ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad सह डायमेन्शन मोजणे

जवळपासच्या वस्तू आणि पृष्ठभागांचे मोजमाप करण्यासाठी तुम्ही तुमच्या iPad कॅमेऱ्याचा वापर करू शकता—तुम्ही मोजमापाचे सुरुवातीचे आणि शेवटचे पॉइंट मॅन्युअली सेट करू शकता, iPad सह ऑटोमॅटिकली आयताकृती वस्तूंची परिमाणे शोधू शकता आणि बरेच काही करू शकता.

मोजमाप ॲपमध्ये बॉक्सच्या परिमाणांचे मोजमाप दर्शविणारी स्क्रीन. बॉक्सचे क्षेत्रफळ परिमाणांच्या मोजमापांवरून मोजले जाते.

सर्वोत्तम परिणामांसाठी, iPad पासून 0.5 ते 3 मीटर (2 ते 10 फूट) अंतरावर असलेल्या सुपरिभाषित वस्तूंसाठी ‘मोजमाप’ वापरा. (मोजमापे अंदाजे आहेत.)

नोट : तुम्ही ‘कंट्रोल सेंटर’ मध्ये मिररिंग चालू न करता बाह्य डिस्प्लेवर ‘मोजमाप’ वापरू शकता. तुमच्या iPad वर दिसणारी इमेज बाह्य डिस्प्लेवर मोठ्या आकारात दिसते.

मोजमाप सुरू करणे

  1. तुमच्या iPad वर मोपमाज ॲपवर (‘युटिलिटी’ फोल्डरमध्ये) जा.

  2. जवळपासच्या वस्तू हळूहळू स्कॅन करण्यासाठी iPad कॅमेरा वापरा.

  3. तुम्हाला ज्या वस्तूचे मोजमाप घ्यायचे आहे, ती स्क्रीनवर दिसेल अशाप्रकारे iPad ठेवा.

नोट : तुमच्या गोपनीयतेसाठी, तुम्ही मोजमाप घेण्यासाठी ‘मोजमाप’ वापरता तेव्हा, तुमचा कॅमेरा वापरात असल्याचे दर्शविण्यासाठी स्क्रीनच्या शीर्षस्थानी एक हिरवा डॉट दिसतो.

ऑटोमॅटिक आयताकृती मोजमाप घेणे

  1. तुमच्या iPad वर मोपमाज ॲपवर (‘युटिलिटी’ फोल्डरमध्ये) जा.

  2. जवळपासच्या वस्तू हळूहळू स्कॅन करण्यासाठी iPad कॅमेरा वापरा.

  3. जेव्हा iPad आयताकृती ऑब्जेक्टच्या कडा ओळखतो, तेव्हा बॉक्सची फ्रेम ऑब्जेक्टभोवती येते; डायमेन्शन पाहण्यासाठी बॉक्सवर टॅप करा.

  4. तुमच्या मोजमापाचे छायाचित्र घेण्यासाठी, ‘टेक पिक्चर’ बटण वर टॅप करा.

मॅन्युअल मोजमाप घेणे

  1. तुमच्या iPad वर मोपमाज ॲपवर (‘युटिलिटी’ फोल्डरमध्ये) जा.

  2. तुम्हाला जिथे मोजमाप सुरू करायचे आहे, त्या ठिकाणी स्क्रीनच्या मध्यभागी डॉट अलाइन करा, नंतर ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा.

  3. हळूहळू iPad शेवटच्या पॉइंटपर्यंत पॅन करा, नंतर मोजलेली लांबी पाहण्यासाठी ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा.

  4. तुमच्या मोजमापाचे छायाचित्र घेण्यासाठी, ‘टेक पिक्चर’ बटण वर टॅप करा.

  5. दुसरे मोजमाप घ्या किंवा सुरू करण्यासाठी ‘क्लिअर करा’ वर टॅप करा.

    सपोर्ट करणाऱ्या मॉडेल वर पुन्हा सुरू करण्यासाठी, हिस्ट्री बटण वर टॅप करा, नंतर ‘सर्व क्लिअर करा’ वर टॅप करा.

कडेविषयीचे गाइड वापरणे

सपोर्ट करणाऱ्या मॉडेल वर, ऑटोमॅटिकली दिसणाऱ्या मार्गदर्शक रेषा वापरून तुम्ही फर्निचर, काउंटरटॉप आणि इतर ऑब्जेक्टची उंची आणि त्यांच्या सरळ कडा ह्यांचे मोजमाप घेऊ शकता.

  1. तुमच्या iPad वर मोपमाज ॲपवर (‘युटिलिटी’ फोल्डरमध्ये) जा.

  2. गाइड दिसेपर्यंत ऑब्जेक्टच्या सरळ बाजूवर डॉट स्क्रीनच्या मध्यभागी येईल असे पहा.

  3. तुम्हाला जेथे मोजमाप सुरू करायचे आहे तेथे ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा.

  4. गाइडच्या बाजूने हळुहळू पॅन करा, त्यानंतर मोजलेली लांबी पाहण्यासाठी शेवटच्या पॉइंटवर ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा.

  5. तुमच्या मोजमापाचे छायाचित्र घेण्यासाठी, ‘टेक पिक्चर’ बटण वर टॅप करा.

रूलर दृश्य वापरणे

सपोर्ट करणाऱ्या मॉडेल वर, तुम्ही तुमच्या मोजमापांमधील अधिक तपशील ‘रूलर’ व्ह्यूसह पाहू शकता.

  1. तुमच्या iPad वर मोपमाज ॲपवर (‘युटिलिटी’ फोल्डरमध्ये) जा.

  2. दोन बिंदूंमधील अंतर मोजल्यानंतर, मापन रेषा लांबीची वाढीव एकके दर्शवणाऱ्या रुलरमध्ये रुपांतरित होईपर्यंत तुमचा iPad त्या मापन रेषेजवळ मूव्ह करा.

  3. तुमच्या मोजमापाचे छायाचित्र घेण्यासाठी, ‘टेक पिक्चर’ बटण वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.