ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर कीबोर्ड समाविष्ट करणे किंवा बदलणे

तुमच्या iPad वर विविध भाषांमध्ये लिहिण्यासाठी किंवा श्रुतलेखन वापरण्यासाठी, तुम्ही कीबोर्ड समाविष्ट करू शकता. तुम्ही तुमच्या ऑनस्क्रीन किंवा बाह्य कीबोर्डचे लेआउट देखील बदलू शकता.

जर तुम्ही इतर भाषांसाठी कीबोर्ड समाविष्ट केले, तर तुम्ही कीबोर्डमध्ये स्विच न करता दोन भाषांमध्ये टाइप करू शकता. तुम्ही सर्वात जास्त वापरत असलेल्या दोन भाषांमध्ये तुमचा कीबोर्ड ऑटोमॅटिकली स्विच होतो. (सर्व भाषांसाठी उपलब्ध नाही.)

दुसऱ्या भाषेसाठी कीबोर्ड समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे

  1. सेटिंग  > सामान्य > ‘कीबोर्ड’ वर जा.

  2. ‘कीबोर्ड’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • कीबोर्ड समाविष्ट करा : ‘नवीन कीबोर्ड समाविष्ट करा’ वर टॅप करा, त्यानंतर यादीमधून कीबोर्ड निवडा. अधिक कीबोर्ड समाविष्ट करण्यासाठी पुन्हा करा.

    • कीबोर्ड काढून टाका : ‘संपादित करा’ वर टॅप करा, तुम्हाला काढून टाकायचा आहे त्या कीबोर्डच्या पुढे असलेल्या हटवा बटण वर टॅप करा, ‘हटवा’ वर टॅप करा, त्यानंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा.

    • तुमची कीबोर्ड यादी रीऑर्डर करा : ‘संपादित करा’ वर टॅप करा, कीबोर्डच्या पुढे असलेल्या ‘रीऑर्डर करा’ बटण ला यादीमधील नवीन स्थानावर ड्रॅग करा, नंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा.

जर तुम्ही वेगळ्या भाषेसाठी कीबोर्ड समाविष्ट केला, तर संबंधित भाषा ऑटोमॅटिकली ‘प्राधान्यकृत भाषा क्रम’ ह्या यादीमध्ये समाविष्ट केली जाते. तुम्ही सेटिंग > सामान्य > ‘भाषा व प्रदेश’ मध्ये ही यादी बघू शकता आणि थेट त्या यादीत भाषा समाविष्ट करू शकता. ॲप आणि संकेतस्थळे टेक्स्ट कसे डिस्प्ले करतात हे बदलण्यासाठी तुम्ही यादी रीऑर्डर देखील करू शकता.

दुसऱ्या कीबोर्डवर स्विच करणे

  • ऑनस्क्रीन कीबोर्डवर : इमोजी बटण किंवा स्विच कीबोर्ड ‘की’ ला टच आणि होल्ड करा, नंतर तुम्हाला ज्या कीबोर्डवर स्विच करायचे आहे, त्याच्या नावावर टॅप करा.

    एका कीबोर्डवरून दुसऱ्या कीबोर्डवर स्विच करण्यासाठी तुम्ही इमोजी बटण किंवा स्विच कीबोर्ड ‘की’ वरदेखील टॅप करू शकता. एनेबल केलेले इतर कीबोर्ड ॲक्सेस करण्यासाठी टॅप करणे चालू ठेवा.

  • बाह्य कीबोर्डवर : ‘कंट्रोल’ दाबा आणि होल्ड करून ठेवा, नंतर इंग्रजी, इमोजी आणि दुसऱ्या भाषेसाठी तुम्ही समाविष्ट करता त्या इतर कीबोर्ड दरम्यान सायकल करण्यासाठी स्पेस बार दाबा.

    iPad साठी Magic Keyboard आणि Smart Keyboard सह, तुम्ही एका कीबोर्डवरून दुसऱ्या कीबोर्डवर स्विच करण्यासाठी स्विच कीबोर्ड ‘की’ दाबू शकता.

कीबोर्डला पर्यायी लेआउट असाइन करणे

तुम्ही पर्यायी कीबोर्ड लेआउट वापरू शकता जो तुमच्या कीबोर्डवरील ‘की’ शी जुळत नाही.

  1. सेटिंग  > सामान्य > कीबोर्ड > ‘कीबोर्ड’ वर जा.

  2. स्क्रीनच्या शीर्षस्थानी असलेल्या ‘भाषा’ वर टॅप करा, नंतर यादीमधून पर्यायी लेआउट सिलेक्ट करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.