ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘भिंग’ ॲपचा वापर करून तुमच्या आजूबाजूचे दरवाजे, लोक आणि फर्निचर ओळखणे

जर तुम्ही अंध असाल किंवा तुमची दृष्टी कमी असेल, तर तुम्ही iPad वर ‘भिंग’ ॲपचा वापर करून पुढील गोष्टींविषयी उपयुक्त माहिती मिळवू शकता :

  • दरवाजे, त्यांची वैशिष्ट्ये आणि ते कसे उघडायचे

  • लोक आणि शारीरिक किंवा सामाजिक अंतर राखण्यासाठी ते तुमच्या किती जवळ आहेत

  • फर्निचर, खुर्च्या किंवा सोफे आढळले आहेत का आणि त्यावर कुणी बसले आहे का

महत्त्वाचे : अधिक जोखीम किंवा आपत्कालीन परिस्थितीत, तुम्हाला हानी पोहोचू शकते किंवा तुम्ही जखमी होऊ शकता अशा परिस्थितीत किंवा नॅव्हिगेशनसाठी ‘डिटेक्शन मोड’ वर अवलंबून राहू नये. लोक, दरवाजे आणि फर्निचर ओळखणे फक्त सपोर्ट केलेल्या iPad मॉडेल्स वर उपलब्ध आहे.

'भिंग' ॲप उघडे आहे आणि दरवाजा ओळखला जात आहे. वर्णनावरून दरवाजा किती दूर आहे, ते समजते.

तुमच्या जवळचे दरवाजे, लोक आणि फर्निचर ओळखणे

  1. तुमच्या iPad वर 'भिंग' ॲपवर जा.

  2. ‘डिटेक्शन मोड’ सुरू करण्यासाठी ‘डिटेक्शन मोड’ बटण वर टॅप करा.

    जर तुम्हाला ‘डिटेक्शन मोड’ बटण दिसत नसेल, तर तुम्ही ते समाविष्ट करू शकता. कंट्रोल कस्टमाइझ करा पहा.

  3. ‘डिटेक्शन मोड’ बटण वर टच आणि होल्ड करा, नंतर पुढीलपैकी कोणतेही सिलेक्ट करा :

    • लोक

    • फर्निचर

    • दरवाजे

  4. रिअर कॅमेरा तुमच्या आजूबाजूचा परिसर ओळखू शकेल, अशा पद्धतीने iPad ठेवा. जेव्हा जवळपास दरवाजे, लोक किंवा फर्निचर आढळते, तेव्हा तुम्हाला ध्वनी, स्पीच फीडबॅकने सूचित केले जाते. जसजसे तुम्ही जवळ जाता, तसा फीडबॅक अधिक वारंवार दिला जातो.

    तुम्हाला ध्वनी किंवा स्पीच ऐकू येत नसल्यास, ‘सायलेंट मोड’ चालू नसल्याची खात्री करा. व्हॉल्यूम ॲडजस्ट करा पहा.

  5. डिटेक्शन तात्पुरते पॉज करण्यासाठी, दोन बोटांनी स्क्रीनवर डबल टॅप करा. डिटेक्शन पुन्हा सुरू करण्यासाठी दोन बोटांनी पुन्हा डबल टॅप करा. ‘डिटेक्शन मोड’ थांबवण्यासाठी, ‘डिटेक्शन मोड’ बटण वर टॅप करा.

दरवाजे ओळखण्यासाठी सेटिंग कस्टमाइझ करणे

  1. तुमच्या iPad वर 'भिंग' ॲपवर जा.

  2. सेटिंग बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘ओळखा’ वर टॅप करा.

  3. ‘दरवाजे’ वर टॅप करा, नंतर पुढीलपैकी काहीही एक कस्टमाइझ करा :

    • युनिट : मीटर किंवा फूट निवडा.

    • ध्वनी पिचचे अंतर : ध्वनी फीडबॅकचे अंतर ॲडजस्ट करण्यासाठी ‘कमी करा’ बटण किंवा वाढवा बटण वर टॅप करा. जेव्हा दरवाजा ह्या अंतरादरम्यान असल्याचे ओळखले जाते, तेव्हा ध्वनी फीडबॅकचा पिच वाढतो.

    • फीडबॅक : लेबल, ध्वनी आणि स्पीचचे कोणतेही संयोजन चालू करा. तुम्ही ‘स्पीच’ चालू केल्यास, iPad तुमच्या आणि दरवाज्यामधील अंतर किती आहे, ते सांगतो.

    • रंग : डिटेक्ट केलेल्या दरवाज्यांच्या आउटलाइनसाठी रंग सिलेक्ट करा.

    • दरवाज्याचे गुणधर्म : दरवाजाचा आकार, तो कसा उघडायचा ह्याची पद्धत आणि तो सध्या उघडा आहे किंवा नाही, अशा ओळखल्या गेलेल्या दरवाज्याच्या गुणधर्मांचे कोणतेही संयोजन चालू करा.

    • दरवाजाच्या सजावटी : ॲक्सेसिबल दार किंवा प्रसाधनगृहासाठीचे चिन्ह ह्यांसारख्या ओळखल्या गेलेल्या दरवाजावरील किंवा त्याच्या जवळील टेक्स्ट आणि चिन्हांबद्दल माहिती मिळविण्यासाठी ‘दरवाजा सजावटी’ चालू करा.

  4. तुमचे काम झाल्यावर, मागे बटण वर टॅप करा, त्यावर पुन्हा टॅप करा, नंतर पूर्ण बटण वर टॅप करा.

लोक ओळखण्यासाठी सेटिंग कस्टमाइझ करणे

  1. तुमच्या iPad वर 'भिंग' ॲपवर जा.

  2. सेटिंग बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘ओळखा’ वर टॅप करा.

  3. ‘लोक’ वर टॅप करा, नंतर पुढीलपैकी काहीही एक कस्टमाइझ करा :

    • युनिट : मीटर किंवा फूट निवडा.

    • ध्वनी पिचचे अंतर : ध्वनी फीडबॅकचे अंतर ॲडजस्ट करण्यासाठी ‘कमी करा’ बटण किंवा वाढवा बटण वर टॅप करा. जेव्हा लोक ह्या अंतरादरम्यान असल्याचे ओळखले जाते, तेव्हा ध्वनी फीडबॅकचा पिच वाढतो.

    • फीडबॅक : लेबल, ध्वनी आणि स्पीचचे कोणतेही संयोजन चालू करा. तुम्ही ‘स्पीच’ चालू केल्यास, iPad तुमच्या आणि दुसऱ्या व्यक्तीमधील अंतर किती आहे, ते सांगतो.

  4. तुमचे काम झाल्यावर, मागे बटण वर टॅप करा, त्यावर पुन्हा टॅप करा, नंतर पूर्ण बटण वर टॅप करा.

फर्निचर ओळखण्यासाठी सेटिंग कस्टमाइझ करणे

  1. तुमच्या iPad वर 'भिंग' ॲपवर जा.

  2. सेटिंग बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘ओळखा’ वर टॅप करा.

  3. ‘फर्निचर’ वर टॅप करा, नंतर पुढीलपैकी काहीही एक कस्टमाइझ करा :

    • युनिट : मीटर किंवा फूट निवडा.

    • ध्वनी पिचचे अंतर : ध्वनी फीडबॅकचे अंतर ॲडजस्ट करण्यासाठी ‘कमी करा’ बटण किंवा वाढवा बटण वर टॅप करा. जेव्हा फर्निचर ह्या अंतरादरम्यान असल्याचे ओळखले जाते, तेव्हा ध्वनी फीडबॅकचा पिच वाढतो.

    • फीडबॅक : लेबल, ध्वनी आणि स्पीचचे कोणतेही संयोजन चालू करा. तुम्ही ‘स्पीच’ चालू केल्यास, iPad तुमच्या आणि फर्निचरमधील अंतर किती आहे, ते सांगतो.

    • बसलेल्या लोकांची संख्या घोषित करा : खुर्च्या आणि सोफा ह्यावर बसलेल्या लोकांच्या संख्येबद्दल माहिती मिळवण्यासाठी ‘बसलेल्या लोकांची संख्या घोषित करा’ चालू करा.

  4. तुमचे काम झाल्यावर, मागे बटण वर टॅप करा, त्यावर पुन्हा टॅप करा, नंतर पूर्ण बटण वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.