ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वरील ‘संदेश’ मध्ये ‘वाचल्याच्या पावत्या’ चालू किंवा बंद करणे

तुम्ही एखाद्या व्यक्तीचे टेक्स्ट संदेश कधी पाहिले आहेत हे त्या व्यक्तीला ऑटोमॅटिकली कळवण्यासाठी तुम्ही ‘वाचल्याच्या पावत्या’ वापरू शकता.

जेव्हा ‘वाचल्याच्या पावत्या’ चालू केल्या जातात, तेव्हा प्रेषकाला त्यांनी तुम्हाला पाठवलेल्या संदेशांच्या खाली “वाचलेले” हा शब्द दिसतो, जो सूचित करतो की तुम्ही त्यांचा संदेश वाचला आहे. जर तुम्ही त्यांचा संदेश वाचला नसेल, तर प्रेषकाला “डिलिव्हर केलेले” दिसेल.

तुम्ही सर्वांसाठी किंवा वैयक्तिक संपर्कांसाठी ‘वाचल्याच्या पावत्या’ चालू करू शकता.

नोट : ‘वाचल्याच्या पावत्या’ वापरण्यासाठी, तुम्ही आणि तुमच्या प्राप्तकर्त्याने iMessage चालू करणे आवश्यक आहे.

‘वाचल्याच्या पावत्या’ चालू करणे

तुम्ही सर्वांचे संदेश कधी उघडले आहेत हे प्रत्येकाला कळवण्यासाठी तुम्ही ‘वाचल्याच्या पावत्या’ चालू करू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘संदेश’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘वाचल्याच्या पावत्या पाठवणे’ चालू करा.

नोट : जर तुम्ही एखाद्या विशिष्ट संपर्कासाठीच्या ‘वाचल्याच्या पावत्या’ बंद केल्या असतील, तर तुम्हाला त्या एका संपर्कासाठी स्वतंत्रपणे सेटिंग पुन्हा चालू करावे लागेल. (खालील एका व्यक्तीसाठी ‘वाचल्याच्या पावत्या’ चालू करणे पहा.)

‘वाचल्याच्या पावत्या’ बंद करणे

तुम्ही इतरांचे संदेश उघडले आहेत हे त्यांना कळू देऊ नये असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही ‘वाचल्याच्या पावत्या’ बंद करू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘संदेश’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘वाचल्याच्या पावत्या पाठवणे’ बंद करा.

नोट : ही कृती केवळ त्या संपर्कांबरोबरच्या संभाषणांवर परिणाम करते ज्यांच्या ‘वाचल्याच्या पावत्या’ तुम्ही वैयक्तिकरित्या कधीही चालू केल्या नाहीत. (खालील एका व्यक्तीसाठी ‘वाचल्याच्या पावत्या’ बंद करणे पहा.)

एका व्यक्तीसाठी ‘वाचल्याच्या पावत्या’ चालू करणे

तुम्ही सामान्यतः ‘वाचल्याच्या पावत्या’ बंद केल्या असल्या तरीही, प्राप्तकर्त्यांना तुम्ही त्यांचे इनकमिंग संदेश कधी पाहिले आहेत हे कळवण्यासाठी तुम्ही संभाषणात ‘वाचल्याच्या पावत्या’ चालू करू शकता.

  1. तुमच्या iPad वर संदेश ॲपवर जा.

  2. संभाषणावर टॅप करा, नंतर संभाषणाच्या शीर्षस्थानी असलेल्या संपर्क आयकॉनवर टॅप करा.

  3. ‘वाचल्याच्या पावत्या पाठवणे’ चालू करा.

एका व्यक्तीसाठी ‘वाचल्याच्या पावत्या’ बंद करणे

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी ‘वाचल्याच्या पावत्या’ चालू केल्या, परंतु त्यांनी ‘वाचल्याच्या पावत्या’ प्राप्त करणे थांबवावे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्या एका संपर्कासाठी सेटिंग बंद करू शकता.

  1. तुमच्या iPad वर संदेश ॲपवर जा.

  2. संभाषणावर टॅप करा, नंतर संभाषणाच्या शीर्षस्थानी असलेल्या संपर्क आयकॉनवर टॅप करा.

  3. ‘वाचल्याच्या पावत्या पाठवणे’ बंद करा.

तुमचे संदेश दुसऱ्या कोणी पाहिल्यावर वाचल्याच्या पावत्या मिळवणे

तुम्ही तुमच्याशिवाय इतर कोणासाठीही ‘वाचल्याच्या पावत्या’ चालू करू शकत नाही. तुमचे संदेश उघडल्यावर वाचल्याच्या पावत्या प्राप्त करण्यासाठी, प्राप्तकर्त्याला त्या चालू करण्यास सांगा. वरील एका व्यक्तीसाठी ‘वाचल्याच्या पावत्या’ चालू करणे पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.