ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad इंटरनेटला कनेक्ट करणे

उपलब्ध Wi-Fi नेटवर्क वापरून तुमचा iPad इंटरनेटशी कनेक्ट करा. ‘Wi-Fi + Cellular मॉडेल्स’ मोबाइल नेटवर्कचा वापर करून देखील इंटरनेटशी कनेक्ट केले जाऊ शकते.

उपलब्ध Wi-Fi नेटवर्क दर्शविणारी ‘सेटिंग’ स्क्रीन.

उपलब्ध नेटवर्क बघणे आणि Wi-Fi ला कनेक्ट करणे

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. Wi-Fi वर टॅप करा, नंतर Wi-Fi सुरू करा.

    iPad ऑटोमॅटिकली ज्ञात नेटवर्कला जॉइन करतो.

  3. नवीन नेटवर्क जॉइन करण्यासाठी, खालीलपैकी एक करा :

    • उपलब्ध नेटवर्क जॉइन करा : नेटवर्कच्या नावावर टॅप करा. विचारल्यास, पासवर्ड प्रविष्ट करा.

    • लपवलेले नेटवर्क जॉइन करा : ‘इतर’ वर टॅप करा, नंतर नेटवर्कचे नाव, सुरक्षा प्रकार आणि पासवर्ड प्रविष्ट करा.

iPad Wi-Fi ला कनेक्ट केलेले असताना, नेटवर्कच्या नावाच्या पुढे निळा चेकमार्क दिसेल आणि Wi-Fi आयकॉन स्क्रीनच्या शीर्षस्थानी दिसेल.

Wi-Fi पासवर्ड शेअर करणे

तुमचा iPad Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट केलेला असल्यास, तुम्ही जवळच्या दुसऱ्या iPhone, iPad किंवा Mac सह Wi-Fi पासवर्ड शेअर करू शकता.

  1. तुमचा iPad अनलॉक केलेला असण्याची, Wi-Fi नेटवर्कला कनेक्ट केलेला असण्याची आणि तुमच्या Apple अकाउंट मध्ये साइन इन केल्याची खात्री करा.

  2. खालील गोष्टींची खात्री करा :

    • तुम्ही पासवर्ड शेअर करत असलेल्या व्यक्तीने त्यांच्या डिव्हाइसवर त्यांच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन केले आहे.

    • ती व्यक्ती ‘संपर्क ॲप’ मध्ये तुमच्या संपर्कांच्या यादीत आहे.

    • इतर डिव्हाइस तुमच्या iPad च्या जवळ आहे.

  3. इतर डिव्हाइसवर, Wi-Fi नेटवर्क निवडा.

  4. तुमच्या iPad वर, Wi-Fi पासवर्ड नोटिफिकेशन दिसण्यासाठी काही क्षण प्रतीक्षा करा, त्यानंतर ‘पासवर्ड शेअर करा’ वर टॅप करा.

वैयक्तिक हॉटस्पॉट जॉइन करणे

जर मोबाइल सेवा असलेला iPhone किंवा iPad वैयक्तिक हॉटस्पॉट शेअर करत असेल, तर तुम्ही त्याचे मोबाइल कनेक्शन वापरू शकता.

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. Wi-Fi वर टॅप करा, त्यानंतर ‘वैयक्तिक हॉटस्पॉट’ शेअर करणाऱ्या डिव्हाइसचे नाव निवडा.

  3. विचारल्यास, पासवर्ड प्रविष्ट करा. (वैयक्तिक हॉटस्पॉट शेअर करणाऱ्या डिव्हाइसवर, पासवर्ड सेटिंग > मोबाइल > ‘वैयक्तिक हॉटस्पॉट’ मध्ये दाखवला जातो.)

Wi-Fi आणि हॉटस्पॉटसाठी सेटिंग मॅनेज करणे

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. Wi-Fi वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • Wi-Fi नेटवर्कसाठी सेटिंग बदला : माहिती बटण वर टॅप करा.

    • नवीन Wi-Fi नेटवर्क जॉइन करा : ‘नेटवर्क जॉइन करण्यासाठी विचारा’ वर टॅप करा, नंतर ‘बंद करा’, ‘सूचित करा’ किंवा ‘विचारा’ निवडा.

    • Wi-Fi उपलब्ध नसल्यास वैयक्तिक हॉटस्पॉट जॉइन करा : ‘हॉटस्पॉट ऑटो जॉइन करा’ वर टॅप करा, त्यानंतर ’कधीही नाही’, ‘जॉइन होण्यासाठी परवानगी घ्या’ किंवा ‘ऑटोमॅटिक’ निवडा.

Wi-Fi उपलब्ध नसल्यास मोबाइल नेटवर्कशी कनेक्ट करणे (मोबाइलसह iPad मॉडेल्सवर)

Wi-Fi नेटवर्क उपलब्ध नसल्यास तुमचा iPad ऑटोमॅटिकली तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरच्या मोबाइल डेटा नेटवर्कशी कनेक्ट होतो. iPad कनेक्ट होत नसल्यास, पुढील गोष्टी तपासा :

  1. तुमचे SIM सक्रिय आणि अनलॉक केलेले आहे ह्याची पडताळणी करा. मोबाइल सेवा सेट अप करा पहा.

  2. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  3. ’मोबाइल डेटा’ वर टॅप करा, त्यानंतर ’मोबाइल डेटा’ सुरू केलेला असल्याची पडताळणी करा.

iPad इंटरनेटला कसे कनेक्ट करावे

कनेक्शन तयार होईपर्यंत, iPad पुढील क्रम फॉलो करतो :

  • सर्वात अलीकडे वापरलेल्या उपलब्ध Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो

  • रेंजमधील Wi-Fi नेटवर्कची यादी दाखवते आणि तुम्ही निवडलेल्या नेटवर्कशी कनेक्ट होते

  • तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरच्या मोबाइल डेटा नेटवर्कशी कनेक्ट केले जाते (Wi-Fi + Cellular मॉडेल्स)

    5G ला सपोर्ट करणाऱ्या iPad वर, iPad हा Wi-Fi ऐवजी तुमचा 5G मोबाइल डेटा वापरू शकतो. तसे असल्यास, तुम्हाला Wi-Fi नेटवर्कच्या नावाच्या खाली इंटरनेटसाठी 5G मोबाइलचा सेवेचा वापर केला जात आहे असे दिसेल. Wi-Fi वर परत स्विच करण्यासाठी, नेटवर्कच्या नावाच्या पुढे माहिती बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘इंटरनेटसाठी Wi-Fi वापरा’ वर टॅप करा. तुमच्या iPad सह 5G वापरा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

नोट : जर इंटरनेटशी Wi-Fi कनेक्शन उपलब्ध नसेल, तर ॲप आणि सेवा तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरच्या मोबाइल नेटवर्कवर डेटा ट्रान्सफर करू शकतात, ज्यामुळे अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. तुमच्या मोबाइल डेटा प्लॅन शुल्काबाबतच्या माहितीसाठी तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरशी संपर्क साधा. मोबाइल डेटाचा वापर मॅनेज करण्यासाठी, मोबाइल डेटा सेटिंग बघा किंवा बदला पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.