ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर गट छायाचित्रे आणि व्हिडिओज शोधणे

छायाचित्र ॲप अनेकदा चित्रांमध्ये आणि व्हिडिओमध्ये एकत्र दिसणाऱ्या लोकांचे आणि पाळीव प्राण्यांचे गट ओळखते आणि त्यांना गटांच्या संग्रहांमध्ये क्रमवार लावते. उदाहरणार्थ, तुमच्याकडे तुमच्या कुटुंबाच्या किंवा मित्रांच्या गटाची अनेक छायाचित्रे असल्यास, ‘छायाचित्र’ ॲप त्या प्रत्येक गटासाठी संग्रह तयार करते.

’छायाचित्र’ ॲपमध्ये ‘लोक व पाळीव प्राणी’ संग्रह. स्क्रीनच्या वरच्या बाजूला गटांची रांग आहे, खाली स्वतंत्र लोक आणि पाळीव प्राणी आहेत.

गटाची छायाचित्रे आणि व्हिडिओ शोधणे

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. ’संग्रह’ वर टॅप करा, त्यानंतर ’लोक व पाळीव प्राणी’ वर टॅप करा.

  3. गटांच्या खाली, तुमचे गट बघण्यासाठी स्वाइप करा किंवा ’सर्व पहा’ वर टॅप करा.

  4. गटातील सर्व छायाचित्रे आणि व्हिडिओज बघण्यासाठी तो गट सिलेक्ट करा.

    टिप : कोणत्याही व्यक्तीला गटात समाविष्ट करण्यासाठी, ‘क्रमवार लावा’ आणि फिल्टर बटण वर टॅप करा, ’पर्याय बघा’ वर टॅप करा, नंतर ’इतर लोक’ वर टॅप करा.

गटाची छायाचित्रे शेअर करण्यासाठी, अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ’छायाचित्रे शेअर करा’ वर टॅप करा.

गट संग्रह तयार करणे

तुम्ही ‘लोक व पाळीव प्राणी’ संग्रहातून लोकांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या कोणत्याही संयोजनासह गट संग्रह तयार करू शकता.

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. ’संग्रह’ वर टॅप करा, त्यानंतर ’लोक व पाळीव प्राणी’ वर टॅप करा.

  3. गटांच्या उजवीकडे ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ’नवीन गट तयार करा’ वर टॅप करा.

  4. गटातील तुम्हाला हवे असलेले लोक आणि पाळीव प्राणी सिलेक्ट करा, त्यानंतर पूर्ण बटण वर टॅप करा.

  5. पर्याय म्हणून, गटासाठी नवीन नाव प्रविष्ट करा किंवा गटामध्ये अधिक लोक आणि पाळीव प्राणी समाविष्ट करा.

  6. ‘तयार करा’ वर टॅप करा.

गट संग्रह संपादित करणे किंवा हटवणे

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. ’संग्रह’ वर टॅप करा, त्यानंतर ’लोक व पाळीव प्राणी’ वर टॅप करा.

  3. गटांच्या खाली, तुम्हाला संपादित करायचे असलेल्या गटावर टच आणि होल्ड करा, त्यानंतर खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • गटाचे नाव बदला : ’नाव आणि लोक संपादित करा’ वर टॅप करा, नवीन नाव प्रविष्ट करा, त्यानंतर पूर्ण बटण वर टॅप करा.

    • लोकांना समाविष्ट करा किंवा काढून टाका : ’नाव आणि लोक संपादित करा’ वर टॅप करा, त्यानंतर त्यांच्या छायाचित्राच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात ‘काढून टाका’ बटण वर टॅप करा.

    • गटामध्ये कोणालातरी समाविष्ट करा : ’नाव आणि लोक संपादित करा’ वर टॅप करा, त्यानंतर ’लोक व पाळीव प्राणी समाविष्ट करा’ वर टॅप करा. तुम्हाला कोणाला समाविष्ट करायचे आहे ते सिलेक्ट करा, नंतर पूर्ण बटण वर टॅप करा.

    • गटाचे छायाचित्र संपादित करा : ’नाव आणि लोक संपादित करा’ वर टॅप करा, त्यानंतर सध्याच्या गट छायाचित्राच्या खालच्या उजव्या कोपऱ्यातील छायाचित्र आयकॉनवर टॅप करा. नवीन छायाचित्र सिलेक्ट करा, त्यानंतर पूर्ण बटण वर टॅप करा.

    • गट हटवा : ’गट हटवा’ वर टॅप करा.

गट संग्रहांचा क्रम बदलणे

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. ’संग्रह’ वर टॅप करा, त्यानंतर ’लोक व पाळीव प्राणी’ वर टॅप करा.

  3. गटावर टच आणि होल्ड करा, नंतर त्याला नवीन स्थानावर ड्रॅग करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.