ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर नोट्स एक्सपोर्ट करणे किंवा प्रिंट करणे

नोट्स ॲपमध्ये, तुम्ही Pages ॲपमध्ये नोट उघडू शकता आणि काम सुरू ठेवू शकता. तुम्ही नोट PDF म्हणून देखील एक्सपोर्ट करू शकता किंवा नोट प्रिंट करू शकता.

‘Pages’ मध्ये नोट उघडणे

  1. तुमच्या iPad मध्ये ‘Pages’ चे नवीनतम व्हर्जन असल्याची खात्री करा.

  2. तुमच्या iPad वर ‘नोट्स’ ॲपवर जा.

  3. तुम्हाला एक्सपोर्ट करायची असलेली नोट उघडा.

  4. शेअर बटण वर टॅप करा, नंतर ‘Pages मध्ये उघडा’ वर टॅप करा.

नोट : नोट लॉक केलेली असल्यास, नोटचा कॉण्टेंट ‘Pages’ वर एक्सपोर्ट करण्यापूर्वी तुम्ही ती अनलॉक करणे आवश्यक आहे. तुम्ही ‘Pages’ मध्ये रेखाचित्रे संपादित करू शकत नाही. स्कॅन केलेले डॉक्युमेंट आणि PDF ह्यासारखे कॉण्टेंट ‘Pages’ मध्ये थंबनेल इमेज म्हणून दिसतात. ‘Pages’ मध्ये टॅग, उल्लेख, चेकलिस्ट, आणि नोट्सच्या लिंक हे सक्रिय आयटम नसतात. नोट शेअर केलेली असल्यास, परिणामी Pages डॉक्युमेंट शेअर केले जात नाही.

PDF म्हणून नोट एक्स्पोर्ट करणे

नोटच्या अटॅचमेंटसाठी सध्याच्या व्ह्यू सेटिंगचा वापर करून तुम्ही नोटची PDF तयार करू शकता. अनेक पृष्ठ असलेल्या PDF किंवा स्कॅन केलेले डॉक्युमेंट असलेल्या नोटमध्ये, एक्सपोर्ट केलेल्या PDF मध्ये मूळ PDF किंवा स्कॅन केलेल्या डॉक्युमेंटचे केवळ पहिले पृष्ठ असते.

  1. तुमच्या iPad वर ‘नोट्स’ ॲपवर जा.

  2. तुम्हाला एक्सपोर्ट करायची असलेली नोट उघडा.

  3. शेअर बटण वर टॅप करा, नंतर ‘मार्कअप करा’ वर टॅप करा.

  4. गरजेप्रमाणे एक्सपोर्ट केलेल्या PDF मध्ये पृष्ठे मार्कअप करा, नंतर PDF जतन करण्यासाठी ‘झाले’ वर टॅप करा.

नोटला ‘मार्कडाउन फाइल’ म्हणून एक्सपोर्ट करणे

तुमच्या नोट्सना लेखन, कॉण्टेण्ट आणि मार्कडाउनला सपोर्ट करणाऱ्या इतर वर्कफ्लोमध्ये इंटिग्रेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या नोट्स ‘मार्कडाउन फाइल्स’ म्हणून एक्सपोर्ट करू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘नोट्स’ ॲपवर जा.

  2. तुम्हाला एक्सपोर्ट करायची असलेली नोट उघडा.

  3. शेअर बटण वर टॅप करा, ’मार्कअप म्हणून एक्सपोर्ट करा’ वर टॅप करा, त्यानंतर तुमची नोट कशी पाठवायची किंवा जतन करायची ते निवडा.

नोट प्रिंट करणे

  1. तुमच्या iPad वर ‘नोट्स’ ॲपवर जा.

  2. तुम्हाला प्रिंट करायची असलेली नोट उघडा.

  3. शेअर बटण वर टॅप करा, अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ’प्रिंट करा’ वर टॅप करा.

  4. प्रिंटर आणि इतर पर्याय निवडा, नंतर ’प्रिंट करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.