ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad शी संवाद साधण्यासाठी मूलभूत जेस्चर जाणून घेणे

‘टॅप करा’, ‘टच आणि होल्ड करा’, ‘स्वाइप करा’, ‘स्क्रोल करा’ आणि ‘झूम करा’ अशा काही सोप्या जेस्चरचा वापर करून iPad आणि त्याचे ॲप्स नियंत्रित करा.

चिन्ह

जेस्चर

टॅप जेस्चरचे चिन्ह असलेला आयकॉन.

टॅप करा. एका बोटाने स्क्रीनवरील आयटमवर हळूच टच करा. उदाहरणार्थ, ॲप उघडण्यासाठी, होम स्क्रीनवर त्याच्या आयकॉनवर टॅप करा.

टच आणि होल्ड जेस्चरचे चिन्ह असलेला आयकॉन.

टच आणि होल्ड करा. काहीही घडत नाही तोपर्यंत स्क्रीनवरील आयटम दाबा. उदाहरणार्थ, तुम्ही होम स्क्रीनच्या वॉलपेपरवर टच आणि होल्ड केल्यास, ॲप आयकॉन हलायला लागतात.

टॅप जेस्चरचे चिन्ह असलेला आयकॉन.

स्वाइप करा. एक बोट स्क्रीनवर वेगाने मूव्ह करा. उदाहरणार्थ, अधिक ॲप पाहण्यासाठी होम स्क्रीनवर डावीकडे स्वाइप करा.

स्क्रोल जेस्चरचे चिन्ह असलेला आयकॉन.

स्क्रोल करा. एक बोट न उचलता संपूर्ण स्क्रीनवर मूव्ह करा. उदाहरणार्थ, अधिक पाहण्यासाठी ‘छायाचित्र’ मध्ये तुम्ही यादी ‘वर’ किंवा ‘खाली’ ड्रॅग करू शकता. त्वरित स्क्रोल करण्यासाठी स्वाइप करा; स्क्रोल करणे थांबवण्यासाठी स्क्रीनवर टच करा.

झूम जेस्चरचे चिन्ह असलेला आयकॉन.

झूम करा. स्क्रीनवर दोन बोटे एकमेकांच्या जवळ ठेवा. झूम इन करण्यासाठी त्यांना स्प्रेड करा किंवा झूम आउट करण्यासाठी त्यांना एकमेकांकडे मूव्ह करा.

झूम इन करण्यासाठी तुम्ही छायाचित्र किंवा वेबपृष्ठावर डबल टॅप देखील करू शकता आणि झूम आउट करण्यासाठी पुन्हा डबल टॅप करू शकता.

‘नकाशा’ मध्ये, डबल टॅप आणि होल्ड करा, नंतर झूम इन करण्यासाठी वर ड्रॅग करा किंवा झूम आउट करण्यासाठी खाली ड्रॅग करा.

तुम्ही Magic Trackpad किंवा Magic Mouse वापरत असल्यास, तुमच्या ट्रॅकपॅड किंवा माउसवर काम करणाऱ्या जेस्चरसाठी iPad साठी ट्रॅकपॅड जेस्चर किंवा iPad साठी माउस क्रिया आणि जेस्चर पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.