ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर तुमचे रिमाइंडर सेटिंग बदलणे

तुम्ही सेटिंगमध्ये ‘रिमाइंडर’ ॲपसाठी तुमची प्राधान्ये कस्टमाइझ करू शकता. नवीन आयटमसाठी डिफॉल्ट यादी निवडा, नोटिफिकेशन आणि बरेच काही ॲडजस्ट करा.

तुमच्या रिमाइंडरचे सेटिंग कस्टमाइझ करणे

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’रिमाइंडर’ ॲपवर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही ॲडजस्ट करा :

    • अकाउंट : ’रिमाइंडर’ मध्ये अकाउंट समाविष्ट करा किंवा काढून टाका.

    • Siri : Siri ला तुमच्या ‘रिमाइंडर’ वापरण्याच्या पद्धतीवर आधारित ॲपवर सूचना करण्याची अनुमती द्या.

    • सर्च : रिमाइंडर ॲपमधील सूचना आणि कॉण्टेण्ट सर्च आणि विजेट्स मध्ये दिसण्याला अनुमती द्या.

    • नोटिफिकेशन : नोटिफिकेशन सेटिंग बदला.

    • भाषा : तुमच्या प्राधान्यकृत भाषा निवडा (जेव्हा अनेक भाषा समाविष्ट केल्या जातात तेव्हाच पर्याय दिसतो).

    • डिफॉल्ट यादी : तुम्ही विशिष्ट यादीच्या बाहेर तयार केलेल्या नवीन रिमाइंडरची यादी निवडा, जसे की तुम्ही Siri वापरून तयार केलेले रिमाइंडर.

    • आजचे नोटिफिकेशन : दिवसभरातील रिमाइंडर्स ज्यांना कोणत्याही वेळेशिवाय दिनांक असाइन केला गेला आहे त्यांच्यासाठी नोटिफिकेशन पाहण्यासाठी वेळ सेट करा.

    • ओव्हरड्यू म्हणून दाखवा : प्रलंबित असलेल्या दिवसभरातले रिमाइंडर साठी शेड्यूल केलेला दिनांक लाल होतो.

    • टाइम झोन : रिमाइंडर्स डिस्प्ले करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी वापरलेला काल विभाग सेट करा.

    • आज देय असलेले सामील करा : बॅज गणनेमध्ये प्रलंबित आयटम आणि आज देय असलेले आयटम ह्यांचा समावेश होतो.

    • नोटिफिकेशन म्यूट करा : असाइन केलेले रिमाइंडर्स साठी नोटिफिकेशन बंद करा.

    • सूचना दाखवा : जर तुम्ही पूर्वी पूर्ण केलेल्या रिमाइंडरशी जुळणारे टेक्स्ट टाइप केले, तर तो रिमाइंडर एक सूचना म्हणून दिसेल.

    • भाषा समाविष्ट करा : ‘रिमाइंडर’ ऑटोमॅटिकली किराणा आयटम श्रेणीबद्ध करण्यासाठी वापरतात अशी एक अतिरिक्त भाषा सेट करा.

    • श्रेणी रीसेट करा : तुम्ही किराणा किंवा ऑटोमॅटिकली वर्गीकृत केलेल्या याद्यांमध्ये मॅन्युअली आयटम्स मूव्ह करताना लक्षात आलेले वर्गीकरण क्लिअर होते. हे तुम्ही शेअर केलेल्या याद्यांसह तुमच्या कोणत्याही डिव्हाइसेसवर समाविष्ट केलेल्या नवीन आयटम्सना लागू होते. तुमच्यासोबत शेअर केलेले सध्याचे आयटम्स आणि याद्या प्रभावित होणार नाहीत.

रिमाइंडर अलर्टसाठी ध्वनी बदलणे

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ‘साउंड व हॅप्टिक्स’ वर टॅप करा, नंतर ‘रिमाइंडर अलर्ट’ वर टॅप करा.

  3. यादीतून ध्वनी निवडा.

तुम्हाला रिमाइंडर अलर्ट प्राप्त झाल्यावर आवाज ऐकायचा नसल्यास तुम्ही ‘काहीही नाही’देखील निवडू शकता.

हे देखील पहाiPad वर सेटिंग शोधणे
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.