ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘शोधाशोध’ मध्ये थर्ड पार्टी आयटम समाविष्ट करणे किंवा अपडेट करणे

तुम्ही शोधाशोध ॲपसह विशिष्ट थर्ड पार्टी उत्पादने वापरू शकता. तुम्ही तुमच्या iPad चा वापर करून ह्या उत्पादनांची तुमच्या Apple अकाउंट वर नोंदणी करू शकता आणि ती हरवल्यास किंवा गहाळ झाल्यास ती शोधण्यासाठी ’शोधाशोध’ चा वापर करू शकता.

तुम्ही तुमचा आयटम मागे ठेवल्यास देखील तुम्हाला सूचित केले जाऊ शकते. iPad वर ’शोधाशोध’ मध्ये आयटम किंवा AirTag कुठेतरी विसरल्यास विलगीकरण अलर्ट्स सेट करणे पहा.

तुम्ही ‘शोधाशोध’ मध्ये AirTag देखील समाविष्ट करू शकता. iPad वर ’शोधाशोध’ मध्ये AirTag समाविष्ट करणे पहा.

थर्ड पार्टी आयटम समाविष्ट करणे

  1. तुमच्या iPad वर शोधाशोध ॲपवर वर जा.

  2. आयटम शोधण्यायोग्य करण्यासाठी उत्पादकाच्या सूचनांचे पालन करा.

  3. ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘इतर आयटम समाविष्ट करा’ निवडा.

  4. ‘कनेक्ट करा’ वर टॅप करा, नाव टाइप करा आणि इमोजी सिलेक्ट करा, त्यानंतर ‘चालू ठेवा’ वर टॅप करा.

  5. तुमच्या Apple अकाउंटमध्ये आयटमची नोंदणी करण्यासाठी ’चालू ठेवा’ वर टॅप करा, त्यानंतर ’समाप्त करा’ वर टॅप करा.

जर तुम्हाला आयटम समाविष्ट करण्यात समस्या येत असेल, तर उत्पादकाशी संपर्क करून ’शोधाशोध’ सपोर्ट केलेले आहे का पाहा.

जर आयटम दुसऱ्या कोणाच्या Apple अकाउंटमध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही ते समाविष्ट करण्यापूर्वी त्यांनी ते काढून टाकणे गरजेचे आहे. ‘शोधाशोध’ मधून AirTag किंवा इतर आयटम काढून टाका पहा.

आयटमचे नाव किंवा इमोजी बदलणे

  1. तुमच्या iPad वर शोधाशोध ॲपवर वर जा.

  2. स्क्रीनच्या तळाशी डावीकडे असलेल्या ‘आयटम’ वर टॅप करा, त्यानंतर ज्याचे नाव किंवा इमोजी तुम्हाला बदलायचे आहेत त्या आयटमवर टॅप करा.

  3. ’आयटमचे नाव बदला’ वर टॅप करा.

  4. नाव टाइप करण्यासाठी आणि इमोजी सिलेक्ट करण्यासाठी यादीमधून नाव निवडा किंवा कस्टम नाव निवडा.

  5. ‘पूर्ण’ वर टॅप करा.

तुमचा आयटम अद्ययावत ठेवणे

तुमचा आयटम अद्ययावत ठेवा जेणेकरून तुम्ही ‘शोधाशोध’ मधील सर्व फीचर वापरू शकाल.

  1. तुमच्या iPad वर शोधाशोध ॲपवर वर जा.

  2. स्क्रीनच्या तळाशी डावीकडे असलेल्या ‘आयटम’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला अपडेट करायचे असलेल्या आयटमवर टॅप करा.

  3. ‘अपडेट उपलब्ध’ वर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

    नोट : जर तुम्हाला ‘अपडेट उपलब्ध’ दिसत नसेल, तर तुमचा आयटम अद्ययावत आहे.

    आयटम अपडेट केला जात असताना, तुम्ही ‘माझे वैशिष्ट्ये शोधा’ वापरू शकत नाही.

एखाद्या आयटमचे तपशील बघणे

जेव्हा तुम्ही तुमच्या Apple अकाउंटमध्ये आयटमची नोंदणी करता, तेव्हा तुम्ही ’शोधाशोध’ चा वापर करून अनुक्रमांक किंवा मॉडेल ह्यासारखे त्याविषयीचे अधिक तपशील पाहू शकता. उत्पादकाकडून थर्ड पार्टी ॲप उपलब्ध असल्यास तुम्ही ते देखील पाहू शकता.

  1. तुमच्या iPad वर शोधाशोध ॲपवर वर जा.

  2. स्क्रीनच्या तळाशी डावीकडे असलेल्या ‘आयटम’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला ज्या आयटमविषयी अधिक तपशील पाहिजेत त्या आयटमवर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • तपशील बघा : ‘तपशील दाखवा’ वर टॅप करा.

    • थर्ड पार्टी ॲप प्राप्त करा किंवा उघडा : ॲप उपलब्ध असल्यास, तुम्हाला ॲप आयकॉन दिसेल. ॲप डाउनलोड करण्यासाठी ‘प्राप्त करा’ किंवा ‘डाउनलोड करा’ बटण वर टॅप करा. तुम्ही हे आधीच डाउनलोड केलेले असल्यास, तुमच्या iPad वर ते उघडण्यासाठी ‘उघडा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.