ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर कौटुंबिक शेअरिंग सेट अप करणे

कौटुंबिक शेअरिंग तुम्हाला आणि कुटुंबातील इतर पाच सदस्यांना, Apple सेवा, पात्र खरेदी, iCloud स्टोरेज प्लॅन आणि बऱ्याच गोष्टींचा ॲक्सेस शेअर करू देते. तुम्ही एकमेकांची हरवलेली डिव्हाइसेस शोधण्यातही मदत करू शकता.

कुटुंबातील एक प्रौढ सदस्य—आयोजक—कुटुंबातील इतर सदस्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो. जेव्हा कुटुंबातील सदस्य जॉइन होतात, तेव्हा प्रत्येकाच्या डिव्हाइसवर कौटुंबिक शेअरिंग ऑटोमॅटिकली सेट अप केले जाते. त्यानंतर गट त्यांना कोणती सेवा आणि फीचर वापरायची आहेत आणि शेअर करायची आहेत ते निवडतो.

कौटुंबिक शेअरिंग पात्र डिव्हाइसवर उपलब्ध आहे. iCloud साठी सिस्टीम आवश्यकता ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

सेटिंग्जमध्ये कुटुंब स्क्रीन. शेअर केलेल्या फीचर्सच्या वर कुटुंबातील जास्तीत जास्त पाच सदस्यांची यादी केलेली असते.

कौटुंबिक शेअरिंग गट तयार करणे

तुम्हाला फक्त एका डिव्हाइसवर कौटुंबिक शेअरिंग सेट अप करणे आवश्यक आहे. त्यानंतर, त्याच Apple अकाउंट मध्ये साइन इन असलेल्या तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर ते उपलब्ध होईल.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा, त्यानंतर ‘कुटुंब’ वर टॅप करा.

    माझ्यासाठी कुटुंब सेटिंग उघडा

  3. तुमचा कौटुंबिक शेअरिंग गट सेट अप करण्यासाठी ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

  4. सुचवलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या पुढे ’आमंत्रित करा’ वर टॅप करा (जर कोणी यादीमध्ये असेल तर), किंवा ’इतरांना आमंत्रित करा’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी एक करा :

    तुम्ही कालांतरानेही कुटुंबातील सदस्यांना समाविष्ट करू शकता. iPad वर कौटुंबिक शेअरिंग गटामध्ये सदस्य समाविष्ट करणे पहा.

  5. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक शेअरिंग गटासाठी( उदाहरणार्थ, सदस्यता) सेट अप करायच्या असलेल्या फीचरवर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

    मुलासाठी आईवडिलांचे नियंत्रण किंवा Apple Cash सेट अप करण्यासाठी, त्यांच्या नावावर टॅप करा, फीचरवर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

    तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर काय शेअर करत आहात ते तुम्ही पाहू शकता आणि शेअरिंग सेटिंग कधीही ॲडजस्ट करू शकता.

तुमच्या सर्व डिव्हाइसवर कौटुंबिक शेअरिंग गट कसा सेट अप करायचा किंवा त्यात जॉइन कसे व्हायचे हे जाणून घेण्यासाठी, कौटुंबिक शेअरिंग सेट अप करा हा Apple सपोर्ट लेख पहा.

तुम्ही ‘कौटुंबिक शेअरिंग’ वापरून काय करू शकता

तुम्ही तुमच्या कौटुंबिक शेअरिंग गटासह पुढील गोष्टी सेट अप किंवा शेअर करू शकता :

‘कौटुंबिक शेअरिंग’ फीचरसाठी शिफारशी पाहणे

कौटुंबिक शेअरिंगचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी सूचना पाहण्यासाठी, सेटिंग  > ‘कुटुंब’ वर जा, त्यानंतर ‘तुमच्या कुटुंबासाठी शिफारस केलेले’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.