ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वरील ‘स्क्रिनपासूनचे अंतर’ ह्याचा वापर करून तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यात मदत करणे

डिव्हाइस दीर्घकाळ खूप जवळून पाहिल्यास वयाने लहान असलेल्या यूझर्सना मायोपियाचा (निकटदृष्टिता) आणि सर्व वयोगटातील यूझर्सना डोळ्यांवर ताण येण्याचा धोका वाढू शकतो. ‘स्क्रीन टाइम’ मध्ये, तुम्ही iPad बराच काळ 12 इंचांहून कमी अंतरावर धरून ठेवता तेव्हा ते ओळखण्यासाठी ‘स्क्रीनपासूनचे अंतर’ हे फीचर TrueDepth कॅमेऱ्याचा (सपोर्ट करणारी मॉडेल्स) वापर करते आणि तुम्हाला तुमचे डिव्हाइस लांब धरण्यासाठी सांगते.

वयाने लहान असलेल्या यूझरच्या बाबतीत मायोपियाचा धोका कमी करण्यासाठी त्यांना आरोग्यदायी ठरतील, अशा पद्धतीने डिव्हाइस पाहण्याच्या सवयी ‘स्क्रिनपासूनचे अंतर’ या फीचरमुळे लागू शकतात. यामुळे, प्रौढ यूझरना डिजिटल वापरामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्याची संधी मिळते.

नोट : ‘स्क्रीनपासूनचे अंतर’ वापरण्यासाठी Face ID सेट अप करणे आवश्यक आहे. कौटुंबिक शेअरिंग गटातील 13 वर्षाखालील मुलांसाठी ‘स्क्रिनपासूनचे अंतर’ डिफॉल्टनुसार चालू केले जाते. (वय देश आणि प्रदेशानुसार बदलते.)

‘स्क्रिनपासूनचे अंतर’ चालू किंवा बंद करणे

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ’स्क्रीन टाइम’ वर टॅप करा.

    जर तुम्हाला तुमच्या अपत्यासाठी स्क्रीनपासूनचे अंतर चालू किंवा बंद करायचे असेल, तर तुमच्या अपत्याच्या नावावर टॅप करा.

  3. ‘स्क्रिनपासूनचे अंतर’ वर टॅप करा, त्यानंतर ‘स्क्रिनपासूनचे अंतर’ चालू किंवा बंद करा.

‘स्क्रिनपासूनचे अंतर’ चालू असताना, तुम्ही खूप जास्त वेळ स्क्रीन तुमच्या चेहऱ्याच्या जवळ धरता, तेव्हा ‘स्क्रिनपासूनचे अंतर’ हे एका अलर्टने स्क्रीन कव्हर करते आणि या अलर्टमुळे तुम्हाला स्क्रीन पाहत राहणे शक्य होत नाही. तुम्ही 12 इंचांपेक्षा जास्त अंतरावर iPad मूव्ह करता, तेव्हा तुम्ही त्याचा वापर पुन्हा सुरू करण्यासाठी ‘चालू ठेवा’ वर टॅप करू शकता.

तुम्ही iPad खूपच जवळ धरला आहे आणि तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही तो दूर मूव्ह करायला हवा, हे सांगणारी स्क्रीनवरील चेतावणी. चेतावणीमुळे संपूर्ण स्क्रीन कव्हर केली जाते, त्यामुळे तुम्ही स्क्रीन पाहणे सुरू ठेवू शकत नाही. तुम्ही तुमचा iPad सुरक्षित अंतरावर मूव्ह केल्यानंतर सक्रिय होणारे ‘चालू ठेवा’ हे बटण आहे.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.