ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर व्हॉल्यूम ॲडजस्ट करणे

व्हॉल्यूम बटणे, Siri किंवा कंट्रोल सेंटर वापरून मीडिया, अलर्ट आणि ध्वनी इफेक्टचे व्हॉल्यूम समायोजित करा.

व्हॉल्यूम ॲडजस्ट करण्यासाठी व्हॉल्यूम बटणे किंवा Siri वापरणे

अलर्ट, ध्वनी प्रभाव, गाणी आणि इतर मीडियाचे व्हॉल्यूम ॲडजस्ट करण्यासाठी iPad वरील व्हॉल्यूम बटण वापरा. (व्हॉल्यूम बटणे तुमच्या मॉडेलनुसार तुमच्या डिव्हाइसच्या कोणत्याही एका बाजूला किंवा वरच्या बाजूला असतात.)

ऑडिओ अलर्ट आणि नोटिफिकेशन सायलेंट करण्यासाठी तुम्ही कंट्रोल सेंटर वापरू शकता.

नोट : ‘डू नॉट डिस्टर्ब’ हे संगीत, पॉडकास्ट, चित्रपट आणि TV शोमधील ऑडिओ म्यूट करत नाही.

तुम्ही व्हॉल्यूम वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी देखील Siri वापरू शकता.

Siri : “Turn up the volume.” ह्यासारखे काहीतरी Siri ला सांगा Siri कसे वापरायचे ते जाणून घ्या.

चेतावणी : श्रवणशक्ती कमी होणे टाळण्याबद्दलच्या महत्त्वाच्या माहितीसाठी, महत्वाची सुरक्षा माहिती पहा.

समोरून दाखवलेले दोन वेगवेगळे iPad मॉडेल. डाव्या बाजूच्या मॉडेलमध्ये वरच्या उजव्या बाजूच्या जवळ व्हॉल्यूम बटणे आणि वरच्या उजव्या बाजूला शीर्ष बटण आहे. उजव्या बाजूच्या मॉडेलमध्ये वरच्या डाव्या बाजूला व्हॉल्यूम बटणे आणि वरच्या उजव्या बाजूला शीर्ष/Touch ID बटणे आहेत.

रिंगर आणि अलर्ट व्हॉल्यूम लॉक करणे

सेटिंग  > ‘ध्वनी’ वर जा, नंतर ‘बटणाने बदला’ बंद करा.

कंट्रोल सेंटरमध्ये व्हॉल्यूम ॲडजस्ट करणे

जेव्हा iPad लॉक असेल किंवा तुम्ही ॲपचा वापर करत असाल, तेव्हा तुम्ही ‘कंट्रोल सेंटर’ मध्ये व्हॉल्यूम ॲडजस्ट करू शकता.

कंट्रोल सेंटर उघडा, नंतर व्हॉल्यूम स्लायडर वर ड्रॅग करा.

हेडफोनचा मोठा आवाज कमी करणे

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ’ध्वनी’ वर टॅप करा.

  3. ‘मोठा ऑडिओ कमी करा’ चालू करा.

नोट : तुम्ही कुटुंब सदस्यासाठी स्क्रीन टाइम सेट केलेला असल्यास, तुम्ही त्यांना मोठ्या ऑडिओची पातळी कमी करण्यापासून रोखू शकता. सेटिंग > स्क्रीन टाइम > ‘कॉण्टेण्ट व गोपनीयता निर्बंध’ वर जा, ‘कॉण्टेण्ट व गोपनीयता निर्बंध’ चालू करा, ‘मोठा ऑडिओ कमी करा’ वर टॅप करा, नंतर ‘अनुमती देऊ नका’ सिलेक्ट करा.

स्पीकर व्हॉल्यूम मर्यादित करणे

तुम्ही iPad च्या बिल्ट इन स्पीकरद्वारे प्ले होणाऱ्या ध्वनीचा कमाल व्हॉल्यूम मर्यादित करू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ’ध्वनी’ वर टॅप करा, त्यानंतर ’व्हॉल्यूम मर्यादा’ वर टॅप करा.

  3. ‘कमाल व्हॉल्यूम मर्यादित करा’ चालू करा, नंतर कमाल व्हॉल्यूम उल्लेखित करण्यासाठी स्लायडर ड्रॅग करा.

नोट : जर तुम्ही कुटुंब सदस्यासाठी स्क्रीन टाइम सेट अप केला, तर तुम्ही त्यांना स्पीकरची व्हॉल्यूम मर्यादा पातळी बदलण्यापासून रोखू शकता. सेटिंग > स्क्रीन टाइम > ‘कॉण्टेण्ट आणि गोपनीयता निर्बंध’ वर जा, ‘कॉण्टेण्ट आणि गोपनीयता निर्बंध’ चालू करा, ‘स्पीकर व्हॉल्यूम मर्यादा’ वर टॅप करा, नंतर ‘अनुमती देऊ नका’ सिलेक्ट करा.

ध्वनी म्यूट करणे

पुढीलपैकी कोणतेही एक करा :

  • ’व्हॉल्यूम डाउन’ बटण दाबा आणि होल्ड करा.

  • कंट्रोल सेंटर उघडा, नंतर ‘सायलेंट मोड’ चालू करण्यासाठी ‘सायलेंट मोड ऑफ करा’ बटण वर टॅप करा. बंद करण्यासाठी त्यावर पुन्हा टॅप करा.

‘डू नॉट डिस्टर्ब’ सुरू करून iPad सायलेंट करणे

तुम्ही ‘डू नॉट डिस्टर्ब’ चालू करून कॉल, अलर्ट आणि नोटिफिकेशन तात्पुरते सायलेंट करू शकता.

  1. कंट्रोल सेंटर उघडा.

  2. फोकसवर टॅप करा, नंतर ‘डू नॉट डिस्टर्ब’ वर टॅप करा.

    जेव्हा ‘डू नॉट डिस्टर्ब’ सुरू केले जाते, तेव्हा तुम्हाला इनकमिंग कॉल, टेक्स्ट किंवा नोटिफिकेशनसाठी रिंगटोन किंवा टेक्स्ट टोन ऐकू येणार नाहीत. तसेच स्क्रीनच्या वरच्या बाजूला स्टेटस बार मध्ये डिस्टर्ब करू नका आयकॉन दिसते.

Focus चालू करा किंवा शेड्यूल करा पहा.

iPad वर, हेडफोन ऑडिओ ऐकताना तुमची श्रवणशक्ती मोठ्या व्हॉल्यूमपासून सुरक्षित ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत. हेडफोन ऑडिओ-पातळी फीचर वापरा पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.