ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ’आरोग्य’ मध्ये आरोग्याच्या नोंदी बघणे

तुम्ही आरोग्य सेवा प्रदात्याकडून आरोग्य नोंदी डाउनलोड सेट अप केल्यानंतर, तुमच्या नोंदी सुरक्षितपणे आणि ऑटोमॅटिकली iPad वर डाउनलोड केल्या जातात, जिथे त्या ‘आरोग्य’ ॲपमध्ये बघण्यासाठी उपलब्ध असतात.

तुमच्या आरोग्य नोंदी बघणे

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. ‘आरोग्य श्रेणी’ यादी डिस्प्ले करण्यासाठी ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • सर्च फील्डवर टॅप करा, त्यानंतर आरोग्य नोंद श्रेणीचे नाव (उदाहरणार्थ क्लिनिकलदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टी) किंवा डेटाचा प्रकार (उदाहरणार्थ रक्तदाब) प्रविष्ट करा.

    • खाली स्क्रोल करा, त्यानंतर ‘आरोग्य नोंदी’ च्या खाली असलेल्या श्रेणीवर (उदाहरणार्थ ॲलर्जी किंवा क्लिनिकलदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टी) टॅप करा.

    • खाली स्क्रोल करा, नंतर विशिष्ट संस्थेच्या नावावर टॅप करा.

अधिक तपशील पाहण्यासाठी, तुम्हाला दिसत असलेल्या तपशील बटण कोणत्याही विभागावर टॅप करा.

नोट : जर तुम्हाला आरोग्य सेवा प्रदात्याकडील अपेक्षित आरोग्य नोंदी दिसत नसतील, तर तुम्ही प्रदात्यासह तुमच्या अकाउंटमध्ये साइन इन केल्याची खात्री करा. ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, तुमच्या अकाउंटच्या यादीपर्यंत स्क्रोल करा, तुमच्या प्रदात्याच्या नावावर टॅप करा, नंतर सांगितले गेल्यास साइन इन करा.

महत्त्वाचे प्रयोगशाळा परिणाम पिन करणे

तुम्ही परिणामांना पिन करू शकता जेणेकरून ते त्वरित ॲक्सेससाठी ‘प्रयोगशाळा परिणाम’ च्या स्क्रीनच्या शीर्षस्थानी दिसतील.

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘प्रयोगशाळा परिणाम’ वर टॅप करा.

  3. अधिक बटण वर टॅप करा, नंतर ‘संपादित करा’ वर टॅप करा.

  4. परिणामाच्या पुढे ‘पिन करा’ बटण वर टॅप करा.

    तुम्ही परिणामावर टच आणि होल्ड देखील करू शकता, त्यानंतर ’हा लॅब पिन करा’ वर टॅप करा.

  5. तुम्ही काम झाल्यावर, अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ’पूर्ण’ वर टॅप करा.

तुमच्या आरोग्य नोंदी इतर ॲपसह शेअर करणे

थर्ड पार्टी ॲप तुमच्या आरोग्य नोंदी ॲक्सेस करण्याची विनंती करू शकतात. तुम्ही ॲक्सेस देण्यापूर्वी, तुमच्या नोंदी असलेल्या ॲपवर तुमचा विश्वास असल्याची खात्री करा.

  1. ॲक्सेस प्रदान करण्यासाठी, कोणती श्रेणी शेअर करायची ते निवडा—उदाहरणार्थ ॲलर्जी, औषधे किंवा लसीकरण—विचारले असता.

  2. तुमच्या सध्याच्या आणि भविष्यातील आरोग्य नोंदींचा ॲक्सेस प्रदान करायचा किंवा केवळ तुमच्या सध्याच्या नोंदींचाच ॲक्सेस प्रदान करायचा हे निवडा.

    जर तुम्ही फक्त तुमच्या सध्याच्या नोंदी शेअर करण्याचा पर्याय निवडलात, तर तुमच्या iPad वर जेव्हा नवीन नोंदी डाउनलोड केल्या जातील तेव्हा तुम्हाला ॲक्सेस प्रदान करण्यास सांगितले जाईल.

ॲपसह आरोग्य नोंदी शेअर करणे थांबवण्यासाठी, ‘आरोग्य’ मधून डेटा वाचण्याची त्याची परवानगी बंद करा.

iPad मधून संस्था आणि तिच्या नोंदी हटवणे

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. ’सारांश’ वर टॅप करा, त्यानंतर वरच्या डाव्या बाजूला तुमच्या छायाचित्राच्या किंवा आद्याक्षरांच्या पुढे ’प्रोफाइल’ वर टॅप करा.

  3. ’आरोग्य रेकॉर्ड्स’ वर टॅप करा, संस्थेच्या नावावर टॅप करा, त्यानंतर ’अकाउंट काढून टाका’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.