ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘Mail’ मध्ये ईमेल फिल्टर करणे

तुम्ही फिल्टर वापरून फक्त काही विशिष्ट ईमेल संदेश तात्पुरते दाखवू शकता—जे तुम्ही फिल्टर यादीमध्ये सिलेक्ट केलेल्या सर्व निकषांची पूर्तता करतात. उदाहरणार्थ, तुम्ही ’न वाचलेले’ आणि ’फक्त अटॅचमेंटसह असलेले मेल’ सिलेक्ट केले, तर तुम्हाला फक्त ‘न वाचलेले’ संदेश दिसतील ज्यात अटॅचमेंट असतील.

विशिष्ट फोकस चालू असताना ‘Mail’ मध्ये कोणते ईमेल अकाउंट दाखवले जावेत हे देखील तुम्ही उल्लेखित करू शकता.

ईमेल फिल्टर करणे

  1. तुमच्या iPad वरील Mail ॲपवर जा.

  2. ‘फिल्टर करणे टॉगल करा’ बटण वर टॅप करा.

  3. ‘ह्यानुसार फिल्टर केलेले’ वर टॅप करा, नंतर तुम्हाला बघायच्या असलेल्या संदेशांसाठी निकष सिलेक्ट करा किंवा सुरू करा, त्यानंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा.

सर्व फिल्टर बंद करण्यासाठी, ‘फिल्टर करणे टॉगल करा’ बटण वर टॅप करा. विशिष्ट फिल्टर बंद करण्यासाठी, “ह्याद्वारे फिल्टर केलेले” वर टॅप करा, नंतर डीसिलेक्ट करा.

मेल अकाउंटला फोकसशी जुळवणे

फोकस चालू असताना कोणत्या ईमेल अकाउंटवरून नोटिफिकेशन प्राप्त करायचे हे तुम्ही निवडू शकता. उदाहरणार्थ, तुमचा ‘वर्क फोकस’ चालू असताना तुम्ही फक्त तुमच्या कामाच्या संदर्भातील ईमेल अकाउंट आणि त्याचे नोटिफिकेशन दाखवण्यासाठी फिल्टर सेट करू शकता.

  1. सेटिंग  > ‘फोकस’ वर जा, त्यानंतर ‘फोकस’ वर टॅप करा.

    तुम्हाला फोकसचे हवे असलेले पर्याय दिसत नसल्यास, ‘फोकस समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा. फोकस सेट अप करणे पहा.

  2. फोकस फिल्टरच्या खाली ’फिल्टर समाविष्ट करा’ वर टॅप करा, नंतर ‘Mail’ वर टॅप करा.

  3. त्या ‘फोकस’ दरम्यान तुमच्या इनबॉक्समध्ये तुम्हाला पहायचे असलेले अकाउंट सिलेक्ट करा.

ईमेलला प्राधान्य देणे

जर Apple Intelligence* सुरू केलेले असेल, तर तुम्ही तुमच्या सर्वात तातडीचे ईमेल्स त्वरित बघण्यासाठी ‘प्राधान्य संदेश’ वापरू शकता. Mail ॲपमध्ये Apple Intelligence वापरा पहा.

*Apple Intelligence बीटामध्ये पुढील भाषांच्या सपोर्टसह उपलब्ध आहे : इंग्रजी, डॅनिश, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, नॉर्वेजियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्वीडिश, तुर्की, चिनी (सरलीकृत), चिनी (पारंपारिक), जपानी, कोरियन आणि व्हिएतनामी. काही फीचर्स सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नसतील. भाषा आणि फीचर उपलब्धता आणि सिस्टीम आवश्यकतांविषयी अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.