iPad वरील ‘छायाचित्र’ ॲपमध्ये आठवणीचे चित्रपट प्ले करणे

तुमच्या ’आठवणींचा संग्रह’ मधील प्रत्येक आठवणीला ’चित्रपट’ म्हणून बघा जो संगीतावर सेट केलेला आहे. ‘छायाचित्र’ ॲपमध्ये तुमच्याकडे असलेले सर्व संग्रह आणि अल्बम्स आठवणीचा चित्रपट म्हणून देखील बघितले जाऊ शकतात जे तुम्ही तयार केल्याप्रमाणे बघू शकता किंवा अधिक वैयक्तिक बनवण्यासाठी संपादित करू शकता.

आठवणीचा चित्रपट प्ले करणे

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. ’संग्रह’ वर टॅप करा.

  3. तुमच्या आठवणींच्या सिलेक्शनमधून स्क्रोल करण्यासाठी ‘आठवणी’ अंतर्गत डावीकडे स्वाइप करा किंवा त्या सर्व बघण्यासाठी ‘आठवणी’ वर टॅप करा.

  4. आठवण प्ले करण्यासाठी आठवणी खाली उजव्या कोपऱ्यात ‘प्ले करा’ बटण वर टॅप करा.

  5. आठवणीचा चित्रपट प्ले होत असताना, तुम्ही पुढीलपैकी कोणतेही काम करू शकता :

    • पॉज करा : स्क्रीनवर टॅप करा, नंतर ‘पॉज करा’ बटण वर टॅप करा.

    • मागे किंवा पुढे जा : डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा. किंवा स्क्रीनवर टॅप करा, नंतर स्क्रीनच्या तळाशी डाव्या किंवा उजव्या बाजूला फ्रेम स्लाइड करा.

    • म्यूट करा : स्क्रीनवर टॅप करा, नंतर म्यूट बटण वर टॅप करा.

    • आठवण बंद करा : स्क्रीनवर टॅप करा, नंतर ‘बंद करा’ बटण वर टॅप करा.

अल्बम किंवा संग्रहातील आठवणीचा चित्रपट प्ले करणे

’छायाचित्र’ ॲपमध्ये तुमच्याकडे असलेले सर्व अल्बम्स आणि संग्रह आठवणीचे चित्रपट म्हणून बघितले जाऊ शकतात.

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. ’संग्रह’ वर टॅप करा.

  3. सध्याचा अल्बम किंवा संग्रह सिलेक्ट करा, नंतर आठवणीचा चित्रपट म्हणून छायाचित्रे आणि व्हिडिओज बघण्यासाठी ‘प्ले करा’ बटण वर टॅप करा.

    आठवणीच्या चित्रपटामध्ये बदल करण्यासाठी, तुमच्या आठवणी वैयक्तिकृत करा पहा.

    स्क्रॅचपासून आठवणीचा चित्रपट तयार करण्यासाठी, छायाचित्र अल्बम तयार करा, त्यानंतर त्याला आठवणीचा चित्रपट म्हणून बघण्यासाठी वरील सूचनांचे पालन करा.

जर Apple Intelligence* सुरू केलेले असेल, तर तुम्ही आठवणीचा चित्रपट तयार करू शकता. तुम्हाला पाहायचे असलेल्या स्टोरीचे वर्णन करा आणि Apple Intelligence सर्वोत्तम छायाचित्रे आणि व्हिडिओ शोधते, स्टोरीलाइन तयार करते आणि त्याला संगीतावर सेट करते. आठवणीतील चित्रपट तयार करणे पहा.

*Apple Intelligence बीटामध्ये पुढील भाषांच्या सपोर्टसह उपलब्ध आहे : इंग्रजी, डॅनिश, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, नॉर्वेजियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्वीडिश, तुर्की, चिनी (सरलीकृत), चिनी (पारंपारिक), जपानी, कोरियन आणि व्हिएतनामी. काही फीचर्स सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नसतील. भाषा आणि फीचर उपलब्धता आणि सिस्टीम आवश्यकतांविषयी अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.