iPad वर ईमेल अकाउंट समाविष्ट करणे आणि काढून टाकणे

Mail ॲपचा वापर करून ईमेल पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी, तुम्ही वापरायचे असलेले ईमेल अकाउंट तुम्हाला समाविष्ट करावे लागतील. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ‘Mail’ उघडता, तेव्हा तुम्हाला अकाउंट सेट अप करण्यास सांगितले जाते. कोणत्याही वेळी, तुम्ही तुमच्या iPad मध्ये अतिरिक्त ईमेल अकाउंट समाविष्ट करू शकता किंवा तुम्हाला यापुढे गरज नसलेली ईमेल अकाउंट काढून टाकू शकता.

ईमेल अकाउंट समाविष्ट करणे

तुम्ही Mail ॲपमध्ये एक किंवा अधिक ईमेल अकाउंट समाविष्ट करू शकता जेणेकरून तुम्ही तुमचे सर्व ईमेल एकाच ठिकाणी प्राप्त करू शकाल आणि तुमच्या कोणत्याही अकाउंटमधून सहजपणे ईमेल पाठवू शकाल.

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘Mail’ ॲपवर टॅप करा.

  3. Mail अकाउंटवर टॅप करा, त्यानंतर ‘अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  4. तुमचा ईमेल ॲड्रेस प्रविष्ट करा, ’पुढील’ वर टॅप करा, त्यानंतर तुमच्या ईमेल अकाउंटची माहिती प्रविष्ट करा.

नोट : तुम्ही अनेक अकाउंट सेट अप केल्यास, तुमचा ईमेल संदेश तयार करताना तुम्हाला कोणत्या अकाउंटमधून पाठवायचे आहे ते तुम्ही निवडू शकता. वेगळ्या अकाउंटवरून ईमेल पाठवणे पहा.

तुमच्या ईमेल अकाउंटसाठी फेच शेड्यूल सेट करणे

जर तुम्ही Push नोटोफिकेशन्सला सपोर्ट करत नसलेले अकाउंट समाविष्ट केले, तर तुम्ही त्या अकाउंटसाठी नवीन ईमेल तपासण्यासाठी शेड्यूल सेट करू शकता.

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘Mail’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘Mail अकाउंट्स’ वर टॅप करा, नंतर ‘नवीन डेटा फेच करा’ वर टॅप करा.

  4. ’फेच’ च्या खाली, शेड्यूल निवडा.

    ‘ऑटोमॅटिकली’ डिफॉल्ट सिलेक्शन आहे, ज्याचा अर्थ असा आहे की तुमचा iPad चार्ज होत असताना आणि Wi-Fi ला कनेक्ट केलेला असताना नवीन डेटा डाउनलोड केला जातो. या अटींच्या बाहेर अधिक वेळा फेच करण्यासाठी, वेळेचे शेड्यूल निवडा.

ईमेल अकाउंट वापरणे तात्पुरते थांबवणे

जर तुम्हाला तुमच्या iPad वर अकाउंटवरून ईमेल पाठवणे आणि प्राप्त करणे तात्पुरते थांबवायचे असेल, तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन ते बंद करू शकता. तुम्ही ते कोणत्याही वेळी सहजपणे परत चालू करू शकता.

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘Mail’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘Mail अकाउंट्स’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला बंद करायच्या असलेल्या ईमेल अकाउंटवर टॅप करा.

  4. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • iCloud ईमेल अकाउंट बंद करा : ’ह्या iPad वर वापरा’ बंद करा.

    • दुसरे ईमेल अकाउंट बंद करा : ‘Mail’ बंद करा.

टिप : तुम्ही निवडलेल्या वेळेत केवळ विशिष्ट ईमेल अकाउंट्सकडून नोटिफिकेशन्स प्राप्त करण्यासाठी तुम्ही ‘फोकस’ फिल्टर्स वापरू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही आठवडा अखेर किंवा तुम्ही सुट्टीवर असताना तुमच्या कामाच्या ईमेल अकाउंटकडून येणारे नोटिफिकेशन्स सायलेंट करू शकता. iPad वर ‘फोकस’ सेट अप करणे पहा.

ईमेल अकाउंट हटवणे

तुम्ही Mail ॲपमधून आणि तुमच्या iPad वर वापरल्या जाणाऱ्या सर्व ॲपमधून ईमेल अकाउंट काढून टाकू शकता.

नोट : ही कृती ईमेल अकाउंट रद्द करत नाही; ती केवळ त्याला तुमच्या iPad वरून काढून टाकते. अकाउंट पूर्णपणे बंद करण्यासाठी, तुमच्या ईमेल अकाउंट प्रदात्याला भेट द्या.

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘Mail’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘Mail अकाउंट्स’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या ईमेल अकाउंटवर टॅप करा.

  4. ’साइन आउट करा’ किंवा ‘अकाउंट हटवा’ वर टॅप करा.

    नोट : जर तुम्ही नंतर तुमचा विचार बदलला, तर तुम्ही ईमेल अकाउंट तुमच्या iPad मध्ये परत समाविष्ट करू शकता. ईमेल अकाउंट समाविष्ट करा मधील पायऱ्यांचे पालन करा.

Mail ॲप तुमच्या होम स्क्रीनवर परत समाविष्ट करणे

जर तुम्हाला तुमच्या होम स्क्रीनवर Mail ॲप दिसत नसेल, तर तुम्ही ते ॲप लायब्ररीमध्ये शोधू शकता आणि ते पुन्हा समाविष्ट करू शकता.

  1. होम स्क्रीनवर, तुम्हाला ॲप लायब्ररी दिसेपर्यंत डावीकडे स्वाइप करा.

  2. सर्च फील्डमध्ये "Mail" प्रविष्ट करा.

  3. Mail ॲप आयकॉन टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘होम स्क्रीनमध्ये समाविष्ट करा’ वर टॅप करा.

तुमच्यासाठी होम स्क्रीन अगदी योग्य असावी म्हणून तिची पुनर्रचना करण्यासाठी ॲप आणि विजेट आसपास मूव्ह करणे पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.