ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ’शोधाशोध’ मध्ये AirTag समाविष्ट करणे

तुम्ही तुमच्या iPad चा वापर करून Apple अकाउंट बरोबर AirTag पेअर करू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या आयटमला कीचेन किंवा बॅकपॅकसारख्या दैनंदिन आयटमशी संलग्न करता, तेव्हा जर तो हरवला किंवा गहाळ झाला तर तो शोधण्यासाठी तुम्ही शोधाशोध ॲपचा वापर करू शकता.

तुम्ही तुमचा AirTag कुठेतरी विसरल्यावर तुम्हाला सूचित केले जाऊ शकते. तुम्ही AirTag किंवा आयटम कुठेतरी विसरल्यास विलगीकरण अलर्ट्स सेट करा पहा.

AirTag एका वेळी फक्त एका Apple अकाउंटवर नोंदणीकृत केले जाऊ शकते, तुम्ही इतरांबरोबर AirTag शेअर करू शकता.

तुम्ही ’शोधाशोध’ मध्ये सपोर्ट करणारी थर्ड पार्टीची उत्पादनेदेखील समाविष्ट करू शकता. थर्ड पार्टी आयटम समाविष्ट करा किंवा अपडेट करा पहा.

AirTag समाविष्ट करणे

  1. AirTag मधून प्रॉडक्ट रॅपिंग आणि बॅटरी टॅब काढून टाका, नंतर ते तुमच्या iPad जवळ धरा.

  2. तुमच्या iPad वरील ’होम स्क्रीन’ वर जा.

    नोट : पेअरिंगचा पुन्हा प्रयत्न करण्यासाठी, तुमची स्क्रीन बंद करा आणि पुन्हा चालू करा.

  3. तुमच्या iPad च्या स्क्रीनवर ‘कनेक्ट करा’ वर टॅप करा.

  4. यादीमधून नाव निवडा किंवा नाव टाइप करण्यासाठी कस्टम नाव निवडा आणि इमोजी सिलेक्ट करा, त्यानंतर ’चालू ठेवा’ वर टॅप करा.

  5. तुमच्या Apple अकाउंटमध्ये आयटमची नोंदणी करण्यासाठी ’चालू ठेवा’ वर टॅप करा, त्यानंतर ’समाप्त करा’ वर टॅप करा.

तुम्ही शोधाशोध ॲपमध्ये AirTag नोंदणी देखील करू शकता. ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, नंतर ‘AirTag समाविष्ट करा’ निवडा.

जर आयटम दुसऱ्या कोणाच्या Apple अकाउंटमध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही ते समाविष्ट करण्यापूर्वी त्यांनी ते काढून टाकणे गरजेचे आहे. ‘शोधाशोध’ मधून AirTag किंवा इतर आयटम काढून टाका पहा.

AirTag चे नाव किंवा इमोजी बदलणे

  1. तुमच्या iPad वर शोधाशोध ॲप उघडा.

  2. स्क्रीनच्या तळाशी डावीकडे असलेल्या ‘आयटम’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला ज्याचे नाव किंवा इमोजी बदलायचे आहेत त्या AirTag वर टॅप करा.

  3. ’आयटमचे नाव बदला’ वर टॅप करा.

  4. नाव टाइप करण्यासाठी आणि इमोजी सिलेक्ट करण्यासाठी यादीमधून नाव निवडा किंवा कस्टम नाव निवडा.

  5. ‘पूर्ण’ वर टॅप करा.

AirTag बद्दल अधिक तपशील बघणे

जेव्हा तुम्ही तुमच्या Apple अकाउंटवर AirTag नोंदणी करता, तेव्हा तुम्ही शोधाशोध ॲपमध्ये त्याबद्दल अधिक तपशील बघू शकता.

  1. तुमच्या iPad वर शोधाशोध ॲप उघडा.

  2. स्क्रीनच्या तळाशी डावीकडे असलेल्या ‘आयटम’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला ज्या AirTag बद्दल अधिक तपशील पहायचे आहेत त्यावर टॅप करा.

  3. मॉडेल, अनुक्रमांक आणि फर्मवेअर व्हर्जन पाहण्यासाठी AirTag च्या ॲड्रेसवर टॅप करा.

बॅटरीची पातळी कमी असल्यास, AirTag च्या स्थानाच्या खाली एक संदेश दिसेल. तुम्ही आयटमच्या यादीमध्ये AirTag च्या नावाच्या पुढे लो बॅटरी इंडिकेटर देखील पाहू शकता.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.