ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर पॉडकास्ट ट्रान्सक्रिप्ट बघणे

पॉडकास्ट ॲपमध्ये तुम्ही एपिसोड ट्रान्सक्रिप्ट बघू आणि सर्च करू शकता.

नोट : ट्रान्सक्रिप्टची उपलब्धता भाषेनुसार आणि देश किंवा प्रदेशानुसार बदलू शकते. iPhone आणि iPad वर Apple Podcasts मधील शोज फॉलो करा आणि प्ले करा ह्यावर सपोर्ट लेख पहा.

ट्रान्सक्रिप्ट्स बघणे

  1. तुमच्या iPad वर ‘पॉडकास्ट’ ॲपवर जा.

  2. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • एपिसोडची माहिती बघताना : ‘ट्रान्सक्रिप्ट’ विभागामध्ये खाली स्क्रोल करा. तुम्ही अधिक बटण वर टॅप देखील करू शकता, त्यानंतर ’ट्रान्सक्रिप्ट बघा’ वर टॅप करा.

    • मिनीप्लेअर किंवा ‘आता प्ले होत आहे’ स्क्रीनवरून : ’ट्रान्सक्रिप्ट बघा’ बटण वर टॅप करा.

पूर्ण स्क्रीन व्हिडिओ मोडमध्ये बघताना ट्रान्सक्रिप्ट्स उपलब्ध नाहीत. त्याऐवजी, तुम्ही ‘कॅप्शन’ बटण वर टॅप करू शकता (उपलब्ध असल्यास).

तुम्ही ट्रान्सक्रिप्टससह अनेक प्रकारे संवाद साधू शकता. स्टॅटिक ट्रान्सक्रिप्ट व्ह्यूमध्ये, तुम्ही टेक्स्ट सिलेक्ट करू शकता आणि त्या पॉइंटपासून प्ले करायचे, कॉपी करायचे किंवा शेअर करायचे हे निवडू शकता. प्ले होत असलेल्या स्क्रीनवरील स्क्रोल होणाऱ्या ट्रान्सक्रिप्टमध्ये, तुम्ही एपिसोडमधील त्या पॉइंटवर जाण्यासाठी कोणत्याही परिच्छेदावर टॅप करू शकता किंवा त्या पॉइंटपासून शेअर करण्यासाठी परिच्छेदावर टच करून होल्ड करू शकता.

‘आता प्ले होत आहे’ स्क्रीनवर ट्रान्सक्रिप्ट लपवण्यासाठी, खाली स्वाइप करा, नंतर व्हॉल्यूम स्लायडरच्या खाली ’ट्रान्सक्रिप्ट लपवा’ बटण वर टॅप करा.

ट्रान्सक्रिप्ट्स सर्च करणे

  1. तुमच्या iPad वर ‘पॉडकास्ट’ ॲपवर जा.

  2. ट्रान्सक्रिप्ट बघताना, पुढीलपैकी एक करा :

    • ’आता प्ले होत आहे’ स्क्रीनवरून : ट्रान्सक्रिप्टवर ‘वर’ स्वाइप करा, त्यानंतर ’सर्च करा’ वर टॅप करा.

    • एपिसोड्सच्या माहिती किंवा ’पुढील’ विभागातून : ’ट्रान्सक्रिप्ट सर्च करा’ बटण वर टॅप करा.

  3. पर्याय म्हणून, सर्च परिणामांमध्ये संपूर्ण शब्द किंवा कॅपिटलाइझेशन जुळणे आवश्यक आहे का हे उल्लेखित करण्यासाठी ‘सर्च’ फील्डमध्ये ‘सर्च पर्याय’ बटण वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.