iPad वर तुमच्या डायरीतील नोंदी बघणे आणि सर्च करणे

‘डायरी’ ॲपमध्ये, तुम्ही तुमच्या नोंदींमध्ये टेक्स्ट शोधू शकता आणि छायाचित्रे, रेखाचित्रे आणि स्थाने ह्यांसारखे तपशील फिल्टर करू शकता. तुम्ही नंतर पुन्हा भेट देण्यासाठी नोंदी बुकमार्क देखील करू शकता.

वरच्या उजव्या कोपऱ्यात ‘सर्च करा’ बटण असलेल्या डायरीच्या नोंदी दाखवणारी ‘डायरी’ ॲपमधील स्क्रीन.

तुमच्या डायरीतील नोंदी सर्च करणे

  1. तुमच्या iPad वरील ‘डायरी’ ॲप वर जा.

  2. डायरी निवडा किंवा ’सर्व नोंदी’ वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • विशिष्ट नोंदी शोधा : ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘छायाचित्रे’ किंवा ‘रेखाचित्रे’ ह्यासारखी श्रेणी निवडा किंवा तुम्ही शोधत असलेले टेक्स्ट टाइप करा.

    • नोंदी क्रमवार लावा : तुमच्या स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला, अधिक बटण वर टॅप करा, ’ह्यानुसार क्रमवार लावा’ वर टॅप करा, त्यानंतर ‘नोंद केलेल्याचा दिनांक’ किंवा ‘क्षण दिनांक’ निवडा.

    • विशिष्ट दिवसासाठी नोंदी शोधा : साइडबारमध्ये, ’इनसाइट्स’ वर टॅप करा, त्यानंतर दिनदर्शिकेवरील दिनांकावर टॅप करा.

स्थानानुसार नोंदी बघणे

तुम्ही तुमच्या नोंदी त्यांच्या स्थानानुसार नकाशा दृश्यासह पाहू शकता.

  1. तुमच्या iPad वरील ‘डायरी’ ॲप वर जा.

  2. साइडबारमध्ये ‘ठिकाणे’ वर टॅप करा.

  3. तुमच्या डायरीमध्ये परत येण्यासाठी ‘सर्व नोंदी’ वर टॅप करा.

    टिप : साइडबार उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी ’साइडबार टॉगल करा’ बटण वर टॅप करा.

स्थान किंवा स्थान माहिती असलेल्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या नोंदी, नकाशावर समाविष्ट केल्या जातात. फॉरमॅटिंग, छायाचित्रे आणि बरेच काही समाविष्ट करा पहा.

डायरीतील महत्त्वाच्या नोंदी बुकमार्क करणे

  1. तुमच्या iPad वरील ‘डायरी’ ॲप वर जा.

  2. डायरी निवडा किंवा ’सर्व नोंदी’ वर टॅप करा.

  3. नोंदीवर उजवीकडे स्वाइप करा, नंतर बुकमार्क बटण वर टॅप करा.

    अनेक नोंदी बुकमार्क करण्यासाठी, स्क्रीनच्या शीर्षस्थानी अधिक बटण वर टॅप करा, ‘नोंदी सिलेक्ट करा’ वर टॅप करा, त्यांना सिलेक्ट करण्यासाठी नोंदींवर टॅप करा, नंतर बुकमार्क बटण वर टॅप करा.

    टिप : केवळ बुकमार्क केलेल्या नोंदी पाहण्यासाठी, ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘बुकमार्क केलेले’ वर टॅप करा.

    डायरीतील नोंदी दाखवणारी ‘डायरी’ ॲपमधील स्क्रीन. एक नोंद उजवीकडे स्वाइप केली जाते आणि ‘बुकमार्क’ बटण दाखवले जाते.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.