ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ’आरोग्य’ मध्ये इतरांनी शेअर केलेला डेटा बघणे

तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीच्या आरोग्याबद्दलचे नोटिफिकेशन प्राप्त करू शकता आणि तुम्ही आरोग्य ॲपमध्ये त्यांच्या ॲक्टिव्हिटी, गतिशीलता, हृदयाची गती आणि आरोग्य ट्रेण्डविषयीचा डेटा बघू शकता.

आरोग्यविषयक डेटा शेअर करण्यासाठी कोणलातरी आमंत्रित करणे

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. ’शेअरिंग’ वर टॅप करा, त्यानंतर ’कोणलातरी शेअर करण्यास सांगा’ वर टॅप करा.

  3. शेअरिंग पर्याय निवडा.

तुम्ही सिलेक्ट केलेल्या व्यक्तीला आमंत्रण मिळते आणि त्यानंतर ती व्यक्ती कोणती आरोग्य माहिती शेअर करायची, ते निवडू शकते. आमंत्रित व्यक्तीला कळवा, की त्यांनी तुम्हाला त्यांच्या संपर्कांमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे.

दुसऱ्या व्यक्तीचा आरोग्य डेटा बघण्यासाठी आमंत्रण स्वीकारणे

  1. आमंत्रण आल्यानंतर, पुढीलपैकी एक करा :

    • आमंत्रणावर टॅप करा, जसे की ‘लॉक स्क्रीन’ वर किंवा ‘नोटिफिकेशन सेंटर’ मध्ये.

    • ‘आरोग्य’ मध्ये, साइडबार बटण वर टॅप करा, ‘शेअरिंग’ वर टॅप करा, त्यानंतर स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेल्या आमंत्रणामध्ये ‘बघा’ वर टॅप करा.

  2. ’स्वीकारा’ वर टॅप करा, त्यानंतर ’पूर्ण’ वर टॅप करा.

शेअर केलेला डेटा बघणे आणि त्याला त्वरित प्रतिसाद देणे

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. ’शेअरिंग’ वर टॅप करा, त्यानंतर यादीतील ’तुमच्याबरोबर शेअरिंग’ च्या खालील संपर्क कार्डवर टॅप करा.

  3. तुम्ही पुढीलपैकी कोणतेही एक करू शकता :

    • त्वरित प्रतिसाद द्या : ‘संदेश’, ‘कॉल करा’, किंवा FaceTime वर टॅप करा.

    • अधिक तपशील पहा : स्क्रीनवरील आयटमवर टॅप करा.

      जर तपशीलामध्ये चार्ट डेटा समाविष्ट असेल, तर तुम्ही ‘संदेश’ वर टॅप करून त्याविषयीचे संभाषण सुरू करू शकता. चार्ट तुमच्या संदेशामध्ये समाविष्ट केलेला आहे.

दुसऱ्या व्यक्तीला त्यांचा आरोग्य डेटा तुमच्याबरोबर शेअर करण्यास सांगणे

जर एखाद्या व्यक्तीकडे iOS 15.6 किंवा नंतरचे व्हर्जन असलेला iPhone किंवा iPadOS 17 किंवा नंतरचे व्हर्जन असलेला iPad असेल, तर तुम्ही त्यांना त्यांचा आरोग्य डेटा तुमच्याबरोबर शेअर करण्यास सांगू शकता. ते कोणता डेटा शेअर करतात आणि शेअर करणे केव्हा थांबवतात ह्यावर ते नियंत्रण ठेवतात.

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. ’शेअरिंग’ वर टॅप करा,’शेअर करण्यासाठी कोणलातरी विचारा’ वर टॅप करा, त्यानंतर पर्याय निवडा.

  3. तुमच्या आमंत्रित व्यक्तीला कळवा की तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या संपर्कांमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे आणि जर त्यांना मदतीची आवश्यकता असेल तर शेअरिंग सूचना कोणाबरोबर तरी आरोग्य डेटा शेअर करा मध्ये उपलब्ध आहेत.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.