ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वरील ‘स्टॉक’ मधील व्यावसायिक बातम्या वाचणे

‘स्टॉक’ ॲपमध्ये, तुम्ही त्या व्यावसायिक बातम्या वाचू शकता ज्या बाजाराला चालना देतात. ज्या देशांमध्ये Apple News उपलब्ध आहे, तेथे तुम्ही Apple News च्या संपादकांद्वारे सिलेक्ट केल्या गेलेल्या स्टोरी आणि Apple News+ मधील स्टोरी देखील पाहू शकता.

Apple News+ बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, Apple News+ ची सदस्यता घ्या पहा.

नोट : Apple News आणि Apple News+ सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाहीत. Apple मीडिया सेवांची उपलब्धता ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

‘स्टॉक’ ॲपमध्ये Apple News मधील व्यवसायसंबंधी लेख. इतर सुचवलेल्या स्टोरीजवर परत जाण्यासाठी लेखाच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात ‘मागे’ बटण आहे. वरच्या उजव्या कोपऱ्यात टेक्स्ट आकार, शेअर करा, जतन करा आणि ‘अधिक क्रिया’ बटणे आहेत.

स्टोरी वाचणे

  1. तुमच्या iPad वर स्टॉक ॲपवर जा.

  2. स्टोरी बघण्यासाठी ’व्यवसायिक बातम्या’ किंवा ‘सर्वोत्तम स्टोरी’ वर ‘वर’ स्वाइप करा किंवा संबंधित स्टोरी ब्राउझ करण्यासाठी तुमच्या वॉचलिस्टमधील सिम्बलवर टॅप करा. ‘माझे सिम्बल’ वॉचलिस्टमध्ये सिम्बल मॅनेज करणे पहा.

  3. स्टोरी वाचण्यासाठी त्यावर टॅप करा. स्टोरी बघत असताना, पुढीलपैकी कोणतेही काम करा :

    • ‘स्टॉक’ मधील तुमच्या न्यूजफीडवर परत जा : वरच्या डाव्या कोपऱ्यामध्ये मागे बटण वर किंवा ‘पूर्ण’ वर टॅप करा.

    • Apple News मधील प्रकाशनातील अधिक स्टोरी पहा : स्क्रीनच्या शीर्षस्थानी असलेल्या प्रकाशकाच्या लोगोवर टॅप करा.

    • Apple News मध्ये स्टोरी जतन करा : बुकमार्क बटण वर टॅप करा.

      नोट : Apple News मध्ये स्टोरीज जतन करण्यासाठी, तुम्ही तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले असल्याची खात्री करा, त्यानंतर सेटिंग  > [तुमचे नाव] > ‘iCloud’ वर जा, ‘iCloud वर जतन केलेले’ च्या पुढे ‘सर्व पहा’ वर टॅप करा, त्यानंतर 'News' चालू करा.

    • टेक्स्टचा आकार बदला : ‘टेक्स्टचा आकार’ बटण वर टॅप करा, नंतर स्टोरीमधील टेक्स्टचा आकार बदलण्यासाठी लहान किंवा मोठ्या अक्षरावर टॅप करा. तुम्हाला ‘टेक्स्टचा आकार’ बटण दिसत नसल्यास, ‘अधिक कृती’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘टेक्स्टचा आकार’ वर टॅप करा.

    • स्टोरी शेअर करा : ‘शेअर करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर संदेश किंवा Mail ह्यासारखे शेअरिंग पर्याय निवडा.

    Apple News मध्ये तुम्ही ब्लॉक केलेल्या प्रकाशनांच्या स्टोरीज न्यूजफीडमध्ये दिसत नाहीत. फक्त तुमच्यासाठी निवडलेल्या बातम्यांच्या स्टोरीज बघा पहा.

शिफारशी क्लिअर करणे

तुम्ही भूतकाळात जे वाचले त्यानुसार ’स्टॉक’ ॲप स्टोरीजची शिफारस करते. तुम्ही ही माहिती क्लिअर करू शकता.

  1. तुमच्या iPad वर स्टॉक ॲपवर जा.

  2. अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ’शिफारशींचा डेटा क्लिअर करा’ वर टॅप करा.

नोट : Apple News आणि Apple News+ सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाहीत. Apple मीडिया सेवांची उपलब्धता ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.