ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वरील ‘भाषांतर’ ॲपमध्ये ‘कॅमेरा दृश्य’ सह टेक्स्टचे भाषांतर करा

iPad वर, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या टेक्स्टचे, उदाहरणार्थ रेस्टॉरंटमधील मेन्यू किंवा रस्त्यावरील चिन्हे ह्यांचे भाषांतर करण्यासाठी ‘भाषांतर’ ॲपमधील ‘कॅमेरा दृश्य’ चा वापर करू शकता. तुम्ही तुमच्या छायाचित्र लायब्ररीतील छायाचित्रांमध्ये असलेल्या टेक्स्टचे भाषांतरदेखील करू शकता.

नोट : सपोर्ट असलेल्या भाषांसाठी भाषांतर उपलब्ध आहे. iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ पहा.

स्पॅनिशमधून इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेल्या टेक्स्टसह रेस्टॉरंट मेन्यू दाखवणारी कॅमेरा स्क्रीन.

कॅमेरा दृश्य वापरून टेक्स्टचे भाषांतर करणे

  1. तुमच्या iPad वर भाषांतर ॲप उघडा.

  2. ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर 'कॅमेरा' वर टॅप करा.

  3. तुम्ही सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचे तुम्हाला ज्या भाषेत भाषांतर करायचे आहे, ती भाषा निवडा.

  4. रिअर कॅमेरा तुमच्या आजूबाजूच्या टेक्स्टचे भाषांतर करू शकेल, अशा पध्दतीने iPad ठेवा.

    नोट : तुम्ही रिअर कॅमेरा मूव्ह करता, तेव्हा रिअल टाइममध्ये टेक्स्टचे भाषांतर केले जाते.

  5. दृश्य पॉज करण्यासाठी ‘टेक पिक्चर’ बटण वर टॅप करा.

    ओव्हरले झालेले भाषांतर नीट पाहण्यासाठी तुम्ही झूम इन करू शकता.

  6. भाषांतर कार्ड दाखवण्यासाठी ओव्हरले झालेल्या भाषांतरावर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • भाषांतर कॉपी करा : भाषांतरित टेक्स्ट कॉपी करा.

    • ‘आवडते’ मध्ये समाविष्ट करा : ‘आवडते’ यादीमध्ये भाषांतर समाविष्ट करा.

    • मूळ टेक्स्ट ऐका : ‘अधिक’ वर टॅप करा, नंतर मूळ टेक्स्ट ऐकण्यासाठी करडे ‘प्ले करा’ बटण वर टॅप करा.

    • भाषांतरित टेक्स्ट ऐका : भाषांतरित टेक्स्ट ऐकण्यासाठी निळे ‘प्ले करा’ बटण वर टॅप करा.

  7. तुमचे काम पूर्ण झाल्यावर, ‘समाप्त’ बटण वर टॅप करा.

तुमच्या छायाचित्र लायब्ररीमधील छायाचित्रांमधील टेक्स्टचे भाषांतर करा

  1. iPad वर भाषांतर ॲपवर जा.

  2. ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर 'कॅमेरा' वर टॅप करा.

  3. तुम्ही सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचे तुम्हाला ज्या भाषेत भाषांतर करायचे आहे, ती भाषा निवडा.

  4. ‘छायाचित्र लायब्ररी’ बटण वर टॅप करा, नंतर तुमच्या छायाचित्र लायब्ररीतून टेक्स्ट असलेले छायाचित्र सिलेक्ट करा.

  5. तुमचे काम पूर्ण झाल्यावर, ‘समाप्त’ बटण वर टॅप करा.

भाषांतरित इमेज शेअर करा आणि जतन करा

  1. तुमच्या iPad वर भाषांतर ॲपवर जा.

  2. ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप करा, ‘कॅमेरा’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी एक करा :

    • कॅमेरा दृश्य वापरा : ‘टेक पिक्चर’ बटण वर टॅप करा.

    • तुमच्या छायाचित्र लायब्ररीतील छायाचित्र वापरा : ‘छायाचित्र लायब्ररी’ बटण वर टॅप करा, त्यानंतर छायाचित्रावर टॅप करा.

  3. ‘शेअर करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • भाषांतर शेअर करा : ‘शेअर करा’ पर्याय निवडा.

    • भाषांतर इमेज म्हणून जतन करा : ‘इमेज जतन करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.