ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर दुसऱ्या Apple डिव्हाइसवरून तुमचे Safari टॅब बघणे

तुम्ही तुमच्या इतर Apple डिव्हाइसेसवर उघडलेले टॅब बघू शकता आणि त्या सर्वांवर ‘टॅब’ आणि ‘टॅब गट’ अद्ययावत ठेवू शकता. तुमच्या त्या डिव्हाइसेसवर Safari टॅब मॅनेज करण्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व डिव्हाइसवर समान Apple अकाउंट वापरून iCloud मध्ये साइन इन करणे आवश्यक आहे.

तुमच्या इतर Apple डिव्हाइसवर उघडलेले टॅब बघणे

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर 'iCloud टॅब्ज' वर टॅप करा.

    दुसऱ्या Apple डिव्हाइसवर टॅब बंद करण्यासाठी, लिंकवर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘बंद करा’ निवडा.

तुमच्या डिव्हाइसवर टॅब आणि टॅब गट अपडेट ठेवणे

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा, नंतर iCloud वर टॅप करा.

  3. ‘सर्व पहा’ वर टॅप करा, त्यानंतर Safari ॲप सुरू केलेले असल्याची खात्री करा.

नोट : तुमच्या Mac वर उघडलेले टॅब देखील पाहण्यासाठी, तुम्ही तुमच्या Mac वर iCloud सेटिंगमध्ये Safari चालू केलेले असले पाहिजे, त्याच Apple अकाउंट मध्ये साइन इन केले असले पाहिजे, आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरले पाहिजे.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.