ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘नोट्स’ व्ह्यू बदलणे

‘नोट्स’ ॲपमध्ये तुमच्या नोट्स कशा दिसतात हे तुम्ही बदलू शकता. तुमच्या नोट्सवर लाइन किंवा ग्रिड समाविष्ट करा, तुमच्या नोट्स यादी किंवा गॅलरी म्हणून बघा, आणि सर्व अटॅचमेंट एकाच ठिकाणी पहा.

तुमच्या iPad वर ‘नोट्स’ डिस्प्ले बदलणे

  • पूर्ण स्क्रीनमध्ये नोट बघा : लॅंडस्केप ओरिएंटेशनमध्ये नोट बघताना, ‘फुल स्क्रीनमध्ये प्रवेश करा’ बटण वर टॅप करा किंवा iPad पोर्ट्रेट ओरिएंटेशनमध्ये फिरवा.

  • तुमचे अकाउंट्स, नोट्सची यादी आणि सिलेक्ट केलेली नोट एकाच वेळी पहा : iPad ला लॅण्डस्केप ओरिएंटेशनमध्ये फिरवा, नंतर ’साइडबार टॉगल करा’ बटण वर टॅप करा.

नोट्समध्ये रेषा किंवा ग्रिड दाखवा

  • सध्याच्या नोटमध्ये : ‘नोट कृती’ बटण वर टॅप करा, ‘लाइन्स व ग्रिड्स’ वर टॅप करा, नंतर ‘शैली’ निवडा.

  • सर्व नवीन नोट्समध्ये : सेटिंग  >अॅप्स >’नोट्स’ वर जा, ’लाइन्स व ग्रिड्स’ वर टॅप करा, नंतर ‘शैली’ निवडा.

यादी किंवा गॅलरी म्हणून नोट्स बघणे

नोट्स यादीमध्ये, ‘फोल्डर कृती’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ’यादी म्हणून बघा’ किंवा ’गॅलरी म्हणून बघा’ वर टॅप करा.

सर्व अटॅचमेंट बघणे

नोट्स यादीमध्ये, ‘फोल्डर कृती’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ’अटॅचमेंट्स बघा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.