ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘क्विक नोट्स’ वापरणे

iPad वर कोणत्याही ॲप किंवा स्क्रीनवर माहिती लिहिण्यासाठी तुम्ही ‘क्विक नोट्स’ वापरू शकता. क्विक नोटमध्ये लिंक, इमेज, टॅग, आणि उल्लेख समाविष्ट करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची नावे, नंबर, आणि कल्पना सहजपणे मिळू शकतील. जेव्हा तुम्ही Safari मध्ये टेक्स्ट हायलाइट करता किंवा ॲपमधून लिंक समाविष्ट करता, तेव्हा पुढील वेळी तुम्ही संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला क्विक नोट थंबनेल दिसते, जे तुम्हाला तुम्ही आधी जे बघत होता तेथे घेऊन जाईल.

आइसलॅण्डच्या नकाशावर विंडो ओव्हरलेमध्ये क्विक नोट. नोटमध्ये टेक्स्ट आणि नकाशाला लिंक करण्याचा पर्याय आहे.

तुम्ही नोट्स ॲपमध्ये तुमच्या सर्व क्विक नोट्स ॲक्सेस करू शकता. तसेच जेव्हा तुम्ही तुमच्या iPad वर ‘क्विक नोट’ तयार करता, तेव्हा तुम्ही तुमच्या iPhone आणि Mac वर देखील नोट पाहू शकता.

क्विक नोट तयार करणे

‘क्विक नोट’ बनवण्यासाठी, पुढीलपैकी कोणतेही काम करा :

  • कोणत्याही ॲप किंवा स्क्रीनवरून : ’कंट्रोल सेंटर’ मध्ये ‘क्विक नोट’ बटण समाविष्ट करा, ‘क्विक नोट’ बटण वर टॅप करा. तुमचे काम पूर्ण झाल्यावर पूर्ण बटण वर टॅप करा.

  • सपोर्ट केलेल्या ॲप्समधून : शेअर बटण वर टॅप करा, ’अधिक’ वर टॅप करा, त्यानंतर ’क्विक नोटमध्ये समाविष्ट करा’ वर टॅप करा. तुमचे काम पूर्ण झाल्यावर पूर्ण बटण वर टॅप करा.

  • जर तुमचा iPad Apple बाह्य कीबोर्डशी कनेक्ट केलेला असेल, तर ‘क्विक नोट्स’ उघडण्यासाठी Globe-Q कीबोर्ड शॉर्टकट वापरा. जर ‘क्विक नोट्स’ आधीपासून उघडलेल्या असतील, तर तुम्ही नवीन नोट तयार करण्यासाठी कमांड-N वापरू शकता.

कॉर्नर जेस्चरसह ‘क्विक नोट्स’ घेणे

Apple Pencil वापरून डिस्प्लेच्या खालच्या उजव्या कोपऱ्यातून वर स्वाइप करा.

टिप : तुम्ही हे जेस्चर तुमच्या बोटाने देखील करू शकता—सेटिंग  ‘मल्टीटास्किंग व जेस्चर’ वर जा, नंतर ‘कोपऱ्यातून बोटाने स्वाइप करा’ चालू करा.

सेटिंग  > ॲप > ‘नोट्स’ वर जा, ‘कॉर्नर जेस्चर’ वर टॅप करा, नंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :

  • ‘कोपऱ्यातून बोटाने स्वाइप करण्याची अनुमती द्या’ चालू किंवा बंद करा.

  • ‘डाव्या कोपऱ्यातून स्वाइप करणे’ वर किंवा ‘उजव्या कोपऱ्यातून स्वाइप करणे’ वर टॅप करा, त्यानंतर कृती निवडा.

क्विक नोट्स बघणे आणि व्यवस्थापित करणे

  1. तुमच्या iPad वर ‘नोट्स’ ॲपवर जा.

  2. फोल्डर यादीमध्ये ‘क्विक नोट्स’ वर टॅप करा.

    फोल्डर्सची यादी दाखवण्यासाठी कदाचित तुम्हाला ’साइडबार टॉगल करा’ बटण वर टॅप करावे लागेल.

नोट : वेगळ्या फोल्डरमध्ये मूव्ह केल्याशिवाय तुम्ही क्विक नोट लॉक करू शकत नाही.

तुम्ही वैयक्तिक क्विक नोट वेगळ्या फोल्डरमध्ये मूव्ह केल्यास, ती स्टॅण्डर्ड नोट बनते आणि इतर ॲपमध्ये ह्यापुढे क्विक नोट म्हणून दिसत नाही.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.