ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘दिनदर्शिका’ मध्ये रिमाइंडर वापरणे

तुम्ही ‘दिनदर्शिका’ मध्ये रिमाइंडर ॲपमधून रिमाइंडर बघू शकता, तयार करू शकता, पूर्ण करू शकता आणि संपादित करू शकता.

रिमाइंडर दाखवणे

तुम्ही ‘दिनदर्शिका’ मध्ये रिमांइडर ॲप मध्ये समाविष्ट केलेले शेड्यूल केलेले रिमांइडर दाखवू शकता.

  1. तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर जा.

  2. वरच्या डाव्या बाजूला दिनदर्शिका बटण वर टॅप करा, नंतर ‘शेड्यूल केलेले रिमाइंडर्स’ सिलेक्ट करा.

पूर्ण दिवसाचे शेड्यूल केलेले ‘रिमाइंडर’ दिनदर्शिकेच्या शीर्षस्थानी असलेल्या ‘संपूर्ण दिवस’ विभागात दाखवले जाते. विशिष्ट वेळी शेड्यूल केलेले रिमाइंडर पूर्ण दिवसाच्या शेड्यूलमध्ये त्याच वेळी दिसतात.

रिमाइंडर तयार करणे

  1. तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर जा.

  2. स्क्रीनच्या शीर्षस्थानी ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा.

  3. ‘रिमाइंडर’ वर टॅप करा, त्यानंतर शीर्षक प्रविष्ट करा.

  4. रिमाइंडरकरिता दिनांक निवडण्यासाठी, ‘दिनांक’ वर टॅप करा.

  5. पर्याय म्हणून, ‘वेळ’ चालू करा आणि रिमाइंडरसाठी विशिष्ट वेळ निवडा.

    तुम्ही रिमाइंडरमध्ये इतर माहिती—जसे की इमेज, नोट्स किंवा प्राधान्य स्तर देखील समाविष्ट करू शकता. तपशील समाविष्ट करा पहा.

नोट : नवीन शेड्यूल केलेले रिमाइंडर समाविष्ट करण्यासाठी तुम्ही विशिष्ट रिमाइंडर यादी सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही यादी सिलेक्ट केली नाही, तर तुम्ही ‘रिमाइंडर’ साठी निवडलेल्या डिफॉल्ट यादीमध्ये नवीन रिमाइंडर समाविष्ट केले जातील. तुमचे रिमाइंडर सेटिंग बदला पहा.

रिमाइंडर पूर्ण करणे

  1. तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर जा.

  2. रिमाइंडरच्या नावाच्या पुढे असलेल्या वर्तुळावर टॅप करा.

    पूर्ण रिमाइंडर डिम केलेले आहेत. रिमाइंडरला अपूर्ण म्हणून चिन्हांकित करण्यासाठी त्याच्या पुढे असलेले वर्तुळ डीसिलेक्ट करा.

नोट : तुम्ही शेड्यूल केलेले रिमाइंडर रिपीट करण्यासाठी सेट केल्यास, भविष्यातील विनंत्या डिम केल्या जातात आणि सध्याची विनंती ‘पूर्ण केले’ म्हणून चिन्हांकित केल्यानंतरच ‘पूर्ण केले’ म्हणून चिन्हांकित केली जाऊ शकते.

रिमाइंडर लपवणे

  1. तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर जा.

  2. शीर्षस्थानी डाव्या बाजूला दिनदर्शिका बटण वर टॅप करा.

  3. शेड्यूल केलेले रिमाइंडर डीसिलेक्ट करा.

‘दिनदर्शिका’ मधून रिमाइंडर काढून टाकल्यास रिमाइंडर ॲपमधून रिमाइंडर हटवले जात नाहीत.

रिमाइंडर संपादित करणे किंवा हटवणे

  1. तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर जा.

  2. रिमाइंडरवर टॅप करा, नंतर तपशील संपादित करण्यासाठी ’संपादित करा’ वर टॅप करा किंवा हटवण्यासाठी ‘रिमाइंडर हटवा’ वर टॅप करा.

    हटवलेले रिमाइंडर कायमस्वरूपी हटवले जाण्यापूर्वी 30 दिवसांसाठी ‘रिमाइंडर’ मधील ‘अलीकडे हटवलेले’ ह्या यादीमध्ये जातात.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.