ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर संगीत प्ले करणे

Apple Music मधून तुम्ही समाविष्ट केलेले किंवा डाउनलोड केलेले संगीत, तुम्ही iPad शी सिंक केलेले संगीत आणि व्हिडिओ आणि तुमची iTunes Store वरील खरेदी प्ले करा.

Siri : तुम्ही संगीत सर्च करण्यासाठी आणि प्ले करण्यासाठी, तुमच्या लायब्ररीमध्ये संगीत समाविष्ट करण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी Siri वापरू शकता. उदाहरणार्थ, “Play something I like.” ह्यासारखे काहीतरी Siri ला सांगा Siri सह संगीत आणि पॉडकास्ट्स प्ले करा पहा.

iPad वर उघडणारे ‘संगीत’ ॲप डावीकडे साइडबार आणि उजवीकडे अल्बम दाखवते. MiniPlayer सर्वात खाली आहे.

तुमच्या लायब्ररीमधून गाणी प्ले करणे

  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ’लायब्ररी’ च्या खाली ‘अल्बम’ किंवा ‘गाणी’ ह्यासारख्या श्रेणीवर टॅप करा; केवळ iPad वर संग्रहित केलेले संगीत बघण्यासाठी ‘डाउनलोड केलेले’ वर टॅप करा.

    टिप : हिट्स आणि डीप कट्स मिसळून—कलाकाराच्या संपूर्ण कॅटलॉगमधील गाणी प्ले करण्यासाठी—कलाकाराच्या पृष्ठावर जा, त्यानंतर कलाकाराच्या नावाच्या पुढे ‘प्ले करा’ बटण वर टॅप करा.

  3. तुम्हाला काय प्ले करायचे आहे हे शोधण्यासाठी, ब्राउझ करण्यासाठी स्क्रोल करा किंवा तुमचे परिणाम फिल्टर करण्यासाठी सर्च फील्डमध्ये टाइप करा.

  4. आयटमवर टॅप करा, नंतर ‘प्ले करा’ वर टॅप करा किंवा अल्बम किंवा प्लेलिस्ट शफल करण्यासाठी ‘शफल करा’ वर टॅप करा.

    तुम्ही प्लेलिस्ट किंवा अल्बमवर टच आणि होल्ड देखील करू शकता, त्यानंतर ‘प्ले करा’ वर टॅप करा.

लायब्ररी श्रेणींची यादी बदलण्यासाठी, ‘संपादित करा’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला समाविष्ट करायच्या असलेल्या श्रेणी सिलेक्ट करा, उदाहरणार्थ, शैली आणि संकलन. सध्याच्या श्रेणी काढून टाकण्यासाठी कोणत्याही श्रेणीवर टॅप करा.

शिफारस केलेली गाणी स्ट्रीम करणे

  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. तुम्हाला प्ले करायचे असलेले संगीत शोधण्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • तुमच्यासाठी तयार केलेल्या शिफारसी बघा : साइडबारमध्ये ‘होम’ वर टॅप करा, नंतर प्लेलिस्ट किंवा अल्बमवर टॅप करा.

    • Apple Music मध्ये नवीन काय आहे ते पहा : साइडबारमध्ये ‘नवीन’ वर टॅप करा, नंतर मूड, नवीन रीलीझ, चार्ट आणि इतर गोष्टींनुसार संगीत शोधा.

    • Apple Music कॅटलॉग सर्च करा : संगीत सर्च करा पहा.

  3. आयटमवर टॅप करा, नंतर ‘प्ले करा’ वर टॅप करा किंवा अल्बम किंवा प्लेलिस्ट शफल करण्यासाठी ‘शफल करा’ वर टॅप करा.

    तुम्ही प्लेलिस्ट किंवा अल्बमवर टच आणि होल्ड देखील करू शकता, त्यानंतर ‘प्ले करा’ वर टॅप करा.

लॉक स्क्रीनवरून किंवा दुसरे ॲप वापरताना संगीत प्ले करणे

’कंट्रोल सेंटर’ उघडा, त्यानंतर ऑडिओ कार्डवर टॅप करा.

टिप : तुमच्या iPad वर किंवा त्याच्या जवळ प्ले होणारे गाणे तुम्ही ’कंट्रोल सेंटर’ मध्ये ‘संगीत ओळख नियंत्रण’ समाविष्ट करुन देखील ओळखू शकता. ‘कंट्रोल सेंटर’ उघडा, वरच्या डाव्या बाजूला ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, तळाशी ‘कंट्रोल समाविष्ट करा’ वर टॅप करा, नंतर ‘संगीत ओळखा’ कंट्रोलवर टॅप करा. गाणे प्ले होत असताना, कंट्रोल सेंटर उघडा, त्यानंतर ‘संगीत ओळखा’ बटण वर टॅप करा.

‘iPad कंट्रोल सेंटर’ ऑडिओ कार्डकडे निर्देश करणारा ॲरो दाखवत आहे, जिथे तुम्ही ‘लॉक स्क्रीन’ वरून किंवा दुसरे ॲप वापरताना संगीत नियंत्रित करू शकता.

जवळपासच्या संगणकावर शेअर केलेले संगीत प्ले करणे

जर तुमच्या नेटवर्कवरील संगणक ‘होम शेअरिंग’ च्या माध्यमातून संगीत शेअर करत असेल, तर तुम्ही त्यावरील संगीत तुमच्या iPad वर स्ट्रीम करू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘संगीत’ ॲपवर टॅप करा.

  3. ’होम शेअरिंग’ च्या खाली ’साइन इन करा’ वर टॅप करा, त्यानंतर तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करा.

  4. संगीत ॲप वर जा, लायब्ररी >होम शेअरिंगवर टॅप करा, नंतर शेअर केलेली लायब्ररी निवडा.

कॉण्टेंट निर्बंध सेट करणे

तुम्ही अश्लील कॉण्टेंट ब्लॉक करू शकता, संगीत व्हिडिओ बंद करू शकता, वयाप्रमाणे मानांकनानुसार कॉण्टेंट प्रतिबंधित करू शकता आणि बरेच काही करू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ’स्क्रीन टाइम’ वर टॅप करा, त्यानंतर ’कॉण्टेण्ट व गोपनीयता निर्बंध’ वर टॅप करा.

  3. ‘App Store’, ‘मीडिया’, ‘वेब व गेम्स’ वर टॅप करा, त्यानंतर उपलब्ध निर्बंधांपैकी कोणतेही निर्बंध सेट करा.

    नोट : जर तुमच्या लायब्ररीमध्ये आधीपासून अश्लील ट्रॅक असतील, तर ते डिम केले जातील आणि प्ले होणार नाहीत.

तुमचे संगीत क्रमवार लावणे

  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ’लायब्ररी’ च्या खाली श्रेणीवर टॅप करा.

  3. अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर शीर्षक, कलाकार, समाविष्ट केलेला दिनांक किंवा रिलीझ दिनांक ह्यासारखी क्रमवार लावण्याची पद्धत निवडा.

तुम्ही गाणी शफल करुन रिपीट करू शकता, त्यांची विशिष्ट क्रमाने यादी करू शकता किंवा क्रॉसफेड किंवा AutoMix वापरून त्यांचे ट्रांझिशन करू शकता.

जेव्हा तुम्ही चित्रपट, TV शो, संगीत, संगीत व्हिडिओ, ईबुक, ऑडिओबुक किंवा Apple मधील रिंगटोनचा ॲक्सेस खरेदी करता, तेव्हा तुमच्याकडे हे आयटम सुसंगत iPhone, iPad, Mac किंवा PC वर कायमस्वरूपी डाउनलोड करण्याचा पर्याय देखील असतो. Apple तुमचा डाउनलोड केलेला कॉण्टेण्ट रद्द करू शकत नाही आणि तुम्ही तुमचा डाउनलोड केलेला कॉण्टेण्ट इंटरनेट कनेक्शनशिवाय नेहमी ॲक्सेस करू शकता.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.