ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ’आरोग्य’ मध्ये तुमच्या औषधांचा मागोवा घेणे

तुम्ही घेत असलेली औषधे, जीवनसत्त्वे आणि पूरके ह्यांचा तुम्ही मागोवा घेऊ शकता आणि ती मॅनेज करू शकता.

Siri : सपोर्ट असलेल्या मॉडेल्सवर, “Log my 6AM medications as taken” ह्यासारखे काहीतरी Siri ला सांगा (सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नाही). Siri कसे वापरायचे ते जाणून घ्या.

’आरोग्य’ मधील ‘औषध’ स्क्रीन औषधांसाठीचा दिनांक आणि लॉग दर्शवित आहे.

नोट : काही फीचर सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाहीत. मेडिकेशन फीचर हा व्यावसायिक वैद्यकीय निर्णयाला पर्याय नाही. तुमच्या औषधोपचाराच्या लेबलवर अतिरिक्त माहिती उपलब्ध आहे. तुमच्या आरोग्याशी संबंधित कोणताही निर्णय घेण्याआधी तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घ्या.

नवीन औषध समाविष्ट करणे आणि शेड्यूल करणे

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘औषधे’ वर टॅप करा.

  3. ’औषध समाविष्ट करा’ वर (तुमची यादी सुरू करण्यासाठी) किंवा ’औषध समाविष्ट करा’ (तुमच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी) वर टॅप करा.

  4. औषध ओळखण्यासाठी, ‘टेक्स्ट फिल्ड’ वर टॅप करा, नाव प्रविष्ट करा आणि नंतर ‘औषध’ वर टॅप करा.

    केवळ यू.एस. मध्ये, तुम्ही टाइप करणे सुरू करताच सूचना दिसतील. तुम्ही सूचना सिलेक्ट करू शकता किंवा नाव टाइप करणे पूर्ण करू शकता, नंतर ‘समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  5. पुढील गोष्टी करा :

    • औषधाचा प्रकार निवडा : पर्यायावर टॅप करा, त्यानंतर ’पुढील’ वर टॅप करा.

    • औषधाची स्ट्रेंथ निवडा : पर्यायावर टॅप करा, त्यानंतर ’पुढील’ वर टॅप करा.

    • शेड्यूल सेट करा : तुमच्या शेड्यूल केलेल्या औषधाची वारंवारता आणि कालावधी सेट करण्यासाठी ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा, त्यानंतर ‘पुढील’ वर टॅप करा.

      “तुम्ही हे कधी घेणार आहात” ह्याखालील ‘बदला’ वर टॅप करा वेगळा शेड्यूल प्रकार निवडण्यासाठी, जसे की ‘ऋतुचक्राचे शेड्यूल’ किंवा ‘दर काही दिवसांनी’.

    • आकार निवडा (ऐच्छिक) : पर्यायावर टॅप करा, त्यानंतर ’पुढील’ वर टॅप करा.

    • रंग निवडा (ऐच्छिक): पर्यायावर टॅप करा, त्यानंतर ’पुढील’ वर टॅप करा.

  6. तुमचे काम झाल्यावर, ’पूर्ण’ वर टॅप करा.

‘फॉलो अप रिमाइंडर’ आणि ‘गंभीर अलर्ट्स’ चालू करणे

जर तुम्ही औषधाचे शेड्यूल सेट केले, तर तुम्हाला आरोग्य ॲपवरून नोटिफिकेशन प्राप्त होतात, जे तुम्हाला औषध लॉग करण्याची आठवण करून देतात. जर शेड्यूल केलेल्या वेळेच्या 30 मिनिटांनंतर औषध लॉग केले गेले नसेल तर तुम्ही फॉलो अप रिमाइंडर प्राप्त करू शकता.

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘औषधे’ वर टॅप करा.

  3. स्क्रीनच्या तळाशी असलेल्या ‘पर्याय’ वर टॅप करा, त्यानंतर ‘रिमाइंडर फॉलो अप करा’ चालू करा.

    जेव्हा तुम्ही ‘फॉलो अप रिमाइंडर’ चालू करता, तेव्हा तुम्ही तुमच्या प्रत्येक औषधासाठी ‘गंभीर अलर्ट्स’ देखील चालू करू शकता. ‘लॉक स्क्रीन’ वर ‘गंभीर अलर्ट’ दिसतात आणि ध्वनी प्ले करतात (‘फोकस’ चालू असेल किंवा iPad म्यूट केला गेला असेल तरीही).

  4. ‘गंभीर अलर्ट्स’ वर टॅप करा, औषधाच्या पुढील बटणावर टॅप करा, नंतर ‘अनुमती द्या’ वर टॅप करा.

    ‘गंभीर अलर्ट्स’ बंद करण्यासाठी, सेटिंग  > ॲप > आरोग्य > ‘नोटिफिकेशन’ वर जा, नंतर ‘गंभीर अलर्ट्स’ च्या पुढील बटणावर टॅप करा.

औषधाचे शेड्यूल बदलणे किंवा इतर माहिती अपडेट करणे

’आरोग्य’ मध्ये ‘औषध’ स्क्रीनवर औषधाचे शेड्युल बदलण्याचे पर्याय दिसत आहेत.
  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘औषधे’ वर टॅप करा.

  3. ‘तुमची औषधे’ मध्ये खाली स्क्रोल करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • औषधाचे शेड्यूल बदला : औषधावर टॅप करा, खाली ‘शेड्यूल’ वर स्क्रोल करा, ‘संपादित करा’ वर टॅप करा, नंतर फील्ड बदलण्यासाठी फील्डवर टॅप करा.

    • औषधाचे आयकॉन, टोपणनाव किंवा नोट्स बदला : औषधावर टॅप करा, खाली ‘तपशील’ वर स्क्रोल करा, आयकॉन बदलण्यासाठी ‘संपादित करा’ वर टॅप करा किंवा टेक्स्ट फील्डपैकी एकावर टॅप करा, नंतर तुमचे बदल करा.

    • तुमची यादी रीऑर्डर करा : तुमच्या औषधांच्या यादीच्या वर ‘संपादित करा’ वर टॅप करा, औषधासाठी ‘रीऑर्डर करा’ बटण वर टच आणि होल्ड करा, त्याला नवीन स्थानावर ड्रॅग करा, त्यानंतर पूर्ण बटण वर टॅप करा.

    • औषध संग्रहित करा : औषधावर टॅप करा, खाली स्क्रोल करा, नंतर ‘औषध संग्रहित करा’ वर टॅप करा.

    • तुमच्या औषधांच्या यादीमध्ये संग्रहित केलेले औषध पुन्हा दाखवा : तुमच्या औषधांच्या यादीच्या वर ‘संपादित करा’ वर टॅप करा, नंतर औषधाच्या नावापुढे ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, नंतर पूर्ण बटण वर टॅप करा. तुम्ही आधी सेट केलेले कोणतेही शेड्यूल जतन केले जात नाही.

    • औषध हटवा : औषधावर टॅप करा, खाली स्क्रोल करा, नंतर ‘औषध हटवा’ वर टॅप करा.

    • तुम्ही औषधे घेण्याविषयी नोटिफिकेशन कसे प्राप्त करता ते बदला : नोटिफिकेशन बघा आणि त्यांना प्रतिसाद द्या आणि नोटिफिकेशन सेटिंग बदला पहा.

जेव्हा तुम्ही औषध घेता तेव्हा लॉग करणे

तुम्ही एखादे औषध, शेड्यूल केलेले किंवा शेड्यूल न केलेले, कधीही लॉग करू शकता. डिफॉल्टनुसार, तुमचा iPad तुम्ही आरोग्य ॲपमध्ये तयार केलेल्या शेड्यूलच्या आधारावर तुमची औषधे लॉग करण्याची वेळ झाल्यावर तुम्हाला आठवण करून देईल.

नोट : तुमचा आरोग्य ॲप डेटा डिव्हाइसेस दरम्यान सिंक करण्यासाठी, ते त्याच Apple अकाउंट मध्ये साइन इन केलेले असल्याची, इंटरनेटशी कनेक्ट केलेले असल्याची आणि OS च्या नवीनतम व्हर्जनवर अपडेट केलेले असल्याची खात्री करा.

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘औषधे’ वर टॅप करा.

  3. स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेला दिवस सिलेक्ट करा.

  4. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • तुम्ही शेड्यूल केलेले औषध घेतले आहे का ते लॉग करा : ‘लॉग’ च्या खाली दिलेल्या यादीतील औषधाच्या नावावर टॅप करा, नंतर औषधाच्या खाली, ‘घेतले’ किंवा ‘वगळले’ वर टॅप करा.

    • शेड्यूल न केलेले औषध लॉग करा : ‘लॉग’ च्या खाली दिलेल्या यादीमध्ये ‘आवश्यक औषधे’ वर टॅप करा, त्यानंतर औषधाच्या खाली, ‘घेतले’ वर टॅप करा.

  5. तुमचे काम झाल्यावर, ’पूर्ण’ वर टॅप करा.

टिप : जेव्हा तुम्हाला शेड्यूल केलेले औषध लॉग करण्यासाठी नोटिफिकेशन प्राप्त होते, तेव्हा नोटिफिकेशनवर दाबा आणि होल्ड करा, त्यानंतर पर्याय निवडा.

तुमचे औषध घेण्याची हिस्ट्री रिव्ह्यू करण्यासाठी ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, ‘औषधे’ वर टॅप करा, नंतर औषधावर (तुमच्या औषधांच्या यादीमध्ये) टॅप करा.

तुमची औषधांची यादी शेअर करणे

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर तुमची यादी (किंवा फक्त विशिष्ट औषधे) शेअर करा : ’आरोग्य’ मध्ये तुमचा डेटा शेअर करा पहा.

      टिप : तुम्ही शेअर करणे सुरू केल्यानंतर तुम्ही नवीन औषध समाविष्ट केल्यास, ते तुमच्या शेअर केलेल्या यादीमध्ये समाविष्ट करा.

    • तुमची यादी PDF स्वरूपात शेअर करा : ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, ‘औषधे’ वर टॅप करा, खाली स्क्रोल करा, ‘PDF एक्सपोर्ट करा’ वर टॅप करा, ‘शेअर करा’ बटण वर टॅप करा, नंतर पर्याय निवडा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.