ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर Apple TV ॲपमध्ये होम टॅब वैयक्तिकृत करणे

होम टॅब तुमचे आवडते शो, चित्रपट, चॅनल आणि खेळ एका ठिकाणी एकत्र आणते. ‘बघणे चालू ठेवा’ सह तुम्ही जिथे थांबवले होते तिथून सुरु करा, किंवा फक्त तुमच्यासाठी वैयक्तिकृत केलेले Apple TV चॅनल आणि स्ट्रीमिंग ॲप्स शोधा.

नोट : Apple मीडिया सेवांची उपलब्धता देश किंवा प्रदेशानुसार बदलते. Apple मीडिया सेवांची उपलब्धता ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

‘बघणे चालू ठेवा’ या ओळीवर तुम्ही जिथे थांबवले होते तिथून सुरू करणे

तुम्ही आधीच बघण्यास सुरुवात केलेली किंवा बघण्याचा ठरवलेला कॉण्टेण्ट ‘बघणे चालू ठेवा’ ओळ डिस्प्ले करते. तुम्हाला ज्या क्रमाने शो आणि चित्रपट पाहायचे आहेत, त्या क्रमाने दिसतात. उदाहरणार्थ, जेव्हा TV एपिसोड पूर्ण होतो, तेव्हा पुढील एपिसोड ऑटोमॅटिकली ‘बघणे चालू ठेवा’ मध्ये दिसतो. जेव्हा तुम्ही फॉलो करत असलेल्या टीमचा लाइव्ह स्पोर्ट्स इव्हेंट सुरू असतो, तेव्हा तो Apple TV ॲपमध्ये बघण्यासाठी उपलब्ध असल्यास तो ‘बघणे चालू ठेवा’ यादीमध्ये सर्वप्रथम दिसतो.

  1. तुमच्या iPad वरील Apple TV ॲपवर जा.

  2. साइडबारमध्ये ‘होम’ वर टॅप करा, ’बघणे चालू ठेवा’ ओळीवर स्वाइप करा आणि नंतर ‘आयटम’ वर टॅप करा.

    तुम्हाला पाहण्यासाठी आयटम उपलब्ध असल्यास, तो लगेच प्ले व्हायला सुरूवात होते.

नोट : होम टॅबवरील ‘बघणे चालू ठेवा’ ओळ, तुम्ही Apple TV ॲपशी कनेक्ट केलेल्या कोणत्याही ॲप किंवा चॅनलवरील चित्रपट, TV शो आणि लाइव्ह स्पोर्ट्स इव्हेंट प्रदर्शित करते. ॲप आणि चॅनल कनेक्ट करण्याबाबतच्या अधिक माहितीसाठी चॅनल आणि ॲप शोधणे पहा.

तुमच्या ‘वॉचलिस्ट’ मध्ये आयटम समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे

तुम्हाला तुमच्या वॉचलिस्टमध्ये नंतरसाठी जतन करायचे असलेले चित्रपट आणि TV शो तुम्ही समाविष्ट करू शकता. तुमच्या ‘वॉचलिस्ट’ मधील चित्रपट आणि TV शोज ‘बघणे चालू ठेवा’ आणि ’वॉचलिस्ट’ ओळींमध्ये दिसतात.

नोट : जेव्हा तुम्ही स्पोर्ट्स इव्हेंट समाविष्ट करता, तेव्हा ते लाइव्ह असताना ’बघणे चालू ठेवा’ आणि ’वॉचलिस्ट’ ओळींमध्ये दिसतात.

  1. तुमच्या iPad वरील Apple TV ॲपवर जा.

  2. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • तुमच्या ‘वॉचलिस्ट’ मध्ये आयटम समाविष्ट करा : ‘आयटम’ वर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘वॉचलिस्टमध्ये समाविष्ट करा’ वर टॅप करा.

    • तुमच्या ‘वॉचलिस्ट’ मधून आयटम काढून टाका : ‘बघणे चालू ठेवा’ किंवा ’वॉचलिस्ट’ ओळीतील आयटमला टच आणि होल्ड करा, त्यानंतर ’वॉचलिस्टमधून काढून टाका’ वर टॅप करा.

    • दुसऱ्या डिव्हाइसवर बघणे पुन्हा सुरू करा : तुम्ही Apple TV ॲप वर तुमच्या iPhone, iPad, Mac, Apple TV 4K, Apple Vision Pro वर किंवा सपोर्ट केलेल्या स्मार्ट TV मध्ये तुमची ‘वॉचलिस्ट’ पाहू शकता, जिथे तुम्ही त्याच Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले आहे.

तुमच्या ‘वॉचलिस्ट’ मध्ये समाविष्ट केलेले आयटम होम टॅबवरील ’बघणे चालू ठेवा’ ओळ आणि ‘वॉचलिस्ट’ ओळीमध्ये दिसतात.

टिप : जेव्हा तुम्हाला होम टॅबच्या शीर्षस्थानी असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आयटम्समध्ये हा पर्याय दिसेल तेव्हा ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करून तुम्ही तुमच्या 'वॉचलिस्ट' मध्ये आयटम देखील समाविष्ट करू शकता.

चॅनल आणि ॲप शोधणे

Apple TV ॲप नवीन कॉण्टेंटची किंवा तुम्ही कनेक्ट केलेल्या ॲपमधून (फक्त सपोर्ट केलेले स्ट्रीमिंग ॲप) बघता त्या मालिकेतील पुढील एपिसोडची शिफारस करते.

  1. तुमच्या iPad वरील Apple TV ॲपवर जा.

  2. ‘होम’ वर टॅप करा, ‘चॅनल्स व ॲप्स’ च्या रोवर ‘खाली’ स्क्रोल करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक ब्राउझ करण्यासाठी डावीकडे स्वाइप करा :

    • चॅनल व ॲप : तुम्ही सदस्यता घेतलेले सर्व चॅनल किंवा तुम्ही Apple TV ॲपशी कनेक्ट केलेले ॲप थेट ॲक्सेस करा.

    • एक्सप्लोअर करण्यासाठी बरेच काही : सदस्यता घेण्यासाठी किंवा बघण्यासाठी नवीन चॅनल किंवा ॲप शोधा.

  3. आयटम उघडण्यासाठी त्यावर टॅप करा.

तुमच्या सर्व डिव्हाइसवर, जेथे तुम्ही तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले आहे, तेथे तुमचे चॅनल व ॲप होम टॅबमधील ‘चॅनल व ॲप’ ओळीमध्ये दिसतात.

Apple TV ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या व्हिडिओ ॲप्सच्या यादीसाठी, Apple TV ॲपमधील सपोर्ट करणाऱ्या ॲप्सची उपलब्धता ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.