ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर पोर्ट्रेट मोडमधील छायाचित्रे संपादित करणे

छायाचित्र ॲपमध्ये, तुम्ही पोर्ट्रेट मोडमध्ये काढलेल्या इमेजेसचे लाइटिंग इफेक्ट, फिल्डची डेप्थ आणि फोकस पॉइंट बदलू शकता आणि ॲडजस्ट करू शकता.

पोर्ट्रेट लाइटिंग इफेक्ट बदलणे

तुम्ही पोर्ट्रेट मोडमधील छायाचित्रांमध्ये पोर्ट्रेट लाइटिंग इफेक्ट लागू करू शकता, बदलू शकता किंवा काढून टाकू शकता. तुम्ही इतर डिव्हाइसेसवर काढलेली पोट्रेट्स देखील संपादित करू शकता.

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. पोर्ट्रेट मोडमधील छायाचित्र उघडण्यासाठी त्यावर टॅप करा, नंतर ‘संपादित करा’ बटण वर टॅप करा.

  3. स्क्रीनच्या शीर्षस्थानी ’लाइटिंग इंटेन्सिटी ऑफ’ बटण वर टॅप करा.

    ’लाइटिंग इफेक्ट’ स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसतील.

  4. ’पोर्ट्रेट लाइटिंग’ बटण वर टच करा, नंतर लाइटिंग इफेक्ट निवडण्यासाठी तुमचे बोटाने वर किंवा खाली स्लाइड करा :

    • नैसर्गिक प्रकाश : अस्पष्ट बॅकग्राउंडच्या समोर चेहरा स्पष्ट फोकसमध्ये आहे.

    • स्टुडिओ लाइट : चेहरा चमकदार आहे आणि छायाचित्र एकंदरीत स्पष्ट दिसते.

    • कॉन्टूर लाइट : चेहऱ्यावर हायलाइट आणि लो लाइटसह नाट्यमय छटा आहेत.

    • स्टेज लाइट : गडद काळ्या बॅकग्राउंडवर चेहरा स्पॉटलाइट केलेला आहे.

    • स्टेज लाइट मोनो : इफेक्ट ‘स्टेज लाइट’ सारखा आहे, परंतु छायाचित्र क्लासिक कृष्णधवल आहे.

    • हाय ‘की’ लाइट मोनो : इफेक्ट पांढऱ्या बॅकग्राउंडवर ग्रेस्केल सब्जेक्ट तयार करतो.

  5. लाइटिंग इफेक्टची तीव्रता ॲडजस्ट करण्यासाठी स्लायडर वर किंवा खाली ड्रॅग करा.

  6. 'पूर्ण' वर टॅप करा.

    ‘छायाचित्र’ मधील पोर्ट्रेट मोडची ‘संपादित करा’ स्क्रीन. छायाचित्र स्क्रीनच्या मध्यभागी आहे आणि स्क्रीनच्या उजव्या बाजूला ‘पोर्ट्रेट लाइटिंग’ इफेक्ट पर्याय आहेत. ‘स्टेज लाइट’ सिलेक्ट केले गेले आहे आणि इफेक्टची पातळी ॲडजस्ट करण्यासाठी स्लायडर आहे. स्क्रीनच्या डाव्या बाजूला ‘पोर्ट्रेट’, ‘ॲडजस्ट करा’, ‘फिल्टर’ आणि ‘क्रॉप करा’ बटणे आहेत. पोर्ट्रेट बटण सिलेक्ट केले गेले आहे.

नोट : छायाचित्रातून ‘पोर्ट्रेट लाइटिंग’ काढून टाकण्यासाठी, ‘संपादित करा’ बटण वर टॅप करा, नंतर स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेल्या 'पोर्ट्रेट' वर टॅप करा.

पोर्ट्रेटमध्ये बॅकग्राउंड अस्पष्ट करणे

’डेप्थ कंट्रोल’ ला सपोर्ट करणाऱ्या मॉडेल वर, तुमच्या पोर्ट्रेटमधील बॅकग्राउंड ब्लरची पातळी ॲडजस्ट करण्यासाठी डेप्थ कंट्रोल स्लायडर वापरा.

‘छायाचित्र’ मधील पोर्ट्रेट मोडची ‘संपादित करा’ स्क्रीन. पोर्ट्रेट छायाचित्र स्क्रीनच्या मध्यभागी आहे. ‘डेप्थ ॲडजस्टमेंट’ सेटिंग ॲडजस्ट करण्यासाठी स्क्रीनच्या उजव्या बाजूला स्लायडर आहे. स्क्रीनच्या डाव्या बाजूला ‘पोर्ट्रेट’, ‘ॲडजस्ट करा’, ‘फिल्टर’ आणि ‘क्रॉप करा’ बटणे आहेत. पोर्ट्रेट बटण सिलेक्ट केले गेले आहे.
  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. पोर्ट्रेट मोडमधील छायाचित्र उघडण्यासाठी त्यावर टॅप करा, नंतर ‘संपादित करा’ बटण वर टॅप करा.

  3. स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या ‘पोर्ट्रेट’ वर टॅप करा, त्यानंतर बॅकग्राउंड ब्लर इफेक्ट ॲडजस्ट करण्यासाठी उजवीकडील स्लायडर ड्रॅग करा.

    पांढरा डॉट छायाचित्राचे मूळ डेप्थ मूल्य चिन्हांकित करतो.

  4. 'पूर्ण' वर टॅप करा.

पोर्ट्रेटचा फोकस पॉइंट बदलणे

तुमच्या iPad वर, iOS 16 किंवा नंतरच्या व्हर्जनसह तुम्ही डेप्थ आणि फोकस कंट्रोल वापरून, iPhone 13 किंवा नंतरच्या मॉडेलवर घेतलेल्या पोट्रेटमध्ये सब्जेक्ट (किंवा फोकस पॉइंट) बदलू शकता. जेव्हा तुम्ही नवीन सब्जेक्ट सिलेक्ट करता, तेव्हा डेप्थ ऑफ फील्ड (किंवा अस्पष्टता) ऑटोमॅटिकली ॲडजस्ट केली जाते जेणेकरून नवीन सब्जेक्ट शार्प आणि फोकसमध्ये दिसेल. नवीन सब्जेक्ट अस्पष्ट किंवा खूप दूर नाही ह्याची खात्री करा.

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. कोणतेही ‘पोर्ट्रेट’ मोडमधील छायाचित्र पूर्ण स्क्रीनमध्ये बघण्यासाठी त्यावर टॅप करा, त्यानंतर ‘संपादित करा’ बटण वर टॅप करा.

  3. छायाचित्रातील नवीन सब्जेक्टवर किंवा फोकस पॉइंटवर टॅप करा.

  4. 'पूर्ण' वर टॅप करा.

पोर्ट्रेट इफेक्ट काढून टाकणे

‘पोर्ट्रेट’ मोडमध्ये घेतलेल्या छायाचित्रातून तुम्ही पोर्ट्रेट इफेक्ट (बॅकग्राउंड ब्लर) काढून टाकू शकता.

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. पोर्ट्रेट मोडमध्ये घेतलेले छायाचित्र उघडा.

  3. स्क्रीनच्या डावीकडे असलेल्या ‘पोर्ट्रेट’ वर टॅप करा, त्यानंतर ‘पोर्ट्रेट ऑफ करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.