ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘Mail’ मध्ये ड्राफ्ट जतन करणे

तुम्ही नंतर पूर्ण करण्यासाठी ड्राफ्ट जतन करू शकता किंवा नवीन ईमेल संदेश लिहिताना अस्तित्वात असलेला संदेश पाहू शकता.

नंतरच्या काळासाठी ड्राफ्ट जतन करणे

  1. तुमच्या iPad वरील Mail ॲपवर जा.

  2. तुम्ही लिहित असलेल्या संदेशामध्ये, ‘बंद करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ’ड्राफ्ट जतन करा’ वर टॅप करा.

    तुम्ही ड्राफ्ट म्हणून जतन केलेल्या संदेशावर काम पुन्हा सुरू करण्यासाठी, लिहा बटण वर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ड्राफ्ट सिलेक्ट करा.

टिप : तुम्ही तुमच्या iPad आणि तुमच्या Mac दरम्यान अपूर्ण राहिलेले ईमेलदेखील हाताळू शकता. iPad आणि तुमच्या इतर डिव्हाइसेस दरम्यान टास्क हॅण्ड ऑफ करणे पहा.

तुम्ही संदेश लिहित असताना दुसरा संदेश बघणे

तुम्ही एकाच वेळी अनेक Mail विंडोज बघू शकता. ॲपमध्ये विंडोज उघडा आणि बघा पहा.

तुमचे सध्याचे सर्व संदेश ड्राफ्ट बघणे

तुमच्याकडे अनेक ईमेल अकाउंट असल्यास, तुम्ही तुमचे सर्व संदेश ड्राफ्ट्स ॲक्सेस करण्यासाठी ’सर्व ड्राफ्ट’ मेलबॉक्सचा वापर करू शकता.

  1. तुमच्या iPad वरील Mail ॲपवर जा.

  2. वरच्या डाव्या कोपऱ्यातील ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप करा.

  3. यादीच्या शीर्षस्थानी ’संपादित करा’ वर टॅप करा, त्यानंतर ’सर्व ड्राफ्ट’ मेलबॉक्स सुरू करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.