iPad वर ‘प्रिव्ह्यू’ ॲपसह सुरूवात करणे

PDF फॉर्म्स भरण्यासाठी आणि त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी, डॉक्युमेंट्स स्कॅन करण्यासाठी आणि PDF डॉक्युमेंट्स आणि इमेजेसमध्ये बदल करण्यासाठी ‘प्रिव्ह्यू’ ॲप कसे वापरावे ते जाणून घ्या.

हायलाइट केलेल्या भरण्यायोग्य फील्ड्ससह PDF फॉर्म दाखवणारी स्क्रीन. स्क्रीनच्या तळाशी ’ॲनोटेशन समाविष्ट करा’, ’मार्कअप’, ’ऑटोफिल’, ’क्रॉप करा’ ,’माहिती’ ‘शेअर करा’ आणि ’सर्च करा’ बटणे आहेत. ’ऑटोफिल’ बटण सिलेक्ट केले गेले आहे.

PDF फॉर्म्स भरणे

‘प्रिव्ह्यू’ मध्ये PDF फॉर्म भरण्यासाठी, स्क्रीनच्या वरच्या बाजूला ऑटोफिल बटण वर टॅप करा, नंतर एक फील्ड सिलेक्ट करा. टेक्स्ट प्रविष्ट करा, किंवा ऑनस्क्रीन कीबोर्डच्या वर दिसणाऱ्या ‘सूचना’ वर टॅप करा. स्वाक्षरी समाविष्ट करण्यासाठी तुमचे बोट किंवा Apple Pencil वापरा.

‘प्रिव्ह्यू’ ॲपची मुख्य स्क्रीन. ‘नवीन डॉक्युमेंट’ आणि ‘डॉक्युमेंट्स स्कॅन करा’ बटणे स्क्रीनच्या मध्यभागी आहेत. स्क्रीनच्या तळाशी ’अलीकडील’, ’शेअर केलेले’, आणि ’ब्राउझ करा’ टॅब्ज आहेत.

PDF फाइल तयार करण्यासाठी डॉक्युमेंट्स स्कॅन करणे आणि जतन करणे

‘डॉक्युमेंट्स स्कॅन करा’ वर टॅप करा, त्यानंतर डॉक्युमेंटची पृष्ठे कॅप्चर करण्यासाठी iPad कॅमेरा योग्य प्रकारे धरा. स्कॅन केलेले डॉक्युमेंट सर्च करण्यायोग्य PDF म्हणून जतन करण्यापूर्वी तुम्ही क्रॉप करू शकता, रोटेट करू शकता आणि रंग ॲडजस्ट करू शकता.

छायाचित्र दाखवणारे ‘प्रिव्ह्यू’ ॲप. द्राक्षांचा गुच्छ हातात धरलेला हात अग्रभागी आहे. बॅकग्राउंडमध्ये आकाश आणि महासागर आहे.

इमेजमधून बॅकग्राउंड काढून टाकणे

महत्त्वाच्या गोष्टींवर फोकस करण्यासाठी तुम्ही इमेजचे बॅकग्राउंड काढून टाकू शकता. स्क्रीनच्या शीर्षस्थानी अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर’ ‘बॅकग्राउंड काढून टाका’ निवडा.

पासवर्ड फील्ड दाखवणारा ‘प्रिव्ह्यू’ ॲपमधील लॉक केलेला PDF फॉर्म. स्क्रीनच्या तळाशी ’मार्कअप’, ’माहिती’ आणि ’शेअर करा’ बटणे आहेत.

PDF डॉक्युमेंट पासवर्डने सुरक्षित करणे

तुम्ही PDF पासवर्डने लॉक करू शकता. PDF उघडा, फाइलच्या नावापुढे असलेल्या ‘ॲक्शन मेन्यू’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ’लॉक करा’ वर टॅप करा. ’पासवर्ड आवश्यक’ सुरू करा, त्यानंतर ’पासवर्ड’ ॲपमध्ये पासवर्ड प्रविष्ट करा आणि फिल्ड्सची पडताळणी करा.

टेक्स्ट हायलाइट केलेला आणि स्ट्राइकथ्रू केलेला ‘प्रिव्ह्यू’ ॲपमधील सेवा करार PDF. टेक्स्टच्या खाली ‘हायलाइट करा’, ‘अधोरेखित करा’ आणि ‘मध्यरेखित करा’ बटणे दाखवली जातात.

टेक्स्ट ’हायलाइट करणे’, ’अधोरेखित करणे’, किंवा ’मध्यरेखित करणे’

तुम्ही PDF मध्ये टेक्स्ट हायलाइट, अधोरेखित किंवा मध्यरेखित करू शकता. PDF उघडा, त्यानंतर ‘टेक्स्ट’ सिलेक्ट करा. ’हायलाइट करा’ वर टॅप करा, त्यानंतर हायलाइट रंगावर,’अधोरेखित करा’ बटणावर किंवा ’मध्यरेखित करा’ बटणावर टॅप करा.

अधिक जाणून घ्यायचे आहे का?

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.