ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर Apple TV ॲपमध्ये शो, चित्रपट आणि बरेच काही शोधणे

शीर्षक, खेळ आणि कास्ट ह्यासारख्या विशिष्ट श्रेणीनुसार TV शो आणि चित्रपट शोधण्यासाठी तुम्ही Apple TV ॲपमध्ये सर्च टॅबचा वापर करू शकता. Apple TV टॅब तुम्हाला Apple TV चा सहज ॲक्सेस देते, जी सदस्यता स्ट्रीमिंग सेवा आहे ज्यामध्ये Apple Originals च्या पुरस्कारप्राप्त फिल्म्स, सिरीज, आकर्षक नाटके, अभूतपूर्व माहितीपट, मुलांचे मनोरंजन, कॉमेडी आणि ह्यासारख्या बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.

नोट : Apple मीडिया सेवांची उपलब्धता देश किंवा प्रदेशानुसार बदलते. Apple मीडिया सेवांची उपलब्धता ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

मध्यभागी ’पाहणे चालू ठेवा’ ओळीच्या वर वैशिष्ट्यपूर्ण ‘Apple Original’ दाखवणारा Apple TV टॅब. स्क्रीनच्या शीर्षस्थानी, डावीकडून उजवीकडे, ‘होम’, Apple TV, MLS, ‘स्टोअर’, ‘अलीकडील खरेदी’ आणि ‘सर्च’ टॅब्ज आहेत.

Apple TV ब्राउझ करणे

  1. तुमच्या iPad वरील Apple TV ॲपवर जा.

  2. Apple TV वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • वैशिष्ट्यपूर्ण आयटम्स ब्राउझ करण्यासाठी स्क्रीनच्या शीर्षस्थानी डावीकडे स्वाइप करा.

    • नवीन रिलीझ, तयार केलेले संग्रह आणि वैयक्तिकृत शिफारसी पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा, त्यानंतर उपलब्ध पर्याय बघण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा.

      टिप : श्रेणीतील सर्व आयटम्स बघण्यासाठी किंवा संग्रहाविषयी अधिक माहिती बघण्यासाठी ’शीर्षक’ ओळीवर टॅप करा.

तुम्ही होम, MLS Season Pass, स्टोअर आणि लायब्ररी टॅबवर टॅप करून त्या श्रेणीशी संबंधित कॉण्टेण्ट देखील पाहू शकता.

विशिष्ट शो, चित्रपट आणि बरेच काही सर्च करणे

जेव्हा तुम्ही एखादी विशिष्ट गोष्ट शोधत असता— उदाहरणार्थ, एखादा शो किंवा अभिनेता—तेव्हा सर्च टॅब वापरा.

  1. तुमच्या iPad वरील Apple TV ॲपवर जा.

  2. ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, नंतर श्रेणी वर टॅप करा किंवा मागील सर्चेस पाहण्यासाठी ‘सर्च फील्ड’ वर टॅप करा किंवा नवीन सर्च प्रविष्ट करा.

    टिप : जेव्हा तुम्हाला सर्च करायचे असेल, तेव्हा तुम्ही नैसर्गिक भाषा वापरून काय शोधत आहात याचे फक्त वर्णन करा-उदाहरणार्थ, “विलक्षण लोकप्रिय नाटक”.

‘टॅब बार’ संपादित करणे

तुम्ही टॅब बारमध्ये श्रेणी समाविष्ट करून किंवा काढून टाकून कस्टमाइझ करू शकता जेणेकरून तुम्हाला पाहायचे असलेले तुम्ही त्वरित शोधू शकता.

स्क्रीनच्या शीर्षस्थानी टॅब बार संपादित करण्यासाठी पर्याय दाखवणारा iPad.
  1. तुमच्या iPad वरील Apple TV ॲपवर जा.

  2. साइडबार बटण वर टॅप करा, नंतर ‘संपादित करा’ वर टॅप करा.

    टिप : तुम्ही टॅब बारवर टच आणि होल्ड देखील करू शकता.

  3. साइडबारमधील श्रेणीला टच आणि होल्ड करा, नंतर स्क्रीनच्या शीर्षावर असलेल्या टॅब बारमध्ये ड्रॅग करा.

    टॅब बारमधून श्रेणी काढून टाकण्यासाठी, श्रेणी टॅब बारपासून दूर ड्रॅग करा.

  4. तुमचे काम पूर्ण झाल्यावर, पूर्ण बटण वर टॅप करा.

टॅब बार रीसेट करण्यासाठी, साइडबारच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात ’रीसेट करा’ वर टॅप करा.

Apple TV साठी सदस्यता आवश्यक आहे, ज्यामध्ये काही देश आणि प्रदेशांमध्ये पुढीलपैकी काही किंवा सर्व गोष्टी समाविष्ट असू शकतात : Friday Night Baseball, Major League Soccer (MLS) आणि Formula 1. सर्व फीचर्स आणि कॉण्टेण्ट सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाहीत. Apple TV सदस्यतेमध्ये थर्ड पार्टी ब्रँडेड सदस्यता सेवा किंवा Apple TV ॲपमध्ये भाड्याने किंवा खरेदीसाठी उपलब्ध असलेला कॉण्टेण्ट समाविष्ट नाही.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.