ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘छायाचित्र’ मध्ये शेअर केलेले अल्बम तयार करणे

‘शेअर केलेले अल्बम्स’ वापरून, केवळ तुम्ही निवडलेल्या लोकांबरोबर शेअर करण्यासाठी तुम्ही अल्बम्स तयार करू शकता—आणि ते त्यांची स्वतःची छायाचित्रे, व्हिडिओज आणि टिप्पण्या सर्वांना दिसण्यासाठी समाविष्ट करू शकतात. तुम्ही शेअर केलेला अल्बम सेट अप केल्यास, तुम्ही त्याचे नाव बदलू शकता किंवा तो हटवू देखील शकता.

तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी

तुम्ही तुमच्या iPad वर आणि तुम्हाला ‘शेअर केलेले अल्बम’ सह वापरायचे असलेल्या इतर डिव्हाइसेसवर तुमच्या Apple अकाउंट मध्ये साइन इन केलेले असल्याची खात्री करा.

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा, ‘iCloud’ वर टॅप करा, नंतर ‘छायाचित्र’ ॲपवर टॅप करा.

  3. ’शेअर केलेले अल्बम्स’ सुरू करा.

शेअर केलेला अल्बम तयार करणे

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. ’संग्रह’ वर टॅप करा.

  3. ’अल्बम्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’शेअर केलेले’ वर टॅप करा.

  4. ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर पुढील गोष्टी करा :

    • अल्बममध्ये छायाचित्रे आणि व्हिडिओ समाविष्ट करा : ‘छायाचित्र समाविष्ट करा’ वर टॅप करा, तुम्हाला समाविष्ट करायचे असलेले आयटम्स सिलेक्ट करा, त्यानंतर पूर्ण बटण वर टॅप करा.

    • अल्बमला नाव द्या : ’शेअर केलेल्या अल्बमचे नाव’ टेक्स्ट फील्डमध्ये नाव टाइप करा.

    • जॉइन होण्यासाठी लोकांना आमंत्रित करा : ’सहभागी समाविष्ट करा’ वर टॅप करा, तुम्हाला समाविष्ट करायचे असलेल्या संपर्काचे नाव प्रविष्ट करा, किंवा प्राप्तकर्त्याच्या Apple अकाउंटशी संलग्न ईमेल ॲड्रेस किंवा फोन नंबर टाइप करा, त्यानंतर ’पूर्ण’ वर टॅप करा. लोकांना आमंत्रित करणे किंवा काढून टाकणे पहा.

  5. ‘तयार करा’ वर टॅप करा.

शेअर केलेला अल्बम जॉइन करणे

जेव्हा तुम्हाला शेअर केलेला अल्बम जॉइन करण्यासाठी आमंत्रित केले जाते, तेव्हा तुमच्या iPad स्क्रीनवर नोटिफिकेशन दिसते.

नोटीफिकेशनवर टॅप करा, त्यानंतर छायाचित्र ॲपमध्ये अल्बमवर ‘स्वीकारा’ वर टॅप करा.

जर तुम्ही नोटिफिकेशनवर टॅप करून शेअर केलेला अल्बम जॉइन करत नसाल, तर तुम्ही पुढील गोष्टी देखील करू शकता :

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. ’संग्रह’ वर टॅप करा.

  3. ‘अल्बम्स’ वर टॅप करा, ‘ॲक्टिव्हिटी’ वर टॅप करा, त्यानंतर ‘स्वीकारा’ वर टॅप करा.

नोट : जेव्हा सदस्य शेअर केलेला अल्बम जॉइन करण्याचे आमंत्रण स्वीकारतो, तेव्हा अल्बम तयार करणाऱ्या व्यक्तीला नोटिफिकेशन प्राप्त होते.

शेअर केलेले अल्बम्स बघणे

तुम्ही तुमचे सर्व शेअर केलेले अल्बम्स एकाच ठिकाणी बघू शकता.

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. ’संग्रह’ वर टॅप करा.

  3. तुमचे सर्व शेअर केलेले अल्बम्स पाहण्यासाठी ’शेअर केलेले अल्बम्स’ वर टॅप करा, त्यानंतर ते बघण्यासाठी ‘अल्बम’ वर टॅप करा.

    टिप : तुमच्या शेअर केलेल्या अल्बम्समध्ये नवीन छायाचित्रे आणि टिप्पण्या ह्यासारखे अपडेट बघण्यासाठी ‘ॲक्टिव्हिटी’ वर टॅप करा.

शेअर केलेल्या अल्बमचे नाव बदलणे

शेअर केलेल्या अल्बमचा निर्माता त्याचे नाव बदलू शकतो.

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. ’संग्रह’ वर टॅप करा.

  3. ‘शेअर केलेले अल्बम’ वर टॅप करा, त्यानंतर अल्बमवर टॅप करा.

  4. अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर अल्बमच्या नावावर टॅप करा.

  5. टेक्स्ट फील्डमध्ये नवीन नाव प्रविष्ट करा, त्यानंतर पूर्ण बटण वर टॅप करा.

शेअर केलेल्या अल्बममधून स्वतःला हटवणे किंवा काढून टाकणे

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. ’संग्रह’ वर टॅप करा.

  3. ‘शेअर केलेले अल्बम’ वर टॅप करा, त्यानंतर अल्बमवर टॅप करा.

  4. अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर तुम्ही अल्बम तयार केला असल्यास ‘शेअर केलेला अल्बम हटवा’ वर टॅप करा किंवा तुम्ही सदस्य असल्यास ‘सदस्यता रद्द करा’ वर टॅप करा.

शेअर केलेला अल्बम हटवला गेला किंवा अल्बम तयार करणाऱ्या व्यक्तीने तो शेअर करणे थांबवले तरीही, तुम्ही शेअर केलेल्या लायब्ररीमधून तुमच्या छायाचित्र लायब्ररीमध्ये जतन केलेली किंवा डाउनलोड केलेली छायाचित्रे तुमच्या लायब्ररीमध्ये राहतात. शेअर केलेल्या अल्बममधून तुमच्या छायाचित्र लायब्ररीमध्ये छायाचित्रे आणि व्हिडिओ जतन करणे पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.