ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वरून प्रिंट करणे

‘Mail’, ‘छायाचित्र’, ‘Safari’ आणि ‘Freeform’ ह्यासारख्या ॲपमधून AirPrint एनेबल केलेल्या प्रिंटरवर वायरलेस पद्धतीने प्रिंट करण्यासाठी AirPrint वापरा. App Store वर उपलब्ध असलेले अनेक ॲप AirPrint ला देखील सपोर्ट करतात.

तुमचा iPad आणि प्रिंटर एकाच Wi-Fi नेटवर्कवर असणे आवश्यक आहे. Apple सपोर्ट लेख AirPrint विषयी माहिती पहा.

AirPrint एनेबल केलेले प्रिंटर निवडणे

तुमचा प्रिंटर AirPrint ला सपोर्ट करत असल्याची आणि तुमचा iPad आणि प्रिंटर एकाच Wi-Fi नेटवर्कवर असल्याची पुष्टी केल्यानंतर, पुढील गोष्टी करा :

  1. ज्या ॲपमधून तुम्हाला प्रिंट करायचे आहे ते उघडा.

  2. शेअर बटण, अधिक बटण, उत्तर बटण, किंवा ‘ॲक्शन मेन्यू’ बटण (ॲपवर अवलंबून) वर टॅप करा.

  3. ‘प्रिंट’ वर टॅप करा, ‘कोणताही प्रिंटर सिलेक्ट केलेला नाही’ वर टॅप करा, नंतर AirPrint एनेबल केलेला प्रिंटर निवडा.

डॉक्युमेंट प्रिंट करणे

  1. ज्या ॲपमधून तुम्हाला प्रिंट करायचे आहे ते उघडा.

  2. शेअर बटण, अधिक बटण, उत्तर बटण, किंवा ‘ॲक्शन मेन्यू’ बटण (ॲपवर अवलंबून) वर टॅप करा.

  3. ‘प्रिंट’ वर टॅप करा. (तुम्हाला प्रिंट दिसत नसल्यास, वर स्वाइप करा.)

प्रिंट जॉबची स्टेटस पहाणे

Exposé उघडा, त्यानंतर ‘प्रिंट सेंटर’ वर टॅप करा.

आयकॉनवरील बॅज रांगेत किती डॉक्युमेंट आहेत हे दाखवते.

प्रिंट जॉब रद्द करण्यासाठी, ते प्रिंट सेंटरमध्ये सिलेक्ट करा, नंतर ‘प्रिंट रद्द करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.