iPad वर ‘प्रिव्ह्यू’ ॲपमध्ये इमेज संपादित करणे

तुम्ही ’प्रिव्ह्यू’ ॲपमध्ये इमेज क्रॉप, रोटेट किंवा फ्लिप करू शकता. तुम्ही बॅकग्राउंड देखील काढून टाकू शकता किंवा इमेजचा आकार ॲडजस्ट करू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘प्रिव्ह्यू’ ॲपवर जा.

  2. इमेज उघडा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • इमेज क्रॉप करा : ‘क्रॉप करा’ बटण वर टॅप करा. क्षेत्र सिलेक्ट करण्यासाठी निळ्या रंगाचे हॅंडल्स ड्रॅग करा, सिलेक्ट केलेल्या क्षेत्रावर टॅप करा, त्यानंतर ’क्रॉप करा’ वर टॅप करा.

    • इमेज फिरवा : ‘डावीकडे फिरवा’ बटण वर टॅप करा. तुम्ही अधिक बटण वर देखील टॅप करू शकता, त्यानंतर ’डावीकडे फिरवा’ किंवा ’उजवीकडे फिरवा’ निवडा.

    • इमेज फ्लिप करा : अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ’आडवे फ्लिप करा’ किंवा ’उभे फ्लिप करा’ निवडा.

    • बॅकग्राउंड काढून टाका : अधिक बटण वर टॅप करा, नंतर ‘बॅकग्राउंड काढून टाका’ वर टॅप करा.

    • इमेजचा आकार ॲडजस्ट करा : अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ’आकार ॲडजस्ट करा’ वर टॅप करा. पर्याय निवडा, नंतर ’पूर्ण’ वर टॅप करा.

बदल पूर्ववत करण्यासाठी, अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ’पूर्ववत करा’ निवडा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.