ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वरील ‘स्क्रीन टाइम’ मध्ये संवेदनशील इमेजेस आणि व्हिडिओज तपासणे

इमेजेस आणि व्हिडिओज पाठवण्यापूर्वी किंवा प्राप्त करण्यापूर्वी तुमचा iPad त्यामधील नग्नता शोधू शकतो. हे फीचर ‘संदेश’ ॲप, AirDrop, ’संपर्क पोस्टर्स’, FaceTime, ‘छायाचित्र’ पिकर आणि ‘छायाचित्र’ ॲपमधील शेअर केलेल्या अल्बम्समध्ये उपलब्ध आहे. नग्न छायाचित्रे किंवा व्हिडिओज काही थर्ड पार्टी ॲप्समध्ये शेअर करण्यासाठी सिलेक्ट केल्यावरही ओळखले जाऊ शकतात.

नग्नता असलेली छायाचित्रे किंवा व्हिडिओज पाठवण्याचा प्रयत्न आढळल्यास, ‘संभाषण सुरक्षा’ चेतावणी देते, सुरक्षित राहण्याचे पर्याय देते आणि उपयुक्त संसाधने प्रदान करते. डिव्हाइसवर छायाचित्रे आणि व्हिडिओजचे विश्लेषण केले जाते. Apple ला नग्नता आढळल्याचे संकेत प्राप्त होत नाहीत आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओजचा ॲक्सेस मिळत नाही.

कुटुंबातील 18 वर्षांखालील अपत्यासाठी हे फीचर सेट अप करण्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी,अपत्याच्या iPad वर संभाषणांमधील संवेदनशील इमेजेस आणि व्हिडिओज तपासणे चालू किंवा बंद करणे आणि तुमच्या अपत्याच्या Apple डिव्हाइसवर 'संभाषण सुरक्षेविषयी माहिती' पहा.

संवेदनशील कॉण्टेण्ट चेतावणी स्क्रीन, इमेजमधील संभाव्य नग्नतेबाबत चेतावणी. स्क्रीनच्या तळाशी तीन बटणे आहेत जी ह्या प्रश्नाचे उत्तर देतात, “तुम्हाला नक्की बघायचे आहे का?” ‘रद्द करा’, ‘मदत मिळवण्याचे मार्ग बघा’ आणि ‘मला खात्री आहे’ अशी बटणे आहेत.

नोट : 18 वर्षांखालील (वय देश किंवा प्रदेशानुसार बदलते) मुलांसाठी ‘संभाषण सुरक्षा’ डिफॉल्टनुसार सुरू केली जाते.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ’स्क्रीन टाइम’ वर टॅप करा, ’संभाषण सुरक्षा’ वर टॅप करा, त्यानंतर ‘संभाषण सुरक्षा’ सुरू किंवा बंद करा.

    जेव्हा ‘संभाषण सुरक्षा’ हे फीचर सुरू असते, तेव्हा iPad नग्न इमेजेस आणि व्हिडिओज शोधते आणि चेतावणी डिस्प्ले केली जाते.

    नोट : तुम्ही ‘संभाषण सुरक्षा’ सुरू करता तेव्हा, ते सेटिंग  > ‘गोपनीयता व सुरक्षा’ मधील ‘संवेदनशील कॉण्टेण्ट चेतावणी’ सुरू करते. तुम्ही सेटिंग  > ‘गोपनीयता व सुरक्षा’ मध्ये स्वतंत्रपणे ‘संवेदनशील कॉण्टेण्ट चेतावणी’ देखील सुरू करू शकता. संवेदनशील कॉण्टेण्टबद्दल चेतावण्या प्राप्त करा पहा.

तुम्ही ॲनालिटिक्स आणि वापर डेटा शेअर करुन ‘संभाषण सुरक्षा’ सुधारित करण्यासाठी Apple ला मदत करू शकता. Apple सह कोणतेही संदेश किंवा मीडिया शेअर केले जात नाहीत. हे सुरू करण्यासाठी, सेटिंग > स्क्रीन टाइम > संभाषण सुरक्षा > ‘संभाषण सुरक्षा सुधारा’ वर जा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.