ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर Safari ॲपमध्ये वैयक्तिक माहिती भरणे

iPad वर तुमची वैयक्तिक माहिती जतन करून, तुम्ही ऑटोमॅटिकली संपर्क माहिती आणि यूझरची नावे आणि पासवर्ड्स भरू शकता.

तुम्ही ऑटोमॅटिकली पेमेंटची माहिती भरू देखील शकता.

ऑटोफिल सेट अप करणे

ऑनलाइन फॉर्म भरणे जलद होण्यासाठी तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती तुमच्या iPad वर जतन करू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर Safari ॲपवर टॅप करा

  3. ’ऑटोफिल’ वर टॅप करा, त्यानंतर ’संपर्क माहिती वापरा’ सुरू करा.

  4. ’माझी माहिती’ वर टॅप करा, त्यानंतर तुमचे संपर्क कार्ड निवडा.

    जेव्हा तुम्ही Safari मधील वेबपृष्ठांवर ‘ऑटोफिल’ वर टॅप करता तेव्हा तुमच्या कार्डमधील संपर्क माहिती प्रविष्ट केली जाते.

तुमची संपर्क माहिती ऑटोमॅटिकली भरणे

ऑटोफिलचा वापर करून तुम्ही ऑनलाईन फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती त्वरित समाविष्ट करू शकता.

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. ऑटोफिलला सपोर्ट करणाऱ्या संकेतस्थळावरील फॉर्ममध्ये, रिक्त फील्डवर टॅप करा.

  3. कीबोर्डच्या वरील ‘संपर्क ऑटोफिल करा’ वर टॅप करा, त्यानंतर संपर्क सिलेक्ट करा.

  4. बदल करण्यासाठी कोणत्याही फील्डवर टॅप करा.

नोट : तुम्ही तुमच्या संपर्क यादीमधून दुसऱ्या व्यक्तीची माहिती प्रविष्ट करण्यासाठी ऑटोफिलचा वापर करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही भेटवस्तू खरेदी करत असाल आणि ती एखाद्या फ्रेंडला पाठवत असाल, तर तुम्ही त्यांचा पत्ता प्रविष्ट करण्यासाठी ऑटोफिल वापरू शकता. ‘संपर्क ऑटोफिल करा’ वर टॅप करा, ‘इतर संपर्क’ वर टॅप करा, त्यानंतर त्यांचे संपर्क कार्ड निवडा.

तुमचे पासवर्ड ऑटोमॅटिकली भरणे

जेव्हा तुम्ही संकेतस्थळांवर आणि ॲप्समध्ये सेवांसाठी साइन अप करता, तेव्हा तुम्ही iPad ला तुमच्या अनेक अकाउंटसाठी मजबूत पासवर्ड तयार आणि जतन करू देता. ऑटोमॅटिकली मजबूत पासवर्ड भरा पहा.

महत्त्वाचे : ‘सुरक्षित नाही’ चेतावणी असलेल्या संकेतस्थळांवर पासवर्ड कधीही प्रविष्ट करू नका. Safari सह ब्राउझिंग करताना जर तुम्हाला "सुरक्षित नाही" अशी चेतावणी दिसत असेल तर Apple सपोर्ट लेख पहा.

ऑटोफिल बंद करणे

तुम्ही तुमच्या संपर्क माहितीसाठी आणि पासवर्ड्ससाठी ‘ऑटोफिल’ बंद करू शकता. तुमच्या संपर्क माहिती सहज उपलब्ध होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल अशा परिस्थितीत हे उपयुक्त ठरते, उदाहरणार्थ, तुम्ही डिव्हाइस इतरांबरोबर शेअर करत असाल तर.

  • तुमच्या संपर्क माहितीसाठी ‘ऑटोफिल’ बंद करा : सेटिंग  > ॲप्स > Safari > ‘ऑटोफिल’ वर जा, त्यानंतर ‘संपर्क माहिती वापरा’ बंद करा.

  • पासवर्डसाठी ऑटोफिल बंद करा : सेटिंग  > सामान्य > ‘ऑटोफिल व पासवर्ड’ वर जा, त्यानंतर ‘पासवर्ड आणि पासकी ऑटोफिल करा’ बंद करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.