ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ऑटोमॅटिकली पासवर्ड भरण्यापासून तुम्ही वगळलेली संकेतस्थळे पहा

जेव्हा तुम्ही संकेतस्थळासाठी पासवर्ड प्रविष्ट करता, तेव्हा तुम्हाला पासवर्ड जतन करायचा आहे का आणि भविष्यात ऑटोमॅटिकली प्रविष्ट करायचा आहे का, असे विचारले जाते. तुम्ही पासवर्ड कधीही जतन न करण्याचा पर्याय निवडला असेल अशी सर्व संकेतस्थळे पाहू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘पासवर्ड’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘पासवर्ड जतन करा’ च्या खाली “वगळलेली संकेतस्थळे दाखवा” वर टॅप करा.

    तुम्ही ज्या संकेतस्थळांसाठी तुमचा पासवर्ड जतन न करण्याचा पर्याय निवडला आहे, त्या सर्व संकेतस्थळांचा समावेश या यादीत होतो.

    टिप : तुम्ही यादीतून संकेतस्थळ काढून टाकू शकता. संकेतस्थळावर डावीकडे स्वाइप करा किंवा ‘सर्व काढून टाका’ वर टॅप करा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही संकेतस्थळासाठी तुमचा पासवर्ड प्रविष्ट कराल, तेव्हा तुम्हाला पासवर्ड जतन करायचा आहे का आणि भविष्यात ऑटोमॅटिकली प्रविष्ट करायचा आहे का, हे विचारले जाईल.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.