ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘होम’ मध्ये फेस रेकग्निशन वापरणे

HomeKit सुरक्षित व्हिडिओ कॅमेरा किंवा डोअरबेलसह, तुम्ही छायाचित्र ॲपमध्ये टॅग केलेले लोक तुमच्याकडे आल्यावर नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी होम ॲप वापरू शकता.

फेस रेकग्निशन सेट अप करणे

तुमच्या छायाचित्र लायब्ररीमध्ये दिसणाऱ्या चेहऱ्यांद्वारे किंवा तुमच्या कॅमेरा किंवा डोअरबेलने टिपलेल्या अलीकडील अभ्यागतांच्या छायाचित्रांद्वारे फेस रेकग्निशन लोकांना ओळखते.

जर तुम्ही पहिल्यांदाच कॅमेरा किंवा डोअरबेल सेट अप करत असाल, तर खालील गोष्टी करा :

  1. तुमच्या iPad वर होम ॲपवर जा.

  2. ‘होम’ ॲपमध्ये ॲक्सेसरी समविष्ट करा.

  3. 'परिचित चेहरे ओळखा' कार्डमध्ये, ’फेस रेकग्निशन' चालू करा, त्यानंतर ‘चालू ठेवा' वर टॅप करा.

  4. तुमची छायाचित्र लायब्ररी कोण ॲक्सेस करू शकते ते निवडा :

    • कधीही नाही : केवळ तुम्ही ‘होम’ ॲप मधील क्लिपमधून समाविष्ट केलेले चेहरे ओळखले जातात.

    • फक्त मी : केवळ तुम्हाला प्राप्त होणाऱ्या नोटिफिकेशनमध्ये तुमच्या छायाचित्र लायब्ररीमधील लोकांची नावे आहेत.

    • ह्या घरातील प्रत्येकजण : तुमच्या घरामधील प्रत्येकासाठीच्या नोटिफिकेशनमध्ये तुमच्या छायाचित्र लायब्ररीमधील लोकांची नावे असतात.

  5. ‘चालू ठेवा’ वर टॅप करा, त्यानंतर कॅमेरा किंवा डोअरबेल सेट अप करणे पूर्ण करा.

तुमच्याकडे सध्या डोअरबेल किंवा कॅमेरा असल्यास आणि तुम्हाला अभ्यागतांना ओळखण्यासाठी त्याचा वापर करायचा असल्यास, होम ॲपवर टॅप करा, ‘सेटिंग’ बटण वर टॅप करा, ‘फेस रेकग्निशन’ वर टॅप करा, त्यानंतर ‘फेस रेकग्निशन’ चालू करा. तुमच्या छायाचित्र लायब्ररीवर टॅप करा, त्यानंतर त्याला कोण ॲक्सेस करू शकेल ते निवडा.

नोट : तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित कोणत्याही डिव्हाइसवर नोटिफिकेशन दिसू शकतात.

अलीकडील अभ्यागत ओळखणे

तुमच्या कॅमेरा किंवा डोअरबेलने टिपलेल्या छायाचित्राचा वापर करून तुमच्या छायाचित्र लायब्ररीमध्ये नसलेल्या लोकांना ओळखण्यासाठी तुम्ही फेस रेकग्निशनचा वापर करू शकता.

  1. तुमच्या iPad वर होम ॲपवर जा.

  2. फेस रेकग्निशन चालू असताना, साइडबारमधील 'होम' वर टॅप करा.

  3. होम टॅबवर, कॅमेरा किंवा डोअरबेलवर टॅप करा, त्यानंतर ‘सेटिंग’ बटण वर टॅप करा.

  4. ‘फेस रेकग्निशन’ वर टॅप करा, ‘अलीकडे’ च्या खाली यादीबद्ध केलेल्या अज्ञात व्यक्तीवर टॅप करा, त्यानंतर ‘नाव समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  5. त्या व्यक्तीचे नाव किंवा त्यांचे तुमच्याशी असलेले नाते समाविष्ट करा—उदाहरणार्थ, आई किंवा मेल कॅरिअर.

  6. तुमच्या कॅमेऱ्याने किंवा डोअरबेलने त्यांना पाहिल्यावर सूचित करायचे की नाही ते निवडा.

नोट : ह्या यादीमध्ये फेस मास्क असलेले लोक दिसत नाहीत.

तुमच्या कुटुंबाबरोबर चेहरे शेअर करणे

तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांना तुमच्या छायाचित्र लायब्ररीमध्ये ओळखल्या गेलेल्या अभ्यागतांची नावे पाहण्याची अनुमती देऊ शकता.

  1. तुमच्या iPad वर होम ॲपवर जा.

  2. फेस रेकग्निशन चालू असताना, ‘अधिक’ बटण वर टॅप करा, नंतर 'होम सेटिंग' वर टॅप करा.

  3. ‘कॅमेरा’ आणि ‘डोअरबेल’ वर टॅप करा, नंतर ‘फेस रेकग्निशन’ वर टॅप करा.

  4. तुमच्या छायाचित्र लायब्ररीवर टॅप करा, त्यानंतर ह्या ‘होम’ मधील प्रत्येकजणावर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.