ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर फोल्डरमध्ये तुमच्या नोट्स व्यवस्थापित करणे

नोट्स ॲपमध्ये, तुम्ही तुमच्या नोट्स फोल्डरमध्ये व्यवस्थापित करू शकता आणि नोट्स यादीच्या शीर्षस्थानी महत्त्वाच्या नोट्स पिन करू शकता.

फोल्डर तयार करणे, नाव बदलणे, मूव्ह करणे, किंवा हटवणे

  1. तुमच्या iPad वर ‘नोट्स’ ॲपवर जा.

  2. फोल्डर्सच्या यादीमध्ये (आवश्यक असल्यास, फोल्डर्स यादी दाखवण्यासाठी ’साइडबार टॉगल करा’ बटण वर टॅप करा), पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • फोल्डर तयार करा : ‘नवीन फोल्डर’ बटण वर टॅप करा, अकाउंट निवडा (तुमच्याकडे एकापेक्षा अधिक असल्यास), ‘नवीन फोल्डर’ वर टॅप करा, नंतर नाव प्रविष्ट करा.

    • सबफोल्डर तयार करा : फोल्डरवर टच आणि होल्ड करा, नंतर ते दुसऱ्या फोल्डरवर ड्रॅग करा.

    • फोल्डरचे नाव बदला : फोल्डरवर टच आणि होल्ड करा, ‘नाव बदला’ वर टॅप करा, नंतर नवीन नाव प्रविष्ट करा.

    • फोल्डर मूव्ह करा : फोल्डरवर टच आणि होल्ड करा, नंतर ते नवीन स्थानावर ड्रॅग करा. तुम्ही फोल्डर दुसऱ्या फोल्डरवर ड्रॅग केल्यास ते सबफोल्डर होईल.

    • फोल्डर हटवा : फोल्डरवर डावीकडे स्वाइप करा, नंतर ‘फोल्डर हटवा’ बटण वर टॅप करा. किंवा फोल्डरवर टच आणि होल्ड करा, नंतर ‘हटवा’ वर टॅप करा.

      तुम्ही तुमचा विचार बदलल्यास, नोट्स पुनर्प्राप्त करण्यासाठी अलीकडे हटवलेले फोल्डर उघडा.

नोट्स पिन करणे

नोट्स यादीच्या शीर्षस्थानी महत्त्वाची नोट पिन करण्यासाठी, खालील गोष्टी करा :

  1. तुमच्या iPad वर ‘नोट्स’ ॲपवर जा.

  2. नोट्स यादीमध्ये, नोटवर टच आणि होल्ड करा, नंतर ‘नोट पिन करा’ वर टॅप करा. किंवा नोटवर उजवीकडे स्वाइप करा, नंतर पिनवर टॅप करा.

फोल्डर व्ह्यू क्रमवार लावणे आणि बदलणे

  1. तुमच्या iPad वर ‘नोट्स’ ॲपवर जा.

  2. नोट्स यादीमध्ये, ‘फोल्डर कृती’ बटण वर टॅप करा, नंतर पुढीलपैकी कोणतेही काम करा :

    • फोल्डर व्ह्यू बदला : ‘गॅलरी म्हणून बघा’ किंवा ‘यादी म्हणून बघा’ निवडा.

    • शीर्षकाप्रमाणे नोट्सची क्रमवारी लावा : ‘ह्यानुसार क्रमवार लावा’ वर टॅप करा, नंतर शीर्षक निवडा.

    • दिनांकानुसार नोट्स क्रमवार लावा : ‘ह्यानुसार क्रमवार लावा’ वर टॅप करा, नंतर ‘संपादित दिनांक’ किंवा ‘तयार केलेला दिनांक’ निवडा.

      डिफॉल्टनुसार, नोट्स दिनांकानुसार गटबद्ध केल्या जातात. हे बंद करण्यासाठी, ‘फोल्डर कृती’ बटण वर टॅप करा, नंतर ‘दिनांकानुसार गट करा’ वर टॅप करा.

    • ‘क्रमवारी लावा’ रिव्हर्स करा : ‘ह्यानुसार क्रमवार लावा’ वर टॅप करा, नंतर ‘सर्वात जुने’ निवडा (दिनांकानुसार क्रमवार करत असताना) किंवा ‘उतरता क्रम’ निवडा (शीर्षकानुसार क्रमवार करत असताना).

      तुमच्या सर्व फोल्डरसाठी डिफॉल्टनुसार क्रमवार लावण्याची पद्धत निवडण्यासाठी, सेटिंग  > ॲप > ‘नोट्स’ वर जा, नंतर ‘ह्याप्रमाणे नोट्स क्रमवार लावा’ वर टॅप करा.

नोट दुसऱ्या फोल्डरमध्ये मूव्ह करणे

  1. तुमच्या iPad वर ‘नोट्स’ ॲपवर जा.

  2. नोट्स यादीमध्ये, नोटवर डावीकडे स्वाइप करा, नंतर ‘मूव्ह करा’ वर टॅप करा. किंवा नोटवर टच आणि होल्ड करा, मूव्हवर टॅप करा, नंतर फोल्डर निवडा.

नोट हटवणे

  1. तुमच्या iPad वर ‘नोट्स’ ॲपवर जा.

  2. नोट्स यादीमध्ये, नोटवर डावीकडे स्वाइप करा, नंतर ‘हटवा’ वर टॅप करा. किंवा नोटवर टच आणि होल्ड करा, नंतर ‘हटवा’ वर टॅप करा.

तुम्ही तुमचा विचार बदलल्यास, नोट पुनर्प्राप्त करण्यासाठी अलीकडे हटवलेले फोल्डर उघडा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.