ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर नकाशा ॲपमध्ये हवामानाची माहिती मिळवणे

तुम्ही हवामान आणि हवेच्या गुणवत्तेबद्दल जाणून घेऊ शकता.

नोट : सर्व देश किंवा प्रदेशांमध्ये हवेची गुणवत्ता आणि हवामान डेटा उपलब्ध नाही.

हवामान आणि हवेच्या गुणवत्तेबद्दल जाणून घेणे

  1. तुमच्या iPad वर नकाशा ॲपवर जा.

  2. खालच्या उजव्या कोपऱ्यात हवामान आयकॉन दिसेपर्यंत नकाशावर झूम इन करा.

    आयकॉन त्या क्षेत्राची सद्य स्थिती दर्शवितो. काही प्रदेशात, ‘हवेचा गुणवत्ता निर्देशांक’ (AQI) खालच्या उजव्या कोपऱ्यामध्ये देखील दिसतो.

  3. तासागणिक अंदाज प्राप्त करण्यासाठी ‘हवामान’ आयकॉनला टच आणि होल्ड करा. ’हवामान’ ॲपमध्ये अनेक दिवसांचा अंदाज प्राप्त करण्यासाठी ‘तासागणिक अंदाज’ वर टॅप करा.

जर तुम्हाला ‘नकाशा’ मध्ये हवेची गुणवत्ता किंवा हवामानाबाबतची माहिती नको असेल, तर सेटिंग  > ॲप > ‘नकाशा’ वर जा, नंतर ‘हवेचा गुणवत्ता निर्देशांक’ किंवा ‘हवामान स्थिती’ बंद करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.