ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर स्क्रीन रेकॉर्डिंग करणे

तुमच्या iPad स्क्रीनवर काय घडत आहे ते कॅप्चर करण्यासाठी आणि ते व्हिडिओ म्हणून जतन करण्यासाठी तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग करू शकता. तुम्ही ऑडिओ समाविष्ट करण्यासाठी मायक्रोफोन देखील सुरू करू शकता.

iPad स्क्रीन रेकॉर्ड करणे

  1. कंट्रोल सेंटर उघडण्यासाठी स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातून खाली स्वाइप करा.

  2. स्क्रीनच्या बॅकग्राउंडवर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘कंट्रोल समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  3. कंट्रोल गॅलरीमध्ये, ‘स्क्रीन रेकॉर्डिंग’ ‘कंट्रोल सेंटर’ मध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यावर टॅप करा, त्यानंतर ‘कंट्रोल सेंटर’ वर परत येण्यासाठी स्क्रीनवर कुठेही टॅप करा.

    नोट : तुम्ही ‘कंट्रोल सेंटर’ मध्ये ‘स्क्रीन रेकॉर्डिंग’ समाविष्ट केल्यानंतर, भविष्यातील रेकॉर्डिंग्जसाठी तुम्हाला ते पुन्हा समाविष्ट करण्याची गरज नाही.

  4. ‘स्क्रीन रेकॉर्डिंग’ बटण वर टॅप करा, त्यानंतर रेकॉर्डिंग सुरू करण्यासाठी 3 सेकंदाच्या काउंटडाउनची प्रतीक्षा करा.

  5. तुम्हाला रेकॉर्ड करायची असलेली कृती करा.

  6. रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी, स्क्रीनच्या वरील बाजूस असलेल्या लाल वर्तुळावर टॅप करा, नंतर ‘स्क्रीन रेकॉर्डिंग थांबवा’ बटण वर टॅप करा.

ऑडिओसह स्क्रीन रेकॉर्डिंग घेणे

  1. कंट्रोल सेंटर उघडण्यासाठी स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातून खाली स्वाइप करा.

  2. ‘स्क्रीन रेकॉर्डिंग’ बटण वर टच आणि होल्ड करा, ते सुरू करण्यासाठी मायक्रोफोनवर टॅप करा, ’रेकॉर्डिंग सुरू करा’ वर टॅप करा, त्यानंतर रेकॉर्डिंग सुरू होण्यासाठी 3 सेकंदांच्या काउंटडाउनची प्रतीक्षा करा.

स्क्रीन रेकॉर्डिंग छायाचित्र ॲपमध्ये तुमच्या छायाचित्र लायब्ररीमध्ये ऑटोमॅटिकली जतन केले जातात. तुमची सर्व स्क्रीन रेकॉर्डिंग्ज एकाच ठिकाणी पाहण्यासाठी, ’छायाचित्र’ ॲप उघडा, ’संग्रह’ वर टॅप करा, ’मीडिया प्रकार’ पर्यंत खाली स्क्रोल करा, त्यानंतर ’स्क्रीन रेकॉर्डिंग्ज’ वर टॅप करा.

नोट : काही ॲप्स कदाचित तुम्हाला त्यांचा कॉण्टेण्ट रेकॉर्ड करण्याची अनुमती देणार नाहीत. तुम्ही तुमचा स्क्रीन रेकॉर्ड करू शकत नाही आणि एकाच वेळी स्क्रीन मिररिंग वापरू शकत नाही.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.