ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर 3D नकाशा बघा

नकाशावर कोणतेही स्थान एक्सप्लोअर करताना, तुम्ही अतिरिक्त डायमेन्शन असलेला परिसर पाहण्यासाठी नकाशा फिरवू शकता.

सपोर्ट करणाऱ्या मॉडेल वर आणि निवडक शहरांमध्ये, नकाशा ॲप हे समुद्रसपाटीपासूनची उंची, रस्ते, झाडे, इमारती, लॅण्डमार्क आणि इतर अनेक गोष्टींसाठी अतिरिक्त तपशील प्रदान करते.

नोट : सर्व देश किंवा प्रदेशात सर्व फीचर्स उपलब्ध नाहीत. उपलब्धतेसाठी, iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ वर ‘शहराचा तपशीलवार अनुभव’ पहा.

नकाशा किंवा पृथ्वीचा गोल मूव्ह, झूम करणे किंवा फिरवणे

  1. तुमच्या iPad वर नकाशा ॲपवर जा.

  2. पुढीलपैकी कोणतेही एक काम करा :

    • नकाशात इकडेतिकडे मूव्ह करा : नकाशा ड्रॅग करा.

    • झूम इन किंवा झूम आउट करा : डबल टॅप करा, नंतर झूम इन करण्यासाठी वर ड्रॅग करा किंवा झूम आउट करण्यासाठी खाली ड्रॅग करा. किंवा नकाशा पिंच करून उघडा किंवा बंद करा.

    • नकाशा फिरवा : नकाशाला दोन बोटांनी टच आणि होल्ड करा, नंतर तुमची बोटे फिरवा.

      तुम्ही नकाशा फिरवल्यानंतर स्क्रीनच्या शीर्षस्थानी उत्तर दिशा दाखवण्यासाठी, होकायंत्र बटण वर टॅप करा.

3D नकाशा बघणे

  1. तुमच्या iPad वर नकाशा ॲपवर जा.

  2. 2D नकाशा 3D नकाशामध्ये रुपांतरित करण्यासाठी, पुढीलपैकी एक कृती करा :

  3. 3D नकाशा बघत असताना, तुम्ही पुढीलपैकी कोणतीही कृती करू शकता :

    • कोन ॲडजस्ट करा : दोन बोटे वर किंवा खाली ड्रॅग करा.

    • इमारती आणि इतर छोटी ठिकाणे 3D मध्ये पहा : झूम इन करा.

    • पृथ्वी बघा : नकाशा पृथ्वीच्या गोलामध्ये रुपांतरीत होईपर्यंत झूम आउट करा. पृथ्वीचा गोल फिरवण्यासाठी तो ड्रॅग करा किंवा पर्वतरांगा, वाळवंट, महासागर आणि बऱ्याच ठिकाणांचे अधिक तपशील एक्सप्लोअर करण्यासाठी झूम इन किंवा झूम आउट करा (सपोर्ट करणाऱ्या मॉडेल वर).

    • 2D नकाशावर परत जा : शीर्षस्थानी उजव्या बाजूजवळ ‘2D’ वर टॅप करा.

नकाशा ॲपमध्ये 3D नकाशा, ज्यात पूल आणि उद्यान दाखवले आहे.

तुम्ही आजुबाजूची ठिकाणेही पाहू शकता.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.