब्ज बंद करा' वर टॅप करा.

अलीकडे बंद केलेला टॅब उघडणे

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. ‘नवीन टॅब’ बटण वर टच आणि होल्ड करा, त्यानंतर अलीकडे बंद केलेल्या टॅब्जच्या यादीमधून निवडा.

    Safari मध्ये, वेबपेज उघडलेले आहे. स्क्रीनच्या शीर्षस्थानी उजव्या बाजूला, ‘नवीन टॅब’ बटण सिलेक्ट केले गेले आहे आणि अलीकडे बंद केलेल्या दोन टॅब्जची यादी दृश्यमान आहे.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.