iPad वर ‘Mail’ ॲपमधील ईमेल्सवर ॲक्शन्स ऑटोमॅटिकली लागू करण्यासाठी iCloud Mail नियम वापरा

विशिष्ट निकषांवर आधारित नवीन किंवा आधीच प्राप्त झालेले ईमेल्स ऑटोमॅटिकली मूव्ह करण्यासाठी, हटवण्यासाठी, फॉरवर्ड करण्यासाठी किंवा वाचलेले म्हणून चिन्हांकित करण्यासाठी तुम्ही नियम तयार करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही विशिष्ट प्रेषकाकडून आलेले ईमेल्स विशिष्ट फोल्डरमध्ये क्रमवार लावणारा नियम तयार करू शकता. तुम्ही ह्या नियमांना कधीही संपादित करू शकता आणि हटवू शकता.

नोट : इनकमिंग ईमेल्सवर नवीन किंवा बदललेले नियम लागू होण्यासाठी 15 मिनिटांपर्यंत वेळ लागू शकतो.

नियम तयार करणे

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा, नंतर iCloud वर टॅप करा.

  3. ‘iCloud वर जतन करण्यात आले’ च्या खाली, ‘Mail’ वर टॅप करा, ‘iCloud Mail नियम’ वर टॅप करा, नंतर ‘नियम समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  4. नवीन नियमासाठी नाव प्रविष्ट करा.

  5. तुम्हाला व्यवस्थापित करायचे असलेले ईमेल्सचे प्रकार उल्लेखित करण्यासाठी ‘संदेश’ च्या पुढील पॉप अप मेन्यू आणि टेक्स्ट फील्ड वापरा.

  6. नियमासाठी ॲक्शन उल्लेखित करण्यासाठी ‘कृती’ च्या पुढील पॉप अप मेन्यू वापरा.

  7. ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा.

महत्त्वाचे : जर तुम्ही फोल्डरला नियम लागू केले आणि नंतर फोल्डर हटवला किंवा त्याचे नाव बदलले, तर त्या फोल्डरसाठी नियम त्यानुसार अपडेट केल्याची खात्री करा. उदाहरणार्थ, तुम्ही हटवलेल्या फोल्डरमध्ये ईमेल्स फॉरवर्ड करू शकत नाही.

नियम बदलणे

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा, नंतर iCloud वर टॅप करा.

  3. ‘iCloud वर जतन करण्यात आले’ च्या खाली, ‘Mail’ ॲपवर टॅप करा, त्यानंतर ‘iCloud Mail नियम’ वर टॅप करा.

  4. ‘नियम’ वर टॅप करा, नंतर पॉप अप मेन्यूज आणि टेक्स्ट फील्डमध्ये नवीन अटी उल्लेखित करा.

  5. पूर्ण बटण वर टॅप करा.

नियम रीऑर्डर करणे

तुमच्याकडे अनेक नियम असल्यास, ते यादीमध्ये ज्या क्रमाने दिसतात त्याच क्रमाने लागू केले जातात.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा, नंतर iCloud वर टॅप करा.

  3. ‘iCloud वर जतन करण्यात आले’ च्या खाली, ‘Mail’ ॲपवर टॅप करा, त्यानंतर ‘iCloud Mail नियम’ वर टॅप करा.

  4. ‘संपादित करा’ वर टॅप करा.

  5. ग्रॅब बटण प्रेस आणि होल्ड करा, त्यानंतर यादीमध्ये नियम ‘वर’ किंवा ‘खाली’ ड्रॅग करा.

  6. पूर्ण बटण वर टॅप करा.

नियम हटवणे

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा, नंतर iCloud वर टॅप करा.

  3. ‘iCloud वर जतन करण्यात आले’ च्या खाली, ‘Mail’ ॲपवर टॅप करा, त्यानंतर ‘iCloud Mail नियम’ वर टॅप करा.

  4. ’संपादित करा’ वर टॅप करा, तुम्हाला हटवायच्या असलेल्या नियमाच्या पुढे हटवा बटण वर टॅप करा, नंतर ‘ट्रॅश करा’ बटण वर टॅप करा.

  5. पूर्ण बटण वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.