ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर तुमच्या ‘आवडते’ मधील पॉडकास्ट फॉलो करणे

जेव्हा तुम्हाला पॉडकास्ट ॲपमध्ये तुम्हाला आवडणारा शो आढळतो, तेव्हा त्याला तुमच्या लायब्ररीमध्ये समाविष्ट करण्यासाठी फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन एपिसोडबद्दल सूचित केले जाऊ शकते, प्लेबॅक ऑर्डर बदलली जाऊ शकते आणि बरेच काही केले जाऊ शकते.

पॉडकास्टला फॉलो करणे

जेव्हा तुम्ही पॉडकास्टला फॉलो करता, तेव्हा तो तुमच्या लायब्ररीमध्ये समाविष्ट केला जातो. तुम्ही तुमच्या इतर Apple डिव्हाइसवर किंवा Apple Podcasts ॲप वर फॉलो केलेले पॉडकास्ट तुम्ही ॲक्सेस करू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘पॉडकास्ट’ ॲपवर जा.

  2. शो शोधण्यासाठी सर्च करा किंवा ब्राउझ करा.

  3. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • सर्च परिणामांमधून : ‘फॉलो करा’ बटण वर टॅप करा.

    • शोची माहिती बघताना : ‘फॉलो करा’ वर टॅप करा.

      तुम्ही अधिक बटण वर देखील टॅप करू शकता, त्यानंतर ‘फॉलो करा’ वर टॅप करा.

    • एपिसोडची माहिती पाहताना किंवा ’आता प्ले होत आहे’ मधून : अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘शो फॉलो करा’ वर टॅप करा.

पॉडकास्टला अनफॉलो करणे

  1. तुमच्या iPad वर ‘पॉडकास्ट’ ॲपवर जा.

  2. साइडबारमध्ये, ’शोज’ वर टॅप करा.

  3. ‘शो’ वर टॅप करा, वरच्या उजव्या बाजूला चेक बटण वर टॅप करा, त्यानंतर ’शो अनफॉलो करा’ वर टॅप करा.

    किंवा शीर्षस्थानी उजव्या बाजूला अधिक बटण वर टॅप करा, नंतर ’अनफॉलो करा’ वर टॅप करा.

नवीन एपिसोडसाठी नोटिफिकेशन प्राप्त करणे

तुम्ही फॉलो करत असलेल्या पॉडकास्टचे नवीन एपिसोड उपलब्ध झाल्यावर सूचना मिळवा.

  1. तुमच्या iPad वर ‘पॉडकास्ट’ ॲपवर जा.

  2. मेन्यू बारमध्ये अकाउंट > अकाउंट सेटिंग निवडा.

  3. नोटिफिकेशनवर टॅप करा, त्यानंतर एक किंवा अधिक शोजसाठी ‘नोटिफिकेशन्सला अनुमती द्या’ सुरू किंवा बंद करा.

तुम्ही फॉलो करत असलेल्या शोसाठी प्लेबॅक गती आणि संवाद एन्हान्स करा सेटिंग कस्टमाइझ करा

  1. तुमच्या iPad वर ‘पॉडकास्ट’ ॲपवर जा.

  2. साइडबारमध्ये ‘शो’ वर टॅप करा, त्यानंतर शो सिलेक्ट करा. (तुम्ही फॉलो करत असलेल्या शो साठी तुम्ही सर्च किंवा ब्राउझ देखील करू शकता.)

  3. अधिक बटण वर टॅप करा, ’सेटिंग’ वर टॅप करा, त्यानंतर ’गती व ऑडिओ ॲडजस्टमेंट्स’ पर्यंत ‘खाली’ स्क्रोल करा.

  4. ह्या शोसाठी ’कस्टम’ निवडा, नंतर प्लेबॅक गती सिलेक्ट करा आणि ’संवाद एन्हान्स करा’ सुरू किंवा बंद करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.