ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर वन टाइम पडताळणी कोड ऑटोमॅटिकली भरणे

काही संकेतस्थळे आणि ॲप टू फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रदान करतात (ज्यांना मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणून देखील ओळखले जाते), ज्यामुळे तुमचे पासवर्ड माहित असले तरीही इतर लोकांना तुमचे अकाउंट ॲक्सेस करण्यापासून रोखण्यात मदत होते. पासवर्ड हा पहिला आणि तात्पुरता ऑथेंटिकेशन फॅक्टर आहे, वन-टाइम पडताळणी कोड हे सामान्यतः दुसरे फॅक्टर आहेत. हे पडताळणी कोड iPad तुमच्या SMS संदेशांवर किंवा अतिरिक्त ॲपवर अवलंबून न राहता ऑटोमॅटिकली उत्पन्न करू शकतो.

QR कोड स्कॅन करून संकेतस्थळ किंवा ॲपसाठी ऑटोमॅटिक पडताळणी कोड सेट अप करणे

तुमच्याकडे संगणक किंवा iPhone सारखे स्क्रीन असलेले इतर डिव्हाइस असल्यास, तुम्ही त्याचा वापर संकेतस्थळ किंवा ॲपवरून QR कोड डिस्प्ले करण्यासाठी करू शकता, त्यानंतर कोड स्कॅन करण्यासाठी iPad कॅमेरा वापरा.

  1. तुमच्या इतर डिव्हाइसवर, तुम्ही तुमचे अकाउंट मॅनेज करता त्या संकेतस्थळ किंवा ॲपच्या भागात साइन इन करा, त्यानंतर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि ऑथेंटिकेटर ॲप एनेबल करण्यासाठी पर्याय सिलेक्ट करा.

    तुम्हाला ऑथेंटिकेटर ॲप सेट अप करण्यात मदत करण्यासाठी एक QR कोड दिसतो.

  2. iPad वर, QR कोड स्कॅन करण्यासाठी कॅमेरा वापरा.

  3. iPad वर, संकेतस्थळ किंवा ॲपसाठी तुमचा अकाउंट सिलेक्ट करा.

    पडताळणी कोड ‘यूझर नेम’ आणि ‘पासवर्ड’ फील्डच्या खाली दिसतो.

  4. तुमच्या इतर डिव्हाइसवर, तुमच्या iPad वर दिसणारा पडताळणी कोड प्रविष्ट करा.

सेटअप की प्रविष्ट करून संकेतस्थळ किंवा ॲपसाठी ऑटोमॅटिक पडताळणी कोड सेट अप करणे

तुम्ही दुसऱ्या स्क्रीनवरून QR कोड स्कॅन करू शकत नसल्यास, तुम्ही मॅन्युअली सेटअप ‘की’ प्रविष्ट करू शकता.

  1. तुम्ही तुमचे अकाउंट मॅनेज करता अशा संकेतस्थळ किंवा ॲपच्या भागात साइन इन करा, त्यानंतर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि ऑथेंटिकेटर ॲप एनेबल करण्यासाठी पर्याय सिलेक्ट करा.

  2. सेटअप की (किंवा सेटअप कोड किंवा तत्सम) मॅन्युअली वापरण्याचा पर्याय निवडा, त्यानंतर सेटअप की सिलेक्ट करा आणि कॉपी करा.

  3. तुमच्या iPad वरील पासवर्ड ॲपवर जा.

  4. ‘सर्व’ वर टॅप करा, त्यानंतर संकेतस्थळ किंवा ॲपसाठी तुमच्या अकाउंटवर टॅप करा.

  5. ’संपादित करा’ वर टॅप करा, त्यानंतर ‘कोड सेट अप करा’ वर टॅप करा.

  6. ‘सेटअप की’ मिळविण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या, ‘पासवर्ड’ ॲपमध्ये ‘सेटअप की’ प्रविष्ट करा, त्यानंतर ’सेटअप की वापरा’ वर टॅप करा.

    जर संकेतस्थळ QR कोड ऑफर करत असेल, तर तुम्ही त्याला टच आणि होल्ड करू शकता, त्यानंतर हे ऑटोमॅटिकली करण्यासाठी ‘पासवर्डमध्ये पडताळणी समाविष्ट करा’ निवडा.

संकेतस्थळावर किंवा ॲपमध्ये पडताळणी कोड वापरणे

  1. संकेतस्थळ किंवा ॲपमध्ये साइन इन करा.

  2. प्रॉम्प्ट मिळाल्यास, ऑथेंटिकेटर ॲप वापरण्यासाठी पर्याय सिलेक्ट करा.

  3. पडताळणी कोड विचारल्यास, कीबोर्डच्या वर दिसणाऱ्या सूचनांवर टॅप करा.

    कोणतीही सूचना दिसत नसल्यास, तुमच्या iPad वरील पासवर्ड ॲपवर जा, संकेतस्थळ किंवा ॲपसाठी तुमचा अकाउंट सिलेक्ट करा, पडताळणी कोडवर टॅप करा, नंतर ‘पडताळणी कोड कॉपी करा’ वर टॅप करा. संकेतस्थळ किंवा ॲपवर परत जा, नंतर फील्डमध्ये पडताळणी कोड पेस्ट करा.

वन टाइम पडताळणी कोड ऑटोमॅटिकली हटवणे

वन टाइम पडताळणी कोड ऑटोमॅटिकली भरले गेले आहेत, त्यामुळे तुम्हाला तुम्ही साइन इन करत असलेल्या संकेतस्थळ किंवा ॲपमधून बाहेर पडण्याची गरज नाही. ‘ऑटोफिल’ सह पडताळणी कोड प्रविष्ट केल्यानंतर तुम्ही त्यांना ऑटोमॅटिकली हटवण्याचा पर्याय निवडू शकता किंवा ठेवू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ’सामान्य’ वर टॅप करा, त्यानंतर ’ऑटोफिल व पासवर्ड’ वर टॅप करा.

  3. ‘पडताळणी कोड’ च्या खाली, ’वापरानंतर हटवा’ सुरू किंवा बंद करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.