iPad वर कॉलवर असताना

जेव्हा तुम्ही iPad वर फोन कॉलवर असाल, तेव्हा तुम्ही ऑडिओ स्पीकरवर किंवा Bluetooth® डिव्हाइसवर स्विच करू शकता.

कॉल दरम्यान ऑडिओ ॲडजस्ट करणे

व्हॉल्यूम बदलण्यासाठी, iPad च्या बाजूला असलेल्या व्हॉल्यूम बटणांवर प्रेस करा. किंवा कॉल बॅनरवर खाली स्वाइप करा, नंतर पुढीलपैकी कोणतेही काम करा :

  • म्यूट करा : ‘म्यूट करा’ बटणावर टॅप करा.

  • कॉल होल्डवर ठेवा : ’म्यूट करा’ बटणावर टच आणि होल्ड करा.

  • हॅण्डस् फ्री चर्चा करा : ऑडिओ बटणावर टॅप करा, नंतर ऑडिओ डेस्टिनेशन निवडा.

कॉल करत असताना दुसरे ॲप वापरणे

  1. होम स्क्रीनवर जा , नंतर ॲप उघडा.

  2. कॉलवर परत जाण्यासाठी, स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेल्या हिरव्या ‘कॉल इंडिकेटर’ वर टॅप करा.

तुम्ही ह्यापुढे होल्डवर नसल्यास नोटिफिकेशन प्राप्त करा

जेव्हा तुम्हाला कॉल दरम्यान होल्डवर ठेवले जाते, तेव्हा तुम्ही लाइव्ह एजंट उपलब्ध असताना तुम्हाला सूचित करण्यासाठी ’होल्ड असिस्ट’ वापरू शकता जेणेकरून तुम्हाला लाइनवर राहण्याची गरज भासणार नाही.

नोट : iPad Pro 12.9 इंच (पाचवे जनरेशन किंवा नंतरचे व्हर्जन), iPad Pro 11 इंच (तिसरे जनरेशन किंवा नंतरचे व्हर्जन), iPad Air (चौथे जनरेशन किंवा नंतरचे व्हर्जन), iPad (दहावे जनरेशन किंवा नंतरचे व्हर्जन), आणि iPad mini (सहावे जनरेशन किंवा नंतरचे व्हर्जन) ह्यावर उपलब्ध आहे. ‘होल्ड असिस्ट’ सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही. iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ पहा.

  1. तुमच्या iPad वर ‘फोन’ ॲपवर जा.

  2. जेव्हा तुम्ही कॉलमध्ये असता आणि कॉल होल्डवर असतो, तेव्हा अधिक बटण वर टॅप करा, नंतर ’होल्ड असिस्ट’ वर टॅप करा.

    महत्त्वाचे : तुम्ही कॉलपासून दूर जाण्यापूर्वी तुमच्या रिंग सेटिंग तपासा. जर तुमचे iPad सायलेंटवर असेल किंवा ’डू नॉट डिस्टर्ब’ सुरू केलेले असेल, तर एजंट उपलब्ध असताना तुम्हाला इनकमिंग कॉल ऐकू येणार नाही. iPad ध्वनी बदलणे किंवा बंद करणे पहा.

  3. एजंट उपलब्ध असेल तेव्हा ’होल्ड असिस्ट’ तुम्हाला सूचित करेल आणि तुमच्या मिस्ड कॉलचा काही भाग ट्रान्सक्राइब करेल. कॉल पुन्हा जॉइन करण्यासाठी ‘कॉलला उत्तर द्या’ बटण वर टॅप करा.

नोट : फोन होल्डवर ठेवणारे संगीत ऑटोमॅटिकली ओळखू शकतो आणि तुम्हाला ‘होल्ड असिस्ट’ सुरू करण्यास सूचित देखील करू शकतो. सेटिंग > ॲप्स > ‘फोन’ ॲपवर जा, नंतर ‘होल्ड असिस्ट डिटेक्शन’ सुरू करा.

त्याच लाइनवर दुसऱ्या कॉलला प्रतिसाद देणे

जर तुम्ही कॉलवर असाल आणि दुसरा कॉल आला असेल, तर पुढीलपैकी एक करा :

  • कॉलकडे दुर्लक्ष करा आणि तो व्हॉइसमेलवर पाठवा : ‘दुर्लक्ष करा’ वर टॅप करा.

  • पहिला कॉल समाप्त करा आणि नवीन कॉलला उत्तर द्या : GSM नेटवर्क वापरताना, ‘समाप्त करा व स्वीकारा’ वर टॅप करा. CDMA नेटवर्कसह, ‘समाप्त करा’ वर टॅप करा; जेव्हा दुसरा कॉल पुन्हा वाजेल, तेव्हा ‘स्वीकारा’ वर टॅप करा किंवा iPad लॉक असल्यास स्लायडर ड्रॅग करा.

  • पहिला कॉल होल्डवर ठेवा आणि नवीन कॉलला उत्तर द्या : ’होल्ड करा व स्वीकारा’ वर टॅप करा.

    तुमचा कॉल होल्डवर असताना कॉलमध्ये स्विच करण्यासाठी, ‘कॉलमध्ये स्विच करण्यासाठी स्वॅप करा’ वर टॅप करा किंवा एकाच वेळी दोन्ही पक्षांशी बोलण्यासाठी ‘कॉल एकत्र करा’ वर टॅप करा. कॉन्फरन्स किंवा थ्री-वे कॉल सुरू करणे पहा.

नोट : CDMA सह, दुसरा कॉल आउटगोइंग असल्यास तुम्ही कॉलमध्ये स्विच करू शकत नाही, परंतु तुम्ही कॉल एकत्र करू शकता. दुसरा कॉल येत असल्यास तुम्ही कॉल एकत्र करू शकत नाही. जर तुम्ही दुसरा कॉल किंवा एकत्र केलेला कॉल समाप्त केला, तर दोन्ही कॉल समाप्त होतात.

‘लाइव्ह भाषांतर’ वापरणे

जर Apple Intelligence* सुरू केलेले असेल, तर तुम्ही फोन कॉल्सच्या दरम्यान बोलल्या गेलेल्या वाक्यांची भाषांतरे मिळविण्यासाठी त्याचा वापर करू शकता. संदेश आणि कॉल्स भाषांतरित करा पहा.

*Apple Intelligence बीटामध्ये पुढील भाषांच्या सपोर्टसह उपलब्ध आहे : इंग्रजी, डॅनिश, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, नॉर्वेजियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्वीडिश, तुर्की, चिनी (सरलीकृत), चिनी (पारंपारिक), जपानी, कोरियन आणि व्हिएतनामी. काही फीचर्स सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नसतील. भाषा आणि फीचर उपलब्धता आणि सिस्टीम आवश्यकतांविषयी अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.